14 व्या अधिवेशनातील एकूण प्रश्न : 5,921
नागपूर जिल्ह्याची एकूण प्रश्नसंख्या : 1,031
नागपूर जिल्ह्याशी संबंधित प्रश्न : 143
नागपूर जिल्ह्यातून सर्वात जास्त प्रश्न नागपूर पश्चिम मतदारसंघांचे काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी सगळ्यात जास्त 470 प्रश्न सभागृहात उपस्थित केलेले. त्यानंतर सावनेर मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांनी सुद्धा 370 प्रश्न मांडले आहेत.
तर भाजपा आमदार कृष्णा खोपडे यांनी गेल्या पाच वर्षात केवळ 7 प्रश्न सभागृहात उपस्थित केले आहेत.
दरम्यान आरोग्य, शालेय शिक्षण, बालक, महिला अत्याचार, शेतकरी व सिंचन या विषयाशी संबंधित प्रश्न विचारले आहेत.
जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारे आमदार, त्यांचे पक्ष, मतदारसंघ आणि त्यांची प्रश्नसंख्या
क्र | आमदाराचे नाव | पक्ष | मतदारसंघ | प्रश्नसंख्या |
1 | अनिल देशमुख, 2021 पर्यंत मंत्री | राष्ट्रवादी काँग्रेस, जुलै 2023 पासून शरद पवार गट | काटोल | 61 |
2 | आशिष जैस्वाल | अपक्ष | रामटेक | 37 |
3 | देवेंद्र फडणवीस | भाजप | नागपूर दक्षिण-पश्चिम | 195 |
4 | कृष्णा खोपडे | भाजप | नागपूर पूर्व | 7 |
5 | मोहन मते | भाजप | नागपूर दक्षिण | 163 |
6 | डॉ. नितीन राऊत | काँग्रेस | नागपूर उत्तर (अ.जा.) | 144 |
7 | राजू पारवे | काँग्रेस | उमरेड (अ.जा.) | 66 |
8 | समीर मेघे | भाजप | हिंगणा | 58 |
9 | सुनील केदार | काँग्रेस | सावनेर | 370 |
10 | टेकचंद सावरकर | भाजप | कामठी | 24 |
11 | विकास ठाकरे | काँग्रेस | नागपूर पश्चिम | 470 |
12 | विकास कुंभारे | भाजप | नागपूर मध्य | 13 |
टीप – काही प्रश्न एकापेक्षा अधिक आमदार उपस्थित करतात. त्यामुळे, आमदारांची प्रश्नसंख्या जिल्ह्याच्या प्रश्नसंख्येपेक्षा जास्त भरते.
14 व्या विधानसभेत नागपूर जिल्ह्याशी संबंधित उपस्थित केलेल्या प्रश्नांमधील काही प्रमुख प्रश्न –
- मुंबई ते नागपूर या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गाची झालेली दुरवस्था तसंच या महामार्गासाठी खरेदी केलेल्या जमिनीत झालेला गैरव्यवहार
- जिल्हयातील मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना सकस आहार पुरविण्याबाबत
- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर येथील नवीन वस्तीगृहाच्या बांधकामाबाबत
- शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत नागपूर विभागातील दुष्काळग्रस्त गावांमधील शाळांना अनुदान मिळाले नसल्याबाबत
- नागपूर भूमी अभिलेख कार्यालयातील जमीन मोजणीची प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्याबाबत
- पतंजली समुहास नागपूर येथे दिलेली जमीन विनावापर पडून असल्याबाबत
- नागपूर येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आवश्यक आरोग्यसुविधा उपलब्ध करुन देणे
- विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर व गोंदिया जिल्हा मानव विकास निर्देशांकामध्ये मागास असल्याबाबतचा प्रश्नदेखील नागपूर जिल्ह्यातून उपस्थित केला गेला.