मुंबई उपनगर जिल्ह्यातील आमदारांचं प्रगतीपुस्तक

Mumbai Suburban : मुंबई उपनगर जिल्ह्यातील आमदारांनी विविध क्षेत्रातील व घटनेशी संबंधीत प्रश्न उपस्थित करताना राज्य पातळीवर काही विशेष धोरण निर्मिती करण्याविषयीचा मुद्दा विधीमंडळात उपस्थित केला आहे.
[gspeech type=button]

14 व्या अधिवेशनातील एकूण प्रश्न : 5,921

मुंबई उपनगर जिल्ह्याची एकूण प्रश्नसंख्या: 2,110

 

मुंबई उपनगर जिल्ह्यातून सर्वाधिक 630  प्रश्न हे  वांद्रे पश्चिम मतदारसंघाचे भाजपा आमदार आशीष शेलार यांनी उपस्थित केले. या जिल्ह्यातील चार मतदारसंघांचे नेतृत्व हे महिला आमदार करतात. 

या जिल्ह्यातील आमदारांनी विविध क्षेत्रातील व घटनेशी संबंधीत प्रश्न उपस्थित करताना राज्य पातळीवर काही विशेष धोरण निर्मिती करण्यासाठीही विधीमंडळात आवाज उठवला. यामध्ये जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांबाबतचे धोरण निश्चित करण्यामध्ये होत असलेला विलंब, राज्य शासनाच्या नवीन वाळू धोरणाच्या अंमलबजावणीबाबत, खाडी व नदीपात्रातील वाळू सदृश्य गाळाचा उपसा होण्याच्या दृष्टीने वाळू-रेती निर्गती धोरणामध्ये सुधारणा करण्याबाबत, मुंबई शहर व उपनगरातील धोकादायक इमारतीमधील रहिवाशांच्या पुनर्वसनाचे कोणतेही धोरण नसल्याबाबत, राज्यातील टोल वसुलीसंदर्भात निश्चित धोरण ठरवणे असे महत्त्वाचे विषय सभागृहात उपस्थित केले. 

जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारे आमदार, त्यांचे पक्ष, मतदारसंघ आणि त्यांची प्रश्नसंख्या

क्र. आमदाराचे नाव पक्ष मतदारसंघ प्रश्नसंख्या
1 अबू आजमी समाजवादी मानखुर्द 273 
अमित  साटम भाजप  अंधेरी पश्चिम 471 
3 ॲड आशिष  शेलार भाजप वांद्रे पश्चिम 630 
अस्लम  शेख काँग्रेस मालाड पश्चिम 532
5 अतुल भातखळकर भाजप कांदिवली पूर्व 305
6 डॉ. भारती  लव्हेकर भाजप वर्सीवा 224 
7 दिलीप  लांडे  शिवसेना. जून 2022 पासून शिंदे गट  चांदिवली 47 
मंगेश कुडाळकर शिवसेना. जून 2022 पासून शिंदे गट  कुर्ला 165
मनिषा  चौधरी भाजप दहिसर 459
10  मिहिर  कोटेचा भाजप मुलुंड 176
11 पराग अळवणी भाजप विलेपार्ले 352
12  पराग शाह भाजप घाटकोपर पूर्व 240 
13  प्रकाश  सुर्वे शिवसेना. जून 2022 पासून शिंदे गट  मागाठणे 86
14  प्रकाश  फातर्फेकर शिवसेना. जून 2022 पासून ठाकरे गट  चेंबूर 67
15 राम  कदम भाजप घाटकोपर पश्चिम 180 
16  रमेश  कोरगावकर शिवसेना. जून 2022 पासून ठाकरे गट  भांडूप पश्चिम 120
17  रमेश  लटके (11 मे 2022 रोजी निधन) 

ऋतुजा रमेश लटके (नोव्हेंबर 2022 पासून)

शिवसेना

 

शिवसेना (ठाकरे गट)

अंधेरी पूर्व

 

22

18 रविंद्र  वायकर (2019 ते जून 2022: मंत्रीपदी)  मे 24 पर्यंत आमदारपदी शिवसेना. जून 2022 पासून ठाकरे गट. मार्च 2024पासून शिंदे गट. जोगेश्वरी पूर्व 120 
19 संजय  पोतनीस शिवसेना. जून 2022 पासून ठाकरे गट  कलीना   174
20 सुनील  राणे भाजप बोरिवली 193
21 सुनील  राऊत शिवसेना. जून 2022 पासून ठाकरे गट  विक्रोळी 122
22 सुनील  प्रभू शिवसेना. जून 2022 पासून ठाकरे गट  दिंडोशी 344
23 विद्या  ठाकूर भाजप गोरेगाव 30
24 योगेश  सागर भाजप चारकोप 261
25 झिशान  सिद्दीकी काँग्रेस वांद्रे पूर्व 191 
26 नवाब  मलिक. (2019 ते 2022 मंत्री.  फेब्रुवारी  2022  ते ऑगस्ट 2023 अटकेत. या काळासाठी प्रश्न, उपस्थिती लागू नाही.) राष्ट्रवादी कॉंग्रेस   अणुशक्ती नगर 0

 (टीप – काही प्रश्न एकापेक्षा अधिक आमदार उपस्थित करतात. त्यामुळे, आमदारांची प्रश्नसंख्या जिल्ह्याच्या प्रश्नसंख्येपेक्षा जास्त भरते.)

 

14 व्या विधानसभेत मुंबई उपनगर जिल्ह्याशी संबंधित उपस्थित केलेल्या प्रश्नांमधील काही प्रमुख प्रश्न –

  • मुंबई शहर व उपनगरातील धोकादायक इमारतीमधील रहिवाशांच्या पुनर्वसनाचे कोणतेही धोरण नसल्याबाबत
  • राज्यातील टोल वसुलीसंदर्भात निश्चित धोरण ठरवण्याबाबत. 
  • मुंबई उपनगरातील शाळांमध्ये स्वच्छतागृहांची झालेली दुरवस्था,
  • राज्यात विशेषत: मुंबईतील अनधिकृत शाळांवर कारवाई करण्याबाबत,
  • राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत पनवेल येथे अद्ययावत सोयींनी युक्त असे “माता व बाल संगोपन केंद्र” विकसित करण्याबाबत
  • राज्यात दिवसाकाठी 40 नवजात बालकांचा मृत्यू होत असून बहुसंख्य शासकीय प्राथमिक अतिवदक्षता केंद्र (PICU) बालरोग व नवजात अतिदक्षता केंद्र (NICU) येथील गर्दी, अपुरा कर्मचारी वर्ग आणि स्वच्छतेच्या कमतरतेचा त्रास महिलांना भोगावा लागत असून या ठिकाणी नवजात बालके अत्यंत असुरक्षित असण्याबाबत. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Maharashtra CM Devendra Fadnavis : भाजपाचे राज्यातील नेते देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा एकदा एकमताने राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली आहे.
Maharashtra Politics : राज्याचा मुख्यमंत्री कोण असणार याबाबत महायुतीने अद्याप निर्णय घेतलेला नाही आहे. राज्याच्या नवीन सरकारचा आज किंवा उद्या
Maharashtra election Result and Social Media : या संपूर्ण निवडणुकीत सगळ्यांच पक्षांनी सोशल मीडियावरून सुद्धा जोरदार प्रचार केला. आज या

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ