अहमदनगर जिल्ह्यातील आमदारांचं प्रगतीपुस्तक

Ahmadnagar : अहमदनगर मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात यांनी सर्वाधिक  395  प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याखालोखाल आ. रोहित पवार यांनी 289 प्रश्न सभागृहात उपस्थित केले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील अनेक आमदारांनी उत्तम प्रकारे सभागृहात विविध विषयांवरील प्रश्न विचारले आहेत. 
[gspeech type=button]

14 व्या अधिवेशनातील एकूण प्रश्न : 5,921

अहमदनगर जिल्ह्याची एकूण प्रश्नसंख्या: 1067

अहमदनगर जिल्ह्याशी संबंधीत प्रश्नसंख्या : 59

अहमदनगर मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात यांनी सर्वाधिक  395  प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याखालोखाल आ. रोहित पवार यांनी 289 प्रश्न सभागृहात उपस्थित केले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील अनेक आमदारांनी उत्तम प्रकारे सभागृहात विविध विषयावरील प्रश्न विचारले आहेत. 

अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा खोल्यांची मोठ्या प्रमाणात झालेली पडझड, कातकरी आणि अन्य आदिवासींच्या मुलांना वेठबिगारी करायला लावण्यतून निर्माण होणार्‍या समस्या, अकोले तालुक्यातील शिरपुंजे येथील शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना अधीक्षक अश्विन पाईकराव यांनी पेटत्या लाकडाने केलेली अमानुष मारहाण, जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहांमधील विद्यार्थ्यांना सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबतचे प्रश्न गेल्या पाच वर्षातील अधिवेशनात उपस्थित केले आहेत. 

जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारे आमदार, त्यांचे पक्ष, मतदारसंघ आणि त्यांची प्रश्नसंख्या

क्र. आमदाराचे नाव पक्ष मतदारसंघ प्रश्नसंख्या
1 राधाकृष्ण  विखे-पाटील, मंत्री, जुलै 2022 पासून  भाजप  शिर्डी  199
2 निलेश  लंके,  मे  2024 पर्यंत आमदारपदी   राष्ट्रवादी काँ, शरद पवार गट पारनेर  158
3 रोहित पवार  राष्ट्रवादी काँ, जुलै  2023  पासून शरद पवार गट  कर्जत जामखेड 289
4 संग्राम  जगताप राष्ट्रवादी काँ, जुलै  2023  पासून अजित पवार गट अहमदनगर शहर 44
5 बबनराव  पाचपुते  भाजप श्रीगोंदा  9
6 लहु  कानडे काँग्रेस श्रीरामपूर 205
7 मोनिका राजळे  भाजप शेवगाव 95
8 आशुतोष काळे राष्ट्रवादी काँ, जुलै 2023 पासून अजित पवार गट   कोपरगाव 17
9 डॉ. किरण लहामटे  राष्ट्रवादी कॉं,  जुलै 2023 पासून शरद पवार गट  अकोले 46
10 प्राजक्त तनपुरे, मंत्री, जून 2022 पर्यंत राष्ट्रवादी काँ, जुलै 2023  पासून शरद पवार गट   राहुरी 38
11 शंकरराव गडाख, मंत्री, जून 2022 पर्यंत क्रांतिकारी शेतकरी पार्टी   नेवासा 4
12 बाळासाहेब थोरात, मंत्री जून 2022 पर्यंत  काँग्रेस  संगमनेर  395

(टीप – काही प्रश्न एकापेक्षा अधिक आमदार उपस्थित करतात. त्यामुळे, आमदारांची प्रश्नसंख्या जिल्ह्याच्या प्रश्नसंख्येपेक्षा जास्त भरते.)

 

14 व्या विधानसभेत अहमदनगर जिल्ह्याशी संबंधित उपस्थित केलेल्या प्रश्नांमधील काही प्रमुख प्रश्न – 

  • श्रीगोंदा येथे स्वस्त धान्याचा काळाबाजार होत असल्याबाबत
  •  अकोले मतदारसंघातील सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्राम सडक योजना मधील घेतलेल्या कामात ठेकेदाराकडून होत असलेली दिरंगाई
  •  सन 2018-19 व  2019 – 20 या वर्षात अहमदनगर जिल्ह्याचा टंचाई आराखडा अंमलात आणण्यातील समस्या 
  • जिल्ह्यातील मुळा, प्रवरा व गोदावरी नदीपात्रातून होत असलेली अवैध वाळू तस्करी
  • संगमनेर तालुक्यातील कारखान्यांमुळे प्रवरा नदीचे पाणी प्रदूषित होत असल्याबाबत
  • जिल्हयात बेकायदा गुटखा आणि मावा निर्मिती होऊन विक्री होत असल्याबाबत
  • जिल्हा परिषदेतील विकास कामांसाठीचा मंजूर निधी अखर्चित राहिल्याबाबत

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Maharashtra CM Devendra Fadnavis : भाजपाचे राज्यातील नेते देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा एकदा एकमताने राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली आहे.
Maharashtra Politics : राज्याचा मुख्यमंत्री कोण असणार याबाबत महायुतीने अद्याप निर्णय घेतलेला नाही आहे. राज्याच्या नवीन सरकारचा आज किंवा उद्या
Maharashtra election Result and Social Media : या संपूर्ण निवडणुकीत सगळ्यांच पक्षांनी सोशल मीडियावरून सुद्धा जोरदार प्रचार केला. आज या

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ