ISRO ने युरोपियन स्पेस एजन्सीच्या (ESA) PROBA-3 सौर मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण केले. या मोहिमेचे प्रक्षेपण बुधवारी 4 डिसेंबर रोजी संध्याकाळी PSLV-C59 रॉकेटद्वारे होणार होते, परंतु PROBA-3 अंतराळ यानामध्ये तांत्रिक दोष आढळल्यानंतर प्रक्षेपण थोडक्यात पुढे ढकलण्यात आलं. त्यानंतर 5 डिसेंबरला या मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.
PROBA-3 मोहिमेचे प्रक्षेपण आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून करण्यात आले. यासाठी PSLV-C59 रॉकेटचा वापर करण्यात आला आणि या मोहिमेत दोन 550 किलो वजनाचे हे उपग्रह प्रक्षिप्त केले गेले.
या मोहिमेचा मुख्य उद्देश सूर्याच्या बाह्य वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी दोन उपग्रहांचा वापर करणे आहे. “कोरोनाग्राफ” आणि “ऑक्युल्टर” या दोन उपग्रहांमध्ये एकमेकांपासून 150 मीटरचे अंतर ठेवले जाईल. हे दोन्ही उपग्रह पृथ्वीच्या लंबवर्तुळाकार कक्षेत परिभ्रमण करतील. त्यांचा पृथ्वीपासूनचा कमाल अंतर 60,530 किमी आणि किमान अंतर सुमारे 600 किमी असणार आहे. आणि या कक्षेत दोन्ही उपग्रह एकमेकांपासून 150 मीटरचे अंतर ठेवून एकत्र काम करतील.
ऑक्युल्टर उपग्रहावर 1.4 मीटरचा डिस्क आहे, जो सूर्याच्या तेजस्वी डिस्कला ब्लॉक करतो यामुळे कृत्रिम सूर्यग्रहण निर्माण होते. मग अश्यावेळी कोरोनाग्राफ हा उपग्रह सूर्याच्या कोरोनाचा निरीक्षण करु शकतो.
PROBA-3 मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट सौर वादळे आणि कोरोनल मास इजेक्शनसारख्या अवकाशातील हवामानाचे अधिक स्पष्टपने अभ्यास करता येईल. याशिवाय, या मोहिमेतील उपग्रह ESA च्या अॅडवांस्ड फॉर्मेशन-फ्लायिंग टेक्नोलॉजीसाठी एक प्रमाणीकरण म्हणून कार्य करतील. शास्त्रज्ञ सूर्याच्या पृष्ठभागापेक्षा कोरोन अधिक गरम का असतो आणि सौर वारा कसा तीव्र होतो, हे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत.
PROBA-3 काय आहे?
PROBA-3 हा जगातील पहिला अचूक उडणारा उपग्रह मिशन आहे. युरोपियन स्पेस एजन्सीच्या प्रोबा-3 मोहिमेची किंमत सुमारे 1780 कोटी रुपये आहे, ज्याचे आयुष्य सुमारे 2 वर्षे असेल. हे 600 बाय 60530 किलोमीटरच्या लंबवर्तुळाकार कक्षेत पाठवले जाईल, ज्याचा परिभ्रमण कालावधी सुमारे 19.7 तास असेल.या मिशनमध्ये दोन उपग्रह कोरोनाग्राफ आणि ऑक्युल्टर प्रक्षिप्त करण्यात आले आहेत. प्रत्येक उपग्रहाचे वजन 550 किलो आहे. प्रक्षेपणानंतर, हे दोन्ही उपग्रह एकमेकांपासून वेगळे होऊन सूर्याच्या कोरोनाचा तपशीलवार अभ्यास करण्यासाठी एकत्र काम करतील.
दोन वर्षांची महत्त्वपूर्ण मोहिम
PROBA-3 ही स्पेन, पोलंड, बेल्जियम, इटली आणि स्वित्झर्लंडमधील शास्त्रज्ञांच्या मेहनतीचे फलित आहे. दोन वर्षांची ही मोहिम विशेष आहे कारण या मिशनमध्ये दोन उपग्रह एकाच वेळी प्रक्षिप्त केले जात आहेत, आणि त्यांचा एकमेकांशी असलेला समन्वय यशस्वी मिशनसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.
ISRO ने ‘चांद्रयान-3’ च्या यशस्वी लँडिंग आणि ‘आदित्य-L1′ यासारख्या दोन महत्वाच्या माइलस्टोन नंतर, आता PROBA-3 चे यशस्वी प्रक्षेपण केलं आहे. हे मिशन ISRO च्या आंतरराष्ट्रीय यशांना अधोरेखित करत आहे. ISRO आता नवनवीन प्रयोगांसाठी सज्ज आहे, ज्यामध्ये गगनयान मोहिम आणि चंद्र, मंगळ आणि शुक्र ग्रहांच्या अभ्यासासाठी शोध मोहिमा यांचा समावेश आहे.