WPL Auction 2025: धारावीतील सिमरन शेख ठरली सर्वात महागडी खेळाडू

WPL Auction : महिला प्रीमियर लीग (WPL) 2025 च्या लिलावात धारावी झोपडपट्टीत राहणारी सिमरन शेख चर्चेचा विषय ठरली आहे. गुजरात जायंट्सने तिला तब्बल 1.90 कोटी रुपयांना आपल्या संघात सामील करून घेतले. सिमरन शेख लिलावासाठी 10 लाखांच्या बेस प्राईसने उतरली होती, मात्र तिला मूळ किमतीपेक्षा 19 पट जास्त रक्कम मिळाली आहे.
[gspeech type=button]

महिला प्रीमियर लीग (WPL) 2025 च्या लिलावात धारावी झोपडपट्टीत राहणारी सिमरन शेख चर्चेचा विषय ठरली आहे. गुजरात जायंट्सने तिला तब्बल 1.90 कोटी रुपयांना आपल्या संघात सामील करून घेतले. सिमरन शेख लिलावासाठी 10 लाखांच्या बेस प्राईसने उतरली होती, मात्र तिला मूळ किमतीपेक्षा 19 पट जास्त रक्कम मिळाली आहे.

कोण आहे सिमरन शेख ?

सिमरन शेख ही मुंबईच्या धारावी भागातील खेळाडू आहे. तिचे वडील वायरमन असून, 11 जणांच्या मोठ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे त्यांच्या पगारावर कठीण होते. 22 वर्षांची सिमरन ही आठ भावंडांमधील तिसरी मुलगी आहे. तिला 4 बहिणी आणि 3 भाऊ आहेत, सिमरनने तिचे  शिक्षण सोडून क्रिकेटवर लक्ष केंद्रित केले.

गेल्या वर्षी WPL 2023 मध्ये यूपी वॉरियर्सने तिला 10 लाख रुपयांना करारबद्ध केले होते. महिला चॅलेंजर ट्रॉफीमध्ये तिने 200 च्या स्ट्राईक रेटने शानदार खेळी केली होती. 2024 मध्ये ती अनसोल्ड राहिली. पण WPL 2025 मध्ये ती सर्वात महागडी खेळाडू ठरली आहे.

सिमरन शेखचा संघर्ष आणि यश

एकेकाळी क्रिकेट किट घेण्यासाठी संघर्ष करणाऱ्या सिमरनने लिलावातील महागडी खेळाडू ठरल्यानंतर इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितलं की, “हा आनंद व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे पुरेसे शब्द नाहीत. लिलावाच्या आदल्या रात्रीपर्यंत मी हीच आशा करत होती की, एखाद्या तरी फ्रँचायझीने मला संघात सामील करावं. लिलावात गुजरात जायंट्सने मला संघात सामील केल्यानंतर एकमागून एक कॉल येत आहेत. एक काळ असा होता की, क्रिकेट किट घेण्यासाठी खूप कष्ट करावे लागत होते. पण आज मला जे काही मिळाले आहे, ते फक्त क्रिकेटमुळे आहे”. सिमरन सध्या महिला वनडे ट्रॉफीमध्ये मुंबई संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. तिच्या मेहनतीने आणि संघर्षातून तिने आपले स्वप्न साकार केले आहे.

WPL 2025 Auction टॉप-5 खेळाडू

सिमरन शेख, जी.जी

मूळ किंमत ₹10 लाख

किंमत: ₹1.90 कोटी

 

डिआंड्रा डॉटिन, जीजी

मूळ किंमत ₹50 लाख

किंमत ₹1.70 कोटी

 

जी कमलिनी, एमआय

मूळ किंमत ₹10 लाख

किंमत: ₹1.60 कोटी

 

प्रेमा रावत, आरसीबी

मूळ किंमत ₹10 लाख

किंमत: ₹1.20 कोटी

 

एन चरणी, DC

मूळ किंमत ₹10 लाख

किंमत: ₹55 लाख

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Stubble Burning : ऑक्टोबर - नोव्हेंबर महिन्यामध्ये पंजाब, हरियाणा, मध्यप्रदेश राजस्थान या राज्यात मोठ्या प्रमाणावर शेतकचरा पेंढा जाळला जातो. यामुळे
Sunday holiday: ब्रिटिश सरकारने मागण्या नाकारल्यावर लोखंडे यांनी देशभरात मोठं आंदोलन केलं. त्यांनी विविध ठिकाणी सभा घेतल्या, मोर्चे काढले आणि
Passport rules: भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पासपोर्टच्या नियमांमध्ये एक महत्त्वपूर्ण बदल केला आहे. या बदलामुळे आता पती-पत्नीला त्यांच्या पासपोर्टमध्ये एकमेकांचं नाव

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ