14 व्या अधिवेशनातील एकूण प्रश्न : 5,921
ठाणे जिल्ह्याची एकूण प्रश्नसंख्या: 1,086
ठाणे जिल्ह्यातील मानवविकास स्थिती ही अतिशय चांगली असल्याचं या अहवालातुन समोर आलं आहे. मुंबई, पुणे नंतर सर्वात जास्त मतदारसंघ असलेला ठाणे हा तिसरा जिल्हा आहे. या जिल्ह्यातील 18 मतदारसंघांपैकी दोन मतदारसंघांचे नेतृत्व हे महिला आमदार करतात.
या मतदारसंघांतून मुरबाड मतदारसंघांचे भाजपा आमदार किसन कथोरे यांनी सर्वाधिक 275 प्रश्न अधिवेशनात उपस्थित केले आहेत. मुंब्रा मतदारसंघांचे राष्ट्रवादी (शरद पवार गटाचे) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी 266 प्रश्न विचारले आहेत. तर सर्वात कमी 12 प्रश्न हे ऐरोली मतदारसंघांचे भाजपा आमदार गणेश नाईक यांनी गेल्या पाच वर्षाच्या कालावधीत मांडले आहेत.
जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारे आमदार, त्यांचे पक्ष, मतदारसंघ आणि त्यांची प्रश्नसंख्या
क्र. |
आमदारांचे नाव | पक्ष | मतदारसंघ |
प्रश्नसंख्या |
1 | महेश प्रभाकर चौघुले | भाजप | भिवंडी पश्चिम | 37 |
2 | प्रमोद रतन पाटील | महाराष्ट्र नवनिर्माण सेना | कल्याण ग्रामीण | 84 |
3 | गणेश रामचंद्र नाईक | भाजप | ऐरोली | 12 |
4 | डॉ. बालाजी प्रल्हाद किणीकर | शिवसेना. जून 2022 पासून शिंदे गट | अंबरनाथ | 121 |
5 | शांताराम तुकाराम मोरे | शिवसेना. जून 2022 पासून शिंदे गट | भिवंडी ग्रामीण | 62 |
6 | कुमार उत्तमचंद आयलानी | भाजप | उल्हासनगर | 116 |
7 | किसन शंकर कथोरे | भाजप | मुरबाड | 275 |
8 | गणपत काळू गायकवाड | भाजप | कल्याण पूर्व | 152 |
9 | दौलत भिका दरोडा | राष्ट्रवादी कॉंग्रेस. जुलै 2023पासून शरद पवार गट | शहापूर | 157 |
10 | मंदा विजय म्हात्रे | भाजप | बेलापूर | 70 |
11 | विश्वनाथ आत्माराम भोईर | शिवसेना. जून न 2022 पासून शिंदे गट | कल्याण पश्चिम | 53 |
12 | गीता भारत जैन | अपक्ष | मीरा-भाईंदर | 27 |
13 | संजय मुकुंद केळकर | भाजप | ठाणे शहर | 221 |
14 | रईस कासम शेख | सपा | भिवंडी पूर्व | 175 |
15 | जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार) – मंत्री, 2019 ते 2022. | राष्ट्रवादी काँग्रेस. जुलै 2023 पासून शरद पवार गट
|
मुंब्रा कळवा | 266 |
16 | एकनाथ शिंदे (मंत्री, 2019 ते 2022. त्यानंतर मुख्यमंत्री. प्रश्न, उपस्थिती लागू नाही.) | शिवसेना. जून न 2022 पासून शिंदे गट
|
कोपरी पाचपखाडी | 0 |
17 | प्रताप सरनाईक | शिवसेना. जून 2022 पासून शिंदे गट
|
ओवळा माजिवडा | 96 |
18 | रवींद्र चव्हाण (जून 2022 पासून मंत्री. प्रश्न, उपस्थिती लागू नाही.) | भाजप | डोंबिवली | 0 |
(टीप – काही प्रश्न एकापेक्षा अधिक आमदार उपस्थित करतात. त्यामुळे, आमदारांची प्रश्नसंख्या जिल्ह्याच्या प्रश्नसंख्येपेक्षा जास्त भरते.)
14 व्या विधानसभेत ठाणे जिल्ह्याशी संबंधित उपस्थित केलेल्या प्रश्नांमधील काही प्रमुख प्रश्न –
- बाल न्याय मंडळ आणि बाल कल्याण समितीकडे प्रलंबित प्रकरणे निकाली काढणेसह महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगास व मनोधैर्य योजनेस निधी उपलब्ध करण्याबाबत,
- भिवंडी तालुक्यातील पिसे गावातील बालिकेचा इंदिरा गांधी रुग्णालयात उपचार नाकारल्याने झालेला मृत्यू,
- भिवंडी येथील शासकीय निरीक्षण आणि बालगृहातील अल्पवयीन मुलांचे लैंगिक छळ होत असल्याबाबत,
- ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथील महालक्ष्मी नर्सिंग होम या संस्थेने नवजात बाळाची विक्री केल्याबाबत
- मुंबई महापालिकेच्या इमारतीमध्ये सुरु असलेल्या 97 रात्रशाळा 2012 पासून अनुदान बंद केल्याने शिक्षक स्वखर्चाने शाळा चालवत असल्याने रात्रशाळांना आकारण्यात आलेली भाडे माफ करण्याबाबत,
- राज्यात शिक्षण हक्क कायद्यांतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रकियेचे नवीन नियम रद्द करण्याबाबत इ.
- राज्य शासनाच्या नवीन वाळू धोरणाच्या अंमलबजावणीबाबत
- राज्यातील टोल वसुलीसंदर्भात निश्चित धोरण ठरवण्याबाबत
- राज्यात पोलिसांसाठी विशेष गृहनिर्माण धोरण तयार करण्याबाबत
- राज्यातील कुपोषण व बालमृत्यूचे प्रमाण रोखण्याकरीता धोरण निश्चित करण्याबाबत
- भटक्या कुत्र्यांमुळे होणाऱ्या उपद्रवाबाबत नगरपालिका, महापालिका यांचे धोरण नसल्याबाबतचे प्रश्न ठाणे जिल्ह्यातील आमदारांनी सभागृहात उपस्थित केले आहेत.