14 व्या अधिवेशनातील एकूण प्रश्न : 5,921
हिंगोली जिल्ह्याची एकूण प्रश्नसंख्या: 193
हिंगोली जिल्ह्याशी संबंधीत प्रश्नसंख्या : 56
विधीमंडळात हिंगोली जिल्ह्याचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या तिन्ही आमदारांनी उपस्थित केल्या प्रश्नांची संख्या चांगली आहेत. या जिल्ह्यातून गेल्या विधानसभेत महिला विषयक एकही प्रश्न उपस्थित केला गेला नव्हता मात्र चौदाव्या विधानसभेत या विषयावर तीन प्रश्न विचारले गेले. राज्यात बलात्कार, विनयभंग, हुंडाबळी व लैंगिक छळासंबंधी 1 लाख 7 हजार 448 गंभीर गुन्हे दाखल असून प्रत्यक्षात त्याचे प्रमाण दीडपट अधिक असण्याची शक्यता पोलीस अधिकारी व्यक्त करत आहेत. या प्रकरणांवर कार्यवाही करण्याबाबत प्रश्न उपस्थित केलेला.
तसेच जिल्ह्यातल्या आरोग्य केंद्रासंबंधीतचे प्रश्न सुद्धा विधीमंडळासमोर उपस्थित करण्यात आले आहेत.
जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारे आमदार, त्यांचे पक्ष, मतदारसंघ आणि त्यांची प्रश्नसंख्या
क्र | आमदाराचे नाव | पक्ष | मतदारसंघ | प्रश्नसंख्या |
1 |
संतोष बांगर | शिवसेना, जून 2023 पासून शिंदे गट | कळमनुरी | 102 |
2 |
तानाजी मुटकुळे | भाजप | हिंगोली | 50 |
3 | चंद्रकांत ऊर्फ राजूभैय्या नवघरे | राष्ट्रवादी, जुलै 2023 पासून शरद पवार गट | वसमत |
51 |
(टीप – काही प्रश्न एकापेक्षा अधिक आमदार उपस्थित करतात. त्यामुळे, आमदारांची प्रश्नसंख्या जिल्ह्याच्या प्रश्नसंख्येपेक्षा जास्त भरते.)
14 व्या विधानसभेत हिंगोली जिल्ह्याशी संबंधित उपस्थित केलेल्या प्रश्नांमधील काही प्रमुख प्रश्न –
- सेनगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचन विहिरीचा लाभ देण्याबाबत
- जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा आणि खनिज उत्खनन
- शिधावाटप केंद्रावरील धान्याचा काळाबाजार
- रस्त्यांची प्रलंबित कामे
- वसमत येथे हळदी पिकांवर पडलेल्या करपा रोग नियंत्रित करण्यासाठी कृषी अधिकाऱ्यांनी कार्यवाही न केल्याबाबत
- कळमनुरी तालुक्यातील नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत अधिकाऱ्यांनी केलेला गैरव्यवहार
- औंढा तालुक्यातील मौजे जवळबाजार येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वजन काट्यात होत असलेला गैरप्रकार
- हिंगोली जिल्ह्यात पाणी नमुने दूषित आढळून आल्याबाबत
- तसेच कळमनुरी नगर परिषदेत पंतप्रधान आवास योजनेतील घरकुल निधीत झालेला गैरव्यवहार इत्यादी महत्त्वपूर्ण प्रश्न सभागृहात उपस्थित केले.