183 देशांतील 33 लाखांहून अधिक लोकांनी महाकुंभच्या अधिकृत वेबसाइटला दिली भेट

Maha kumbh 2025 : महाकुंभाच्या अधिकृत वेबसाइटला 4 जानेवारी 2025 पर्यंत 183 देशांतील 33 लाखांहून अधिक लोकांनी भेट दिली आहे.  उत्तर प्रदेश सरकारने महाकुंभ 2025 ला 'डिजिटल महाकुंभ' म्हणून सादर करण्याचा उपक्रम हाती घेतला असून, त्यामधील हा एक महत्त्वाचा भाग आहे.
[gspeech type=button]

सनातन संस्कृतीचे प्रतीक “महाकुंभ 2025” हा जागतिक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. जगभरातील लोक सक्रियपणे विविध वेबसाइट आणि पोर्टलद्वारे या भव्य कार्यक्रमाची माहिती शोधत आहेत. महाकुंभाच्या अधिकृत वेबसाइटला (https://kumbh.gov.in) 4 जानेवारी 2025 पर्यंत 183 देशांतील 33 लाखांहून अधिक लोकांनी भेट दिली आहे.

उत्तर प्रदेश सरकारने महाकुंभ 2025 ला ‘डिजिटल महाकुंभ’ म्हणून सादर करण्याचा उपक्रम हाती घेतला असून, त्यामधील हा एक महत्त्वाचा भाग आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 6 ऑक्टोबर 2024 रोजी प्रयागराज येथे या वेबसाइटचे उद्घाटन केले होते.

जागतिक आकर्षण

वेबसाइटच्या आकडेवारीनुसार, 183 देशांतील 33,05,667 लोकांनी या पोर्टलला भेट दिली असून, यामध्ये अमेरिका, ब्रिटन, कॅनडा आणि जर्मनीसह विविध देशांतील लोकं आहेत. हे वापरकर्ते 6,206 शहरांमधून आले आहेत. वेबसाइटला मिळणाऱ्या लक्षणीय ट्रॅफिकमुळे महाकुंभ 2025 चे जागतिक महत्त्व अधिक झाले आहे. वेबसाइटला भेट देणाऱ्या लोकांनी केवळ माहिती मिळवण्यापुरते वेबसाईटला भेट दिली नाही तर, त्यांनी वेबसाईटवर असलेली महाकुंभ विषयांची विविध माहिती देखील पाहण्यात अधिक वेळ घालवला आहे.

हेही वाचा : महाकुंभ मेळा 2025

महाकुंभबद्दल सर्व माहिती एका ठिकाणी

महाकुंभ 2025 च्या अधिकृत वेबसाइटवर कार्यक्रमाची परंपरा, आध्यात्मिक महत्त्व, प्रमुख आकर्षणे, स्नान उत्सव, काय करावे आणि काय टाळावे याविषयी सविस्तर माहिती उपलब्ध आहे. तसेच, भक्तांसाठी प्रवास आणि निवास व्यवस्थेची माहिती, मीडिया गॅलरी आणि कार्यक्रमाबाबतच्या सर्व गोष्टींबद्दल माहिती पुरवण्यात आली आहे.

डिजिटल महाकुंभ प्रकल्प

महाकुंभसाठी उत्तर प्रदेश सरकारने अनेक डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू केले आहेत. यामुळे लाखो भाविकांना त्यांना हवी ती माहिती सहज मिळू शकते. महाकुंभ 2025 हा केवळ धार्मिक आणि सांस्कृतिक मेळावा नसून एक आधुनिक तांत्रिक चमत्कार ठरला आहे. महाकुंभ 2025 चे आयोजन जागतिक स्तरावर चर्चेचा विषय ठरत आहे.

हेही वाचा :युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत कुंभमेळ्याचा समावेश

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Stubble Burning : ऑक्टोबर - नोव्हेंबर महिन्यामध्ये पंजाब, हरियाणा, मध्यप्रदेश राजस्थान या राज्यात मोठ्या प्रमाणावर शेतकचरा पेंढा जाळला जातो. यामुळे
Sunday holiday: ब्रिटिश सरकारने मागण्या नाकारल्यावर लोखंडे यांनी देशभरात मोठं आंदोलन केलं. त्यांनी विविध ठिकाणी सभा घेतल्या, मोर्चे काढले आणि
Passport rules: भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पासपोर्टच्या नियमांमध्ये एक महत्त्वपूर्ण बदल केला आहे. या बदलामुळे आता पती-पत्नीला त्यांच्या पासपोर्टमध्ये एकमेकांचं नाव

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ