14 व्या अधिवेशनातील एकूण प्रश्न : 5,921
बीड जिल्ह्याची एकूण प्रश्नसंख्या: 323
बीड जिल्ह्याशी संबंधित प्रश्नसंख्या : 84
बीड जिल्ह्यातून परळी मतदारसंघांचे आमदार राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी सर्वाधीक 131 प्रश्न उपस्थित केले आहेत. तर गेवराई मतदारसंघाचे भाजप आमदार लक्ष्मण पवार यांनी गेल्या पाच वर्षात 20 प्रश्न मांडले आहेत.
महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलने ऑनलाईन नोंदणी करुन घेतलेल्या नर्सेसची नेमणूक बोगस असल्याबाबत, राज्यात राबविण्यात आलेल्या क्षयरोग रुग्ण शोध मोहिमेबाबत, राज्यातील खाजगी रुग्णालयांकडून महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेची अंमलबजावणी होत नसल्याबाबत आणि जिल्ह्यात श्रेणीवर्धीत झालेले ग्रामीण रुग्णालय कार्यान्वित करण्याबाबतचे प्रश्न उपस्थित केले आहेत.
जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारे आमदार, त्यांचे पक्ष, मतदारसंघ आणि त्यांची प्रश्नसंख्या
क्र | आमदाराचे नाव | पक्ष | मतदारसंघ | प्रश्नसंख्या |
1 | प्रकाश सोळंके | राष्ट्रवादी काँ, जुलै 2023 पासून अजित पवार गट | माजलगाव | 56 |
2 | नमिता मुंदडा | भाजप | केज | 63 |
3 | लक्ष्मण पवार | भाजप | गेवराई | 20 |
4 | संदीप क्षिरसागर | राष्ट्रवादी काँ, जुलै 2023 पासून शरद पवार गट | बीड | 86 |
5 | बाळासाहेब आजबे | राष्ट्रवादी काँ, जुलै 2023 पासून अजित पवार गट | आष्टी | 76 |
6 | धनंजय मुंडे, मंत्री | राष्ट्रवादी काँ, जुलै 2023 पासून अजित पवार गट | परळी | 131 |
(टीप – काही प्रश्न एकापेक्षा अधिक आमदार उपस्थित करतात. त्यामुळे, आमदारांची प्रश्नसंख्या जिल्ह्याच्या प्रश्नसंख्येपेक्षा जास्त भरते.)
14 व्या विधानसभेत बीड जिल्ह्याशी संबंधित उपस्थित केलेल्या प्रश्नांमधील काही प्रमुख प्रश्न –
- बीड नगरपरिषदे अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेत केलेल्या कामामध्ये झालेला गैरव्यवहार
- गेवराई येथील नऊ रस्त्यांच्या कामांचा मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा दोन मध्ये समावेश करण्याबाबत,
- बीड जिल्ह्यात टँकरने पाणी पुरवठा करण्याच्या कामात झालेली अनियमितता
- बीड जिल्हा परिषदे अंतर्गत माध्यमिक शाळांकरिता प्रयोगशाळा उभारणी (ICT LAB) व साहित्य खरेदीत झालेला गैरव्यवहार
- जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत निविदा प्रक्रियेत झालेली अनियमितता
- जिल्ह्यात 2018 ते 2021 या कालावधीत देवस्थान, दर्गा, मस्जिद, इनामी अशा स्वरूपाच्या हजारो एकर जमीन तत्कालीन उपजिल्हाधिकाऱ्यांनी खाजगी व्यक्तींच्या नावे करण्याचे नियमबाह्य आदेश पारीत केल्यानंतरच्या अपेक्षित कारवाईबाबत
- अंबाजोगाई येथील शासकीय धान्य गोदामात झालेल्या गैरकारभाराबाबत
- माजलगाव नगर परिषदेमध्ये झालेला गैरव्यवहार इत्यादी प्रश्न सभागृहात उपस्थित करण्यात आले.