निवडणुकीच्या उत्सवासाठी निवडणूक आयोग सज्ज

Maharashtra Voting Day : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उद्या 20 नोव्हेंबरमध्ये राज्यभरात मतदान होणार आहे. राज्यभरात 9 कोटी 64 लाख 85 हजार 765 मतदार आहेत. यंदा 2 किलोमीटरच्या अंतरावर मतदान केंद्राची व्यवस्था. तर वय वर्ष 85 आणि त्यावरील वृद्ध मतदारांना आणि 40 टक्क्याहून अधिक दिव्यांगत्व असलेल्या मतदारांच्या घरात मतदानाच्यी सुविधा.
[gspeech type=button]

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उद्या 20 नोव्हेंबरमध्ये राज्यभरात मतदान होणार आहे. सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची वेळ असणार आहे. राज्यात जास्तीत जास्त लोकांनी मतदानात सहभागी व्हावं यासाठी निवडणूक आयोगाकडून अनेक सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न केला आहे. 

गृहसंकुलातही मतदान केंद्र

राज्यभरात 2024च्या निवडणुकीत 9 कोटी 64 लाख 85 हजार 765 मतदार आहेत. यापैकी 20 लाख 93 हजार 206 नवमतदार आहेत. तर 6 लाख 36 हजार 278 दिव्यांग, 6 हजार 031 थर्ड जेंडर तर 85 वयोवर्षापुढील वृद्ध मतदार  12 लाख 4 हजार 192  आहेत. 

त्यामुळे अधिकाधिक मतदारांना वेळेत आणि कोणत्याही अडचणीशिवाय मतदान करता यावं, म्हणून निवडणूक आयोगाने प्रत्येक जिल्ह्यात 2 किलोमीटरच्या अंतरावर मतदान केंद्राची स्थापना केली आहे. त्यानुसार प्रत्येक मतदान केंद्रावर 1,500 मतदार असतील. या व्यवस्थेमुळे अनेक सार्वजनिक ठिकाणी, सोसायट्यांमध्ये मतदान केंद्र उभे केले आहेत.  2019 च्या तुलनेत यंदा 3, 533 नवीन केंद्र उभे केले जाणार आहेत.  त्यानुसार राज्यात एकुण 1 लाख 186 मतदान केंद्र असतील.

85 वयोवर्षापुढील वृद्ध आणि 40 टक्क्यांहून अधिक दिव्यांग असलेल्या मतदारांचे मतदान किंवा घरोघरी मतदानाची सुविधा

वय वर्ष 85 आणि त्यावरील वृद्ध मतदारांना आणि 40 टक्क्याहून अधिक दिव्यांगत्व असलेल्या मतदारांनाही मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी 2024 लोकसभा निवडणुकीपासून निवडणूक आयोगाने घरोघरी जाऊन वृद्ध मतदारांचं मतदान करुन घेतलं आहे. राज्यातही मागच्या आठवड्यामध्ये मतदान केंद्रापर्यंत पोहोचू न शकणाऱ्या अशा वृद्ध आणि दिव्यांगं मतदारांचं मतदान पार पडलं. 

ब्रेल लिपीमधली वोटर स्लीप्स

दिव्यांग बांधवांपैकी जे बांधव दृष्टिहिन आहेत अशा मतदारांसाठी ब्रेल लिपीतल्या वोटर माहिती असलेल्या स्लीप्स देण्यात आलेल्या आहेत. 

पिंक मतदान केंद्र

2019 सालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपासून विशेष महिला मतदान केंद्र उभारलं जातं. यंदाही काहि मतदान केंद्रावर महिलांसाठी विशेष व्यवस्था असेल. 

स्थानिक भाषांतून जनजागृती

मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहीत करण्यासाठी, मतदानाविषयी आवश्यक माहिती मतदारांना देण्यासाठी यावेळेस निवडणूक आयोगाने प्रमुख भाषांसह स्थानिक बोलीभाषांचा वापर करण्यावर भर दिला आहे. यासाठी त्या-त्या भागातील स्थानिक लोकांची मदत घेत, जगजागृती मोहिम राबवण्यात आली आहे. 

दुर्लक्षित घटकांच्या सहभागासाठी विशेष सुविधा

थर्ड जेंडर, वेश्याव्यवसाय आणि दिव्यांग बांधवांनी मतदानामध्ये भाग घ्यावा, त्यासाठी नावनोंदणी करावी यासाठी  निवडणूक आयोगाकडून सरकारमान्य सामाजिक संस्थांच्या माध्यमातून जनजागृती करुन मतदानासाठी नावनोंदणी करुन घेण्यात आली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Stubble Burning : ऑक्टोबर - नोव्हेंबर महिन्यामध्ये पंजाब, हरियाणा, मध्यप्रदेश राजस्थान या राज्यात मोठ्या प्रमाणावर शेतकचरा पेंढा जाळला जातो. यामुळे
Sunday holiday: ब्रिटिश सरकारने मागण्या नाकारल्यावर लोखंडे यांनी देशभरात मोठं आंदोलन केलं. त्यांनी विविध ठिकाणी सभा घेतल्या, मोर्चे काढले आणि
Passport rules: भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पासपोर्टच्या नियमांमध्ये एक महत्त्वपूर्ण बदल केला आहे. या बदलामुळे आता पती-पत्नीला त्यांच्या पासपोर्टमध्ये एकमेकांचं नाव

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ