कोल्हापूरमधील आमदारांचं सभागृहातलं प्रगतीपुस्तक

Kolhapur :14 विधानसभेच्या काळात कोल्हापूर उत्तर मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणूकीमध्ये जयश्री चंद्रकांत जाधव या कोल्हापूरच्या पहिल्या महिला आमदार म्हणून निवडून आल्या. 
[gspeech type=button]

14 व्या अधिवेशनातील एकूण प्रश्न : 5,921

कोल्हापूर जिल्ह्याची एकूण प्रश्नसंख्या: 467 

कोल्हापूर जिल्ह्याशी संबंधित प्रश्न : 52

कोल्हापूर जिल्ह्यातून सर्वाधिक प्रश्न कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार ऋतुराज पाटील यांनी विचारले आहेत. या प्रश्नांमध्ये आरोग्य, शालेय शिक्षण, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि गैरवर्तनाशी संबंधित सर्वाधिक प्रश्नांचा समावेश आहे. 

याचबरोबर या 14 विधानसभेच्या काळात कोल्हापूर उत्तर मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणूकीमध्ये जयश्री चंद्रकांत जाधव या कोल्हापूरच्या पहिल्या महिला आमदार म्हणून निवडून आल्या. 

कोल्हापूर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारे आमदार, त्यांचे पक्ष, मतदारसंघ आणि त्यांची प्रश्नसंख्या

 

क्र. आमदाराचे नाव पक्ष मतदारसंघ प्रश्नसंख्या
1 चंद्रकांत  जाधव (21 नोव्हेंबर 2021 रोजी निधन)

जयश्री  जाधव (एप्रिल 2022 पासून)

काँग्रेस

 

कॉंग्रेस

कोल्हापूर  उत्तर 10

 

98

2 हसन  मुश्रीफ राष्ट्रवादी कॉंग्रेस. जुलै 2023 पासून अजित पवार गट कागल 100
3 पी. एन. पाटील (सडोलीकर) काँग्रेस करवीर 11
4 प्रकाश  आबिटकर शिवसेना. जून 2022 पासून शिंदे गट राधानगरी 58
5 प्रकाश आवाडे अपक्ष इचलकंरजी 1
6 राजेश  पाटील राष्ट्रवादी कॉंग्रेस. जुलै 2023 पासून अजित पवार गट चंदगड 75
7 राजू  आवळे काँग्रेस हातकणंगले (अ.जा.) 68
8 ऋतुराज  पाटील काँग्रेस कोल्हापूर दक्षिण 133
9 डॉ. विनय  कोरे जनसुराज्य शक्ती पक्ष शाहूवाडी 23
10 राजेंद्र शामगोंडा पाटील अपक्ष शिरोळ 0

टीप – काही प्रश्न एकापेक्षा अधिक आमदार उपस्थित करतात. त्यामुळे, आमदारांची प्रश्नसंख्या जिल्ह्याच्या प्रश्नसंख्येपेक्षा जास्त भरते. 

14 व्या विधानसभेत कोल्हापूर जिल्ह्याशी संबंधित उपस्थित प्रश्नांमधील काही प्रमुख प्रश्न –  

  • कोल्हापूर जिल्हयातील राज्य परिवहन महामंडळाच्या पात्र चालक व वाहकांना नियुक्ती पत्र देण्याबाबत
  •  ॲडव्हेंचर पार्कच्या कामांमध्ये झालेला गैरव्यवहार
  • कोल्हापूर वन विभागामध्ये मुख्यवनसंरक्षक क्लेमेन बेन व उपवनसंरक्षक एस. एस. धुमाळ यांच्या कार्यकाळात जिल्ह्यातील जंगलक्षेत्रामधील गैरकारभाराबाबत
  • कृष्णा खोरे विकास महामंडळांतर्गत कार्यकारी अभियंता स्तरावर सुरु असलेली कामे ठराविक ठेकेदारांना देण्याकरता जलसंपदा विभागाच्या शासन शुद्धीपत्रकाचा आधार घेत ठराविकच ठेकेदारांना जिओ-टॅगिंग सुविधा उपलब्ध करून देण्याकरता अधिकारांचा झालेला गैरवापर
  • चांदोली (ता.शाहूवाडी) येथील कडवी मध्यम प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातून चांदोली, जावली व वारुळ या गावातील एकूण 244  हेक्टर जमीन वगळण्याबाबत
  • कोल्हापूर जिल्ह्यातील सहकारी साखर कारखाने, सूतगिरण्या, दूध संघ, स्थानिक स्वराज्य संस्था, सरकारी भाग भांडवल घेतलेल्या संस्था, खासगी शिक्षणसंस्था यासह अन्य 44 मोठ्या संस्थातील वर्ग-3 आणि वर्ग-4 च्या एकूण पद भरतीमध्ये 5 टक्के जागांवर पुर्नवसन कायद्यानुसार प्रकल्पग्रस्त बेरोजगारांना संधी न दिल्याबद्दल प्रश्न उपस्थित केला गेला.
  • भुदरगड तालुक्यातील मेघोली लघुपाटबंधारे प्रकल्प अचानक फुटल्याने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान
  • कोल्हापूर जिल्हयातील ग्रामीण रस्त्यांच्या दुरुस्तीकरिता निधी उपलब्ध करुन देण्यासंबंधित.
  • कोल्हापूर चित्रनगरीतील दुसऱ्या टप्प्यातील कामे प्रलंबित आहेत
  • कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रकल्पग्रस्तांची राजरोसपणे आर्थिक लुबाडणूक होत असल्याबाबत तसेच त्यांच्या इतर अनेक अडचणींसंबंधित प्रश्न विचारले गेले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Maharashtra CM Devendra Fadnavis : भाजपाचे राज्यातील नेते देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा एकदा एकमताने राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली आहे.
Maharashtra Politics : राज्याचा मुख्यमंत्री कोण असणार याबाबत महायुतीने अद्याप निर्णय घेतलेला नाही आहे. राज्याच्या नवीन सरकारचा आज किंवा उद्या
Maharashtra election Result and Social Media : या संपूर्ण निवडणुकीत सगळ्यांच पक्षांनी सोशल मीडियावरून सुद्धा जोरदार प्रचार केला. आज या

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ