केरळमध्ये आता समुद्री विमानाची सफर, केरळ पर्यटनाला मिळणार चालना

Kerala Sea Plane : केरळमधील पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी केरळ सरकारकडून सीप्लेन प्रकल्प सुरु करण्यात येत आहे. आज या सीप्लेनची यशस्वी चाचणी पार पडली. या प्रकल्पामुळे पर्यटकांना केरळचे हवाई दर्शन ही घेता येणार आहे.
[gspeech type=button]

देवाची भूमी म्हणून  केरळला ओळखलं जातं. पर्यटनाकरता केरळ चांगलच लोकप्रिय आहे. पर्यटन क्षेत्राला आणखीन मजबूत करण्यासाठी केरळ राज्याने आता सीप्लेन सुरु केलं आहे. केरळमधील विविध पर्यटन स्थळांना भेटी देताना रस्ते वाहतुकीमध्ये प्रवाशांचा खूप वेळ खर्ची होतो. याला पर्याय म्हणून आणि पर्यटकांना केरळ राज्याचे हवाई दर्शन घेता यावं यासाठी ‘सीप्लेन प्रकल्प’ सुरु करण्यात आला आहे. 

यशस्वी सीप्लेन राइड

केरळ राज्याने आता राज्यातंर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्यातील पर्यटन स्थळांना जोडणाऱ्या मार्गीकेवरुन सीप्लेनची सुविधा सुरु केली आहे. आज या सीप्लेन राइडची चाचणी घेण्यात आली. यापूर्वी दोनदा सीप्लेनचा प्रयत्न केरळ सरकारने केलेला.मात्र, तो अयशस्वी ठरलेला. यावेळेस मात्र राज्याचे पर्यटन मंत्री  पी ए मोहम्मद रियास यांच्या नेतृत्वाखालील ही चाचणी यशस्वी झाली. 

रविवार, 10 नोव्हेंबर रोजी कोची विमानतळाजवळील बोल्गुटी धरणावर हे सीप्लेन आणण्यात आलं होतं. त्यानंतर आज बोल्गुटी डॅम ते इडुकी येथील मट्टुपेटी धरण अशी प्रवास चाचणी घेतली.  

सुरुवातील कोची विमानतळ ते मुन्नार या मार्गावर ही सीप्लेन सुविधा सुरू करणार आहेत.

कसं असणार सीप्लेन? 

सीप्लेन हे असं विमान आहे जे की, जमिनीवरुन किंवा पाण्यावरुन टेक ऑफ आणि लँडिग करु शकते.  केरळ राज्यातंर्गत असलेली विमानतळं आणि जलाशयांना जोडणारी ही सुविधा आहे. 

हे विमान डी हॅविलँड या कॅनडास्थित कंपनीकडून बनवून घेण्यात आलं आहे. 

या विमानमध्ये 17 प्रवासी प्रवास करु शकतात. यामध्ये इतर विमानासह विमान क्रू, व्हिआयपी सुविधा, मेडिकल सुविधा आणि अन्य इमर्जन्सी सुविधांही उपलब्ध असणार आहेत. 

या विमानाला उड्डाण करण्यासाठी 800 मीटरचा रन-वे पुरेसा आहे. तर पाण्यावर उतरण्यासाठी या विमानाला 2  फूटापर्यंतची खोली आवश्यक आहे.  

सीप्लेन प्रकल्पाचा प्रस्तावित मार्ग

केंद्र सरकारच्या ‘उडाण या योजने’तंर्गत केरळ सरकारच्या नेतृत्वाखाली सीप्लेन प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात कोची इथल्या नेदुम्बसेरी विमानतळ तर बोल्गुट्टी असा मार्ग सुरु करण्यात येणार आहे. 

पुढच्या टप्प्यात कोवलम, कुमारकोम, बानासुरा सागर आणि मट्टुपेट्टी या जलाशयांना जोडणार आहेत.  

हत्तींच्या मार्गिकेवर अतीक्रमण होईल का? 

मट्टुपेट्टी धरण हे हत्तींच्या कॉरिडोरचा भाग आहे. या भागातून हत्ती हे मुन्नार इथल्या इको पॉइंटकडे ये-जा करीत असतात. त्यामुळे सीप्लेन सुरु झाल्यावर या विमानाच्या लॅंडिग आवाजाने या कॉरिडोरवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो अशी शक्यता वनखात्याकडून व्यक्त केली जात आहे. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Stubble Burning : ऑक्टोबर - नोव्हेंबर महिन्यामध्ये पंजाब, हरियाणा, मध्यप्रदेश राजस्थान या राज्यात मोठ्या प्रमाणावर शेतकचरा पेंढा जाळला जातो. यामुळे
Sunday holiday: ब्रिटिश सरकारने मागण्या नाकारल्यावर लोखंडे यांनी देशभरात मोठं आंदोलन केलं. त्यांनी विविध ठिकाणी सभा घेतल्या, मोर्चे काढले आणि
Passport rules: भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पासपोर्टच्या नियमांमध्ये एक महत्त्वपूर्ण बदल केला आहे. या बदलामुळे आता पती-पत्नीला त्यांच्या पासपोर्टमध्ये एकमेकांचं नाव

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ