वाशिम जिल्ह्यातील आमदारांचं प्रगतीपुस्तक

Washim : वाशिम जिल्ह्यामध्ये वाशिम मतदारसंघांचे भाजपा आमदार लखन मलिक यांनी गेल्या पाच वर्षात विधानसभेत एकही प्रश्न विचारलेला नाहीये. या जिल्ह्यातून सगळ्यात जास्त (239) प्रश्न रिसोड मतदारसंघांचे काँग्रेस आमदार अमित झनक यांनी मांडले आहेत.
[gspeech type=button]

14 व्या अधिवेशनातील एकूण प्रश्न : 5,921

वाशिम  जिल्ह्याची एकूण प्रश्नसंख्या: 296

वाशिम जिल्ह्याशी संबंधीत एकूण प्रश्न : 8

 

वाशिम जिल्ह्यामध्ये वाशिम मतदारसंघांचे भाजपा आमदार लखन मलिक यांनी गेल्या पाच वर्षात विधानसभेत एकही प्रश्न विचारलेला नाहीये. या जिल्ह्यातून सगळ्यात जास्त (239) प्रश्न रिसोड मतदारसंघांचे काँग्रेस  आमदार अमित झनक यांनी मांडले आहेत.

या प्रश्नांमध्ये राज्यातील आंगणवाड्यातील पायाभूत सुविधा, निकृष्ठ दर्जाच्या पोषण आहारामुळे विद्यार्थ्यांना झालेली विषबाधा, महात्मा जोतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेने महत्वाच्या परिक्षांसाठी देण्यात येणारी आर्थिक सहाय्य योजना अद्याप सुरु न केल्याबाबत, राज्यात “लेक लाडकी” या योजनेची अंमलबजावणी करण्याबाबतचे प्रश्न उपस्थित केले आहेत.

 

जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारे आमदार, त्यांचे पक्ष, मतदारसंघ आणि त्यांची प्रश्नसंख्या 

 

क्र. आमदाराचे नाव पक्ष मतदारसंघ प्रश्नसंख्या
1 अमित  झनक काँग्रेस रिसोड 239
2 राजेंद्र पाटणी भाजप कारंजा 67
3 लखन मलिक भाजप वाशिम 0

(टीप – काही प्रश्न एकापेक्षा अधिक आमदार उपस्थित करतात. त्यामुळे, आमदारांची प्रश्नसंख्या जिल्ह्याच्या प्रश्नसंख्येपेक्षा जास्त भरते.)

 

14 व्या विधानसभेत वाशिम जिल्ह्याशी संबंधित उपस्थित केलेल्या प्रश्नांमधील काही प्रमुख प्रश्न – 

  • जिल्ह्यात 2011च्या जनगणनेनुसार 25 प्राथमिक आरोग्य केंद्र व 153 उपकेंद्र आहेत. मात्र, वाढत्या लोकसंख्यंनुसार आरोग्य केंद्राची संख्या वाढवणे
  •   रस्तेदुरुस्ती, पुलाचे बांधकाम, पाणीपुरवठा योजना अशा पायाभूत सोई-सुविधांविषयी प्रश्न
  • तसेच रिसोडमध्ये औद्योगिक क्षेत्राची मागणी विषयक प्रश्न सभागृहात उपस्थित केला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Maharashtra CM Devendra Fadnavis : भाजपाचे राज्यातील नेते देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा एकदा एकमताने राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली आहे.
Maharashtra Politics : राज्याचा मुख्यमंत्री कोण असणार याबाबत महायुतीने अद्याप निर्णय घेतलेला नाही आहे. राज्याच्या नवीन सरकारचा आज किंवा उद्या
Maharashtra election Result and Social Media : या संपूर्ण निवडणुकीत सगळ्यांच पक्षांनी सोशल मीडियावरून सुद्धा जोरदार प्रचार केला. आज या

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ