14 व्या अधिवेशनातील एकूण प्रश्न : 5,921
उस्मानाबाद जिल्ह्याची एकूण प्रश्नसंख्या: 186
उस्मानाबाद जिल्ह्याशी संबंधीत प्रश्नसंख्या : 48
उस्मानाबाद जिल्ह्यातून गेल्या पाच वर्षात सर्वाधिक प्रश्न हे तुळजापूर मतदारसंघांचं भाजपा आमदार जगजितसिंग राणा पाटील (102) यांनी विचारले आहेत. तर कळमनुरी मतदारसंघाचे भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी जिल्ह्यातल्या इतर आमदारांच्या तुलनेत कमी (50) प्रश्न विचारले आहेत.
या प्रश्नांमध्ये, बालकांवरील लैंगिक अत्याचारामध्ये झालेली वाढ कळंब तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय व कर्मचारी निवासस्थान इमारतीच्या बांधकामाबाबत, तेथील उपजिल्हा रुग्णालयात सोयी-सुविधा पुरविण्याबाबत, वाशी तालुक्यात मंजूरी मिळालेल्या ट्रॉमा केअर सेंटरचे काम सुरु करण्याबाबत आणि सरकारी आरोग्य केंद्रावरील औषधांचा सुरळीत पुरवठा संदर्भात प्रश्न उपस्थित केले आहेत.
जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारे आमदार, त्यांचे पक्ष, मतदारसंघ आणि त्यांनी विचारलेले प्रश्न :
क्र. | आमदाराचे नाव | पक्ष | मतदारसंघ | प्रश्नसंख्या |
1 | ज्ञानराज चौगुले | शिवसेना | उमरगा | 48 |
2 | जगजितसिंग राणा पाटील | भाजप | तुळजापूर | 102 |
3 | कैलास पाटील (घाडगे) | शिवसेना, जून 2023 पासून ठाकरे गट | उस्मानाबाद | 42 |
4 | डॉ. तानाजी सावंत, मंत्री, जून 2022 पासून | शिवसेना, जून 2023 पासून शिंदे गट | भूम परांडा | 14 |
(टीप – काही प्रश्न एकापेक्षा अधिक आमदार उपस्थित करतात. त्यामुळे, आमदारांची प्रश्नसंख्या जिल्ह्याच्या प्रश्नसंख्येपेक्षा जास्त भरते.)
14 व्या विधानसभेत उस्मानाबाद जिल्ह्याशी संबंधित उपस्थित केलेल्या प्रश्नांमधील काही प्रमुख प्रश्न –
- उमरगा जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील प्रलंबित पाणीपुरवठा योजनेची कामे राष्ट्रीय पेयजल योजने अंतर्गत पूर्ण कण्याबाबत
- परांडा येथील तहसिलदारांवर वाळू माफियांनी केलेला हल्ला
- मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत जिल्ह्यात झालेली निकृष्ट दर्जाची कामे
- लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील भूकंपग्रस्त गावातील बाधितांच्या प्रलंबित मागण्या
- तुळजाभवानी मंदिर तीर्थक्षेत्राचा केंद्र शासनाच्या प्रशाद (PRASHAD) योजनेत समावेश करण्याबाबत
- तसेच जिल्ह्यातील रस्त्यांची, बस स्थानकांची प्रलंबित कामां संदर्भातले प्रश्न सभागृहात उपस्थित केलेले.