परभणी जिल्ह्यातील आमदारांचं प्रगतीपुस्तक

Parbhani : परभणी जिल्ह्यातल्या सरकारी शाळेच्या इमारतीची दुरावस्था, वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित, जिल्ह्यात श्रेणीवर्धीत झालेले ग्रामीण रुग्णालय कार्यान्वित करण्याबाबत असे महत्त्वाचे प्रश्न सभागृहात उपस्थित करण्यात आले. 
[gspeech type=button]

14 व्या अधिवेशनातील एकूण प्रश्न : 5,921

परभणी जिल्ह्याची एकूण प्रश्नसंख्या : 566

परभणी जिल्ह्याशी संबंधीत प्रश्नसंख्या : 82

परभणी जिल्ह्यातून पाथरी मतदारसंघांचे काँग्रेस  आमदार  सुरेश वरपुडकर यांनी सगळ्यात जास्त 330  प्रश्न उपस्थित केले आहेत. तर गंगाखेड मतदारसंघांचे राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी केवळ 23 प्रश्न उपस्थित केले आहेत. 

याप्रश्नामध्ये परभणी जिल्ह्यातल्या सरकारी शाळेच्या इमारतीची दुरावस्था, वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित, जिल्ह्यात श्रेणीवर्धीत झालेले ग्रामीण रुग्णालय कार्यान्वित करण्याबाबत असे महत्त्वाचे प्रश्न सभागृहात उपस्थित करण्यात आले. 

जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारे आमदार, त्यांचे पक्ष, मतदारसंघ आणि त्यांनी विचारलेले प्रश्न

क्र. आमदाराचे नाव पक्ष मतदारसंघ प्रश्नसंख्या
1 मेघना बोर्डिकर-साकोरे भाजप जिंतुर 115
2 डॉ. राहुल  पाटील शिवसेना, जून 2022  पासून ठाकरे गट  परभणी 170
3 रत्नाकर  गुट्टे राष्ट्रीय समाज पक्ष गंगाखेड 23
4 सुरेश  वरपुडकर काँग्रेस पाथरी 330

(टीप – काही प्रश्न एकापेक्षा अधिक आमदार उपस्थित करतात. त्यामुळे, आमदारांची प्रश्नसंख्या जिल्ह्याच्या प्रश्नसंख्येपेक्षा जास्त भरते.)

 

14 व्या विधानसभेत परभणी जिल्ह्याशी संबंधित उपस्थित केलेल्या प्रश्नांमधील काही प्रमुख प्रश्न – 

  • परभणी शहरात विविध कारणांमुळे होत असलेली वाहतूक कोंडी
  • जिंतूर- औंढा  महामार्गाची दुरावस्था
  • परभणी नगरपालिकेने दिव्यांग व्यक्तीच्या अनुदानात एक हजार रुपयांची केलेली कपात
  • परभणी जिल्हयात स्वच्छ पाणीपुरवठा करण्याबाबत
  •  येलदरी आणि सिध्देश्वर धरणाच्या उभारणीसाठी पुनर्वसित झालेल्या गावांना मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत 
  • परभणी येथे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या स्थापनेला 50 वर्ष होऊनही त्याचा फायदा मराठवाड्यातील शेतकर्‍यांना अपेक्षेप्रमाणे होत नसल्याबद्दल आणि विद्यापीठातील प्रशासकीय समस्या सोडवण्याबद्दल,
  • नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यात गौण खनिजाचे व वाळूचे अवैध उत्खनन होत असल्याबाबत
  • गंगाखेड मतदारसंघात ग्रामीण व शहरी भागात मोठ्या प्रमाणात होत असलेले अवैध गैरकारभार
  • परभणी जिल्ह्यातील लघु, मध्यम व मोठ्या सिंचन प्रकल्पातील थकित सिंचन पाणीपट्टी,
  • परभणी आगारातील एस.टी. महामंडळाच्या बसेसची दुरावस्था आदी प्रश्न सभागृहात मांडले. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Maharashtra CM Devendra Fadnavis : भाजपाचे राज्यातील नेते देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा एकदा एकमताने राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली आहे.
Maharashtra Politics : राज्याचा मुख्यमंत्री कोण असणार याबाबत महायुतीने अद्याप निर्णय घेतलेला नाही आहे. राज्याच्या नवीन सरकारचा आज किंवा उद्या
Maharashtra election Result and Social Media : या संपूर्ण निवडणुकीत सगळ्यांच पक्षांनी सोशल मीडियावरून सुद्धा जोरदार प्रचार केला. आज या

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ