सोशल मीडियावरही विधानसभा निकालाचा जल्लोष

Maharashtra election Result and Social Media : या संपूर्ण निवडणुकीत सगळ्यांच पक्षांनी सोशल मीडियावरून सुद्धा जोरदार प्रचार केला. आज या माध्यमांवर जल्लोषाचं ही वातावरण बघायला मिळतंय.
[gspeech type=button]

विधानसभा निवडणूक 2024 मध्ये जनतेंनी महायुतीला स्पष्ट कौल दिला आहे. तर भाजपाने 132 जागांवर विजयी पताका फडकावून क्रमांक एकचा बहुमान मिळवला आहे. 

महायुती की महाआघाडी, शरद पवार की देवेंद्र फडणवीस, शरद पवार की अजित पवार, उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे अशा लढतीची ही निवडणूक होती. 

या संपूर्ण निवडणुकीत सगळ्यांच पक्षांनी सोशल मीडियावरून सुद्धा जोरदार प्रचार केला. आज या माध्यमांवर जल्लोषाचं ही वातावरण बघायला मिळतंय. 

या निवडणुकीत विजयी झालेल्या सर्वच उमेदवारांवर सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ट्विट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकास जिंकला, सुप्रशासना विजय असं म्हणत महायुतीला विजयी केल्याबद्दल सर्व मतदारांचे आभार मानले आहेत. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं ट्विट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही कौल जनतेचा, महाविजय महायुतीचा असं ट्विट करत सर्व मतदारांचे आभार मानले आहेत. आणि सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन केलं आहे. 

 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं ट्विट

निकाल स्पष्ट होऊ लागल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्यात पहिल्यांदा ‘एक है, तो सेफ है’ ‘मोदी है तो मुमकीन है’ असं ट्विट केलं. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं ट्विट

विजय जनमताचा, विजय लोकशाहीचा..! विजय सत्याचा, विजय सर्वधर्म समभावाचा..! असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही ट्विट च्या माध्यमातून मतदारांचे आभार मानले आहेत. 

दरम्यान, पराभूत झालेल्या महाआघाडीतील नेत्यांनी सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट करण्याचं टाळलं आहे. 

सोशल मीडियावरून नेटकऱ्यांनी सुद्धा मीम्सच्या माध्यमातून महायुतीच्या विजयावर आणि महाआघाडीच्या पराभवावर  टिप्पणी केली आहे. 

एका नेटकऱ्यांनी देवेंद्र फडणवीस यांची ताकद दाखवण्यासाठी मराठी आणि हिंदी अशा संमिश्र भाषेत  मीम्स करत त्यावर,  ‘पुरणपोळी खाने वाला समजा है क्या? पुरून उरने वाला है मैं’ असं पुष्पा सिनेमातील दृष्यावर आधारित मीम तयार केलं आहे. 

तर आणखीन एका नेटकऱ्यांने, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांच्या मांडीवर जरांगे पाटील यांचा फोटो लावत ‘ह्याला म्हणतेत सुफडा साफ म्हणजे सुफडा साफ’ असं मीम तयार केलं आहे. 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Maharashtra CM Devendra Fadnavis : भाजपाचे राज्यातील नेते देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा एकदा एकमताने राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली आहे.
Maharashtra Politics : राज्याचा मुख्यमंत्री कोण असणार याबाबत महायुतीने अद्याप निर्णय घेतलेला नाही आहे. राज्याच्या नवीन सरकारचा आज किंवा उद्या
Mahayuti Victory : विधानसभा निवडणूक 2024 मध्ये महायुतीने दणदणीत विजय मिळवला आहे. महायुतीला या निवडणुकीत 231 जागा मिळाल्या आहेत. तर

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ