भारताला मिळणार स्वतःची नेव्हिगेशन सिस्टम; इस्रो लॉन्च करणार 7 NaVIC सॅटेलाइट

ISRO : भारतीय नागरिकांना लवकरच  स्वदेशी नेव्हिगेशन सिस्टम (NaVIC) (Navigation with Indian Constellation)  उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) काम करत आहे.
[gspeech type=button]

भारतीय नागरिकांना लवकरच  स्वदेशी नेव्हिगेशन सिस्टम (NaVIC) (Navigation with Indian Constellation)  उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) काम करत आहे. ISRO च्या नियामक आणि प्रवर्तक INSPACe चे अध्यक्ष पवन गोयंका यांनी सांगितले की, “2025 पर्यंत, इस्रो दरवर्षी 12 उपग्रह लाँच करण्याचे टार्गेट ठेवत आहे. त्यात 6 GSLV (Geosynchronous Satellite Launch Vehicle) लाँचचा समावेश आहे.

NaVIC सॅटेलाइट 

NaVIC ही भारताची स्वदेशी उपग्रह आधारित नेव्हिगेशन सिस्टम आहे. 

– NaVIC चे सिग्नल्स अधिक अचूक आणि जगातील इतर नेव्हिगेशन सिस्टीम्सपेक्षा अपडेटेड असतील.

या सॅटेलाइट सिस्टममुळे भारतीय नागरिकांना अधिक अचूक नेव्हिगेशन माहिती देण्यास मदत करेल.

सध्या NaVIC प्रणाली 6 उपग्रहांच्या आधारे कार्यरत आहे. त्यात L5 आणि S बँड्स चा वापर होतो. पण, नवीन लाँच होणाऱ्या 7 उपग्रहांमध्ये एक नवीन L1 बँड देखील असेल. यामुळे नागरिकांच्या मोबाईल फोनमध्ये सुसंगत चिपसेट उपलब्ध होणार आहेत.

NaVIC (Navigation with Indian Constellation) जगातील इतर नेव्हिगेशन सिस्टम्सपेक्षा ही यंत्रणा अधिक अचूक आहे. यामुळे भारतीय नॅव्हिगेशन प्रणाली जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि अचूकतेने स्थानिक नकाशे, नेव्हिगेशन आणि इतर सेवांचा उपयोग करता येईल.

पवन गोयंका यांनी सांगितलं की, ‘आम्ही NaVIC सॅटेलाइटची  पोहोच आणि वापर वाढवण्यासाठी विविध उपाययोजना करत आहोत. यामुळे भारतात या प्रणालीचा वापर नागरिकांपासून ते व्यावसायिक क्षेत्रापर्यंत होईल. हे उपग्रह 2025 पर्यंत पूर्णपणे कार्यरत होण्याची अपेक्षा आहे‘.

 “आम्ही या सिस्टीमचे ड्राफ्ट तयार केला आहे. या प्रस्तावाला  आता मंत्रालयाच्या मंजुरीसाठी पाठवले जाईल आणि नंतर कॅबिनेटच्या मंजुरीसाठी ते सादर केले जाईल” असेही गोयंका यांनी सांगितलं. 

Global Small Satellite मार्केट

गोयंका यांच्या मते, सध्याच्या Global Small Satellite  मार्केट मध्ये लक्षणीय वाढ दिसून येत आहे. 5.2 अब्ज डॉलर (सुमारे 42,000 कोटी रुपये) मूल्य असलेल्या या बाजारात संचार, हवामान निरीक्षण, शैक्षणिक संशोधन आणि सुरक्षितता क्षेत्रांमध्ये लहान उपग्रहांची मागणी झपाट्याने वाढत आहे.

इस्रोने या ट्रेंडचा फायदा घेण्यासाठी मिनी-लॉन्चर SSLV (Small Satellite Launch Vehicle) तयार केला आहे. गोयंका यांनी सांगितले की, पुढील दोन वर्षांत हे तंत्रज्ञान खासगी कंपन्यांना हस्तांतरित केले जाईल, आणि यामुळे खासगी क्षेत्रातील कंपन्या स्वतःचे उपग्रह लाँच करू शकतील.

NaVIC प्रणालीच्या माध्यमातून भारतीय नागरिकांना अधिक अचूक, सुरक्षित आणि स्वदेशी नेव्हिगेशन सेवा मिळेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Stubble Burning : ऑक्टोबर - नोव्हेंबर महिन्यामध्ये पंजाब, हरियाणा, मध्यप्रदेश राजस्थान या राज्यात मोठ्या प्रमाणावर शेतकचरा पेंढा जाळला जातो. यामुळे
Sunday holiday: ब्रिटिश सरकारने मागण्या नाकारल्यावर लोखंडे यांनी देशभरात मोठं आंदोलन केलं. त्यांनी विविध ठिकाणी सभा घेतल्या, मोर्चे काढले आणि
Passport rules: भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पासपोर्टच्या नियमांमध्ये एक महत्त्वपूर्ण बदल केला आहे. या बदलामुळे आता पती-पत्नीला त्यांच्या पासपोर्टमध्ये एकमेकांचं नाव

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ