नेपाळ सरकारने माउंट एव्हरेस्ट चढाईसाठी परवानगी शुल्कात केली 36% वाढ

Mount Everest: माउंट एव्हरेस्ट चढाईसाठी घेतल्या जाणाऱ्या परवानगी शुल्कामध्ये आता 36% नी वाढ होणार आहे. नेपाळ पर्यटन विभागाचे महासंचालक नारायण प्रसाद रेग्मी यांनी बुधवारी याबाबत माहिती दिली. ही वाढ जवळपास दहा वर्षांनंतर होत आहे.
[gspeech type=button]

माउंट एव्हरेस्ट चढाईसाठी घेतल्या जाणाऱ्या परवानगी शुल्कामध्ये आता 36% नी वाढ होणार आहे. नेपाळ पर्यटन विभागाचे महासंचालक नारायण प्रसाद रेग्मी यांनी बुधवारी याबाबत माहिती दिली. ही वाढ जवळपास दहा वर्षांनंतर होत आहे. या शुल्कात वाढ करून नेपाळ सरकार गिर्यारोहणासाठी पोर्टर्स (सामान वाहणारे), कामगार आणि मार्गदर्शकांसाठी विमा, पगार आणि इतर सुविधांमध्ये सुधारणा करणार आहे.

माउंट एव्हरेस्ट, हे जगातील सर्वोच्च शिखर असून, दरवर्षी जगभरातील हजारो गिर्यारोहक इथे गिर्यारोहणासाठी येतात.
माउंट एव्हरेस्टची उंची 8,849 मीटर (29,032 फूट) आहे. हे शिखर सर करण्यासाठी परदेशी गिर्यारोहकांना गेल्या दहा वर्षांपासून $11,000 ( 9 लाख 14 हजार रुपये) शुल्क मोजावे लागत होते. आता हे शुल्क $15,000 (12 लाख रुपये आहे ) इतके असणार आहे. हे नवीन दर येत्या सप्टेंबरपासून लागू करण्यात येतील. यावेळी जे गिर्यारोहक पुढील वर्षीच्या एप्रिल- मे या सीजनसाठी नोंदणी करतील त्यांना या 36% वाढलेल्या दराने शुल्क द्यावे लागेल.

तर, डिसेंबर ते फेब्रुवारी आणि जून ते ऑगस्ट दरम्यान प्रति व्यक्ती परमिट शुल्क US $ 2,750 वरून US $ 3,750 पर्यंत वाढले आहे. म्हणजेच फीमध्ये 80,000 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यासोबतच, नेपाळी गिर्यारोहकांसाठीदेखील परमिट शुल्कात वाढ केली आहे. नेपाळ पर्यटन मंडळाच्या संचालिका आरती न्यौपाने यांनी सांगितले की, यासंदर्भात मंत्रिमंडळाचा निर्णय आधीच घेण्यात आला आहे. परंतु अधिकृत घोषणा होणे बाकी आहे..

या शुल्कवाढीबद्दल खूप आधीपासूनच चर्चेला सुरुवात झाली होती. परंतु यामुळे गिर्यारोहकांची संख्या कमी होणार नाही, असा मोहिम आयोजकांचा विश्वास आहे. माउंट एव्हरेस्टवर दरवर्षी मोठ्या संख्येने गिर्यारोहक चढाई करतात आणि प्रत्येक वर्षी सुमारे 300 गिर्यारोहकांना परवाने दिले जातात.

माउंट एव्हरेस्टवर दरवर्षी मोठ्या संख्येने गिर्यारोहक चढाई करतात. त्यामुळे या शिखरावर कचऱ्याचा प्रश्न आणि सुरक्षा संबंधित समस्या सतत चर्चेत राहतात. नेपाळ सरकारने पर्वताच्या स्वच्छतेसाठी नियमितपणे स्वच्छता मोहिमा आयोजित केल्या आहेत. त्याचबरोबर रस्सी बांधणे आणि इतर सुरक्षा सुविधांचाही समावेश आहे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Stubble Burning : ऑक्टोबर - नोव्हेंबर महिन्यामध्ये पंजाब, हरियाणा, मध्यप्रदेश राजस्थान या राज्यात मोठ्या प्रमाणावर शेतकचरा पेंढा जाळला जातो. यामुळे
Sunday holiday: ब्रिटिश सरकारने मागण्या नाकारल्यावर लोखंडे यांनी देशभरात मोठं आंदोलन केलं. त्यांनी विविध ठिकाणी सभा घेतल्या, मोर्चे काढले आणि
Passport rules: भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पासपोर्टच्या नियमांमध्ये एक महत्त्वपूर्ण बदल केला आहे. या बदलामुळे आता पती-पत्नीला त्यांच्या पासपोर्टमध्ये एकमेकांचं नाव

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ