नांदेड जिल्ह्यातील आमदारांचं प्रगतीपुस्तक

Nanded : जिल्हा पातळीवरील प्रश्नांमध्ये आरोग्य, बालक, शिक्षण याविषयांवरील प्रश्नांचा समावेश आहे. त्यामध्ये भोकर तालुक्यातील अंगणवाड्यांना निकृष्ट दर्जाचे धान्य पुरवठा केला जात असल्याबाबत, बिलोली  येथील उपजिल्हा रुग्णालयात एका तीन दिवसांच्या बालकांचा उपचाराअभावी मृत्यू, नांदेड जिल्हयातील शिक्षण विभागातील रिक्त पदे, जिल्हा परिषद शाळांच्या इमारतींची दुरावस्था आदी स्वरुपातील प्रश्न उपस्थित केले आहेत.  
[gspeech type=button]

14 व्या अधिवेशनातील एकूण प्रश्न : 5,921

नांदेड जिल्ह्याची एकूण प्रश्नसंख्या : 511

नांदेड जिल्ह्याशी संबंधीत प्रश्नसंख्या : 73

नांदेड जिल्ह्यातून सर्वाधिक प्रश्न (223) हे भोकर मतदारसंघांचे तत्कालिन आमदार अशोक चव्हाण यांनी उपस्थित केले होते. खा. अशोक चव्हाण हे जून 2022 पर्यंत महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रीमंडळात होते. त्यानंतर जुलै 2022 ते फेब्रुवारी 2024 ते आमदारपदी होते. त्यानंतर त्यांनी आमदारकीचा राजीनामा देत भाजपा पक्षात प्रवेश घेतला व लोकसभेच्या खासदारपदी ते निवडून आले.

या जिल्ह्यातून लोहा मतदारसंघांचे नेतृत्व करणारे शेतकरी संघटनेचे  आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी केवळ 4 प्रश्न गेल्या पाच वर्षाच्या कालावधीत विचारले आहेत.

जिल्हा पातळीवरील प्रश्नांमध्ये आरोग्य, बालक, शिक्षण याविषयांवरील प्रश्नांचा समावेश आहे. त्यामध्ये भोकर तालुक्यातील अंगणवाड्यांना निकृष्ट दर्जाचे धान्य पुरवठा केला जात असल्याबाबत, बिलोली  येथील उपजिल्हा रुग्णालयात एका तीन दिवसांच्या बालकांचा उपचाराअभावी मृत्यू, नांदेड जिल्हयातील शिक्षण विभागातील रिक्त पदे, जिल्हा परिषद शाळांच्या इमारतींची दुरावस्था आदी स्वरुपातील प्रश्न उपस्थित केले आहेत.

जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारे आमदार, त्यांचे पक्ष, मतदारसंघ आणि त्यांनी विचारलेले प्रश्न : 

क्र. आमदाराचे नाव पक्ष मतदारसंघ प्रश्नसंख्या
1 अशोक चव्हाण, जून 2022 पर्यंत मंत्रीपदी आणि फेब्रुवारी 24 पर्यंत आमदारपदी काँग्रेस भोकर 223
2 बालाजी  कल्याणकर शिवसेना, जून 2022 पासून शिंदे गट नांदेड उत्तर 12
3 भीमराव  केराम भाजप किनवट 3
4 जितेश अंतापुरकर काँग्रेस देगलूर (अ.जा.) 188
5 माधवराव  जळगावकर-पाटील काँग्रेस हदगाव 53
6 मोहनराव  हंबर्डे काँग्रेस नांदेड दक्षिण 191
7 राजेश पवार भाजप नायगाव 67
8 रावसाहेब  अंतापुरकर काँग्रेस देगलूर (अ.जा.) 12
9 श्यामसुंदर शिंदे शेतकरी संघटना लोहा 4
10 डॉ. तुषार  राठोड भाजप मुखेड 9

(टीप – काही प्रश्न एकापेक्षा अधिक आमदार उपस्थित करतात. त्यामुळे, आमदारांची प्रश्नसंख्या जिल्ह्याच्या प्रश्नसंख्येपेक्षा जास्त भरते.)

 

14 व्या विधानसभेत नांदेड जिल्ह्याशी संबंधित उपस्थित केलेल्या प्रश्नांमधील काही प्रमुख प्रश्न –

  • जिल्ह्यात गौण खनिजाचे अवैध उत्खनन होत असल्याबाबत
  •  नायगाव तालुक्यातील सर्वच गावांत वीजेचे केबल कंडक्टर जुने झाल्याबाबत
  • हिमायतनगर तालुक्यातील वडगाव, पोटा परिसरातील अनेक ग्रामंपचायत विभागामध्ये अशुद्ध पाणीपुरवठा
  • जिल्ह्यातील मनेरवारळू, कोळी समाजातील नागरिकांना जात वैधता प्रमाणपत्र तातडीने उपलब्ध होण्याकरीता करावयाची उपाययोजना
  • जिल्ह्यात वाळू व अन्य गौणखनिजाची वाहतूक करणाऱ्या वाहनांना जीपीएस  बसवण्याच्या नियमाचं उल्लंघन
  • जिल्ह्यात टँकरद्वारे केलेल्या पाणीपुरवठ्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या घोटाळ्याच्या चौकशी अहवालावर कार्यवाहीची गरज
  •  कंधार तालुक्यातील जंगलात अवैध वृक्षतोड
  • तसेच कंधार-नायगांव-भोकर तसेच मांडवी, ता.किनवट येथे गुटखा बंदी कायद्याचे उल्लंघन होत असल्याबाबत असे अनेक प्रश्न सभागृहात मांडले गेले.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Maharashtra CM Devendra Fadnavis : भाजपाचे राज्यातील नेते देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा एकदा एकमताने राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली आहे.
Maharashtra Politics : राज्याचा मुख्यमंत्री कोण असणार याबाबत महायुतीने अद्याप निर्णय घेतलेला नाही आहे. राज्याच्या नवीन सरकारचा आज किंवा उद्या
Maharashtra election Result and Social Media : या संपूर्ण निवडणुकीत सगळ्यांच पक्षांनी सोशल मीडियावरून सुद्धा जोरदार प्रचार केला. आज या

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ