महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदाचा तिढा कायम; शपथविधी लांबण्याची शक्यता

Maharashtra Politics : राज्याचा मुख्यमंत्री कोण असणार याबाबत महायुतीने अद्याप निर्णय घेतलेला नाही आहे. राज्याच्या नवीन सरकारचा आज किंवा उद्या शपथविधी झाला नाही तर उद्या संध्याकाळपासून राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार आहे.
[gspeech type=button]

राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला जनतेंनी घवघवीत यश मिळवून दिलं आहे. महायुतीला तब्बल 230 जागा मिळाल्या आहेत. यामध्ये 3 अपक्षांनी शिवसेना (शिंदे गटाला) तर भाजपाच्या 1 बंडखोर आमदारांने भाजपाला पाठिंबा जाहीर केला आहे.

महायुतीच्या आमदारांची संख्या वाढत जात आहे. मात्र, आता मुख्यमंत्री पद कोणत्या पक्षातील नेत्याला मिळणार हा तिढा अजुन सुटलेला नाहीये. त्यामुळे शपथविधी सोहळा लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, आज संध्याकाळी दिल्ली येथे महायुतीतील पक्षातील प्रमुख नेत्यांची भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेतृत्वासोबत बैठक होणार असून याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

आमचाच नेता मुख्यमंत्री होणार?

महायुतीतल्या तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आपच्याच नेत्याला मुख्यमंत्री पद मिळावं अशी मागणी केली आहे. तरी मुख्यमंत्री पदासंदर्भात तिन्ही पक्षाचे नेते आणि भाजपाचे केंद्रीय नेतृत्वामध्ये चर्चा करुन निर्णय घेणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

या निवडणुकीत भाजपा 132 जागांसह पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे त्यामुळे साहजिकच देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद मिळावं अशी मागणी भाजपाचे राज्यातील नेते आणि कार्यकर्त्यांची आहे. मात्र, निवडणुकीपूर्वी महायुतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच हे आमचे मुख्यमंत्री असतील असं सांगत त्यांच्या नेतृत्वात निवडणुका लढवलेल्या. त्यामुळे आता मुख्यमंत्री पद कोणत्या पक्षाकडे जाते यामध्ये रस्सीखेच सुरू आहे.

राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता?

राज्याच्या 14व्या विधानसभेचा कालावधी 26 नोव्हेंबर रोजी संपणार आहे. त्यामुळे त्यापूर्वी म्हणजे आज किंवा उद्या पर्यंत मुख्यमंत्री पदाचा शपथविधी होऊन सत्तास्थापन झाली नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते.

त्यामुळे आजच मुख्यमंत्री पद आणि उपमुख्यमंत्री पदासंदर्भात निर्णय होऊन उद्या संध्याकाळपर्यंत शपथविधी सोहळा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Maharashtra CM Devendra Fadnavis : भाजपाचे राज्यातील नेते देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा एकदा एकमताने राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली आहे.
Maharashtra election Result and Social Media : या संपूर्ण निवडणुकीत सगळ्यांच पक्षांनी सोशल मीडियावरून सुद्धा जोरदार प्रचार केला. आज या
Mahayuti Victory : विधानसभा निवडणूक 2024 मध्ये महायुतीने दणदणीत विजय मिळवला आहे. महायुतीला या निवडणुकीत 231 जागा मिळाल्या आहेत. तर

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ