वर्ल्ड हेरिटेज ‘बेबी सिवोक’ ची सिल्वर ज्युबिली

Baby Sivok Darjiling Toy Train : दार्जिंलिंग हे पर्यटनासाठी उत्कृष्ट ठिकाण होतं. ब्रिटिशांना सुट्टीकरता एक चांगलं लोकेशन मिळालं.  मात्र, त्याठिकाणी प्रवासासाठी उपयुक्त साधन उपलब्ध नव्हतं. ब्रिटिशांनी हे हेरून 1879 ते 1881दरम्यान पश्चिम बंगालमधील न्यू जलपाईगुडी स्टेशन ते दार्जिलिंग अशी रेल्वे लाईन सुरू करुन त्यावर ‘बेबी सिवोक’ ही टॉय ट्रेन सुरू केली.
[gspeech type=button]

दार्जिलिंगचं नाव घेताच आपल्या नजरेसमोर येतात मोठं-मोठे चहाचे मळे, ब्रिटीशकालीन घरं आणि पॅलेस, नैसर्गिक सौदर्यांने परिपूर्ण असा परिसर आणि दार्जिलिंगच्या वैशिष्टयपूर्ण अशा टॉय ट्रेन्स. 

दार्जिंलिंग हे पर्यटनासाठी उत्कृष्ट ठिकाण होतं. ब्रिटिशांना सुट्टीकरता एक चांगलं लोकेशन मिळालं.  मात्र, त्याठिकाणी प्रवासासाठी उपयुक्त साधन उपलब्ध नव्हतं. ब्रिटिशांनी हे हेरून 1879 ते 1881दरम्यान पश्चिम बंगालमधील न्यू जलपाईगुडी स्टेशन ते दार्जिलिंग अशी रेल्वे लाईन सुरू करुन त्यावर ‘बेबी सिवोक’ ही टॉय ट्रेन सुरू केली.

या टॉय ट्रेनसकट दार्जिलिंग हिमालयन रेल्वे मार्गाला 5 डिसेंबर 1999 साली वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा देण्यात आला. या घटनेला यंदा 25 वर्षे पूर्ण झाली. 

‘बेबी सिवोक’ ट्रेन

सन 1881 दरम्यान, सिलीगुरी ते दार्जिलिंग अशी माऊंटन रेल्वे सुरू झाली. तेव्हापासून बेबी सिवोक ही टॉय ट्रेन या मार्गावरून प्रवास करत आहे. ओरेनस्टाईन आणि कोपल या जर्मन तंत्रज्ञांनी हे वोकोमोटिव्ह स्वरूपाचं इंजिन तयार केलं होतं. तिस्ता व्हॅली लाईनमधल्या सिवोक स्टेशनच्या नावावरून या इंजिनला सिवोक हे नाव दिलं गेलं. सन 1881 ते 1970 पर्यंत सेवेत राहिल्यानंतर या इंजिनला निवृत्त केलं. 1990 नंतर हे बेबी सिवोक इंजिन सिलीगुरी येथल्या प्रदर्शनामध्ये ठेवलं जाऊ लागलं. अलीकडे दार्जिलिंगमधील घुम रेल्वे स्थानकावर होणाऱ्या घुम फेस्टीवलमध्ये पर्यटकांना हे इंजिन पाहण्यासाठी ठेवलं जातं. यंदा सिल्वर ज्युबिलीच्या निमित्तानं 5 डिसेंबरपासून हे इंजिन रेल्वे स्थानकावर ठेवण्यात आलं आहे. 

टॉय ट्रेनच्या सफरीने पर्यटनाला चालना

दार्जिलिंग माऊंटन रेल्वे हे पर्यटनाचं मुख्य आकर्षण आहे. अनेक सिनेमांमधूनही या टॉय ट्रेनचं चित्रीकरण करण्यात आलं आहे. सुरुवातीला प्रवासचं साधन म्हणून सुरू केलेली ही टॉय ट्रेन, कालातरांने दळणवळणाच्या साधनासह पर्यटकांचं मुख्य आकर्षण म्हणून नावारूपाला आली. दरवर्षी साधारण 5 लाख पर्यटक हे टॉय ट्रेनमधून प्रवास करतात. त्यामुळे एकूणच या टॉय ट्रेन्समुळे पश्चिम बंगालच्या पर्यटनक्षेत्राला चालना मिळत आहे. 

घुम फेस्टिवल

दार्जिलिंगमध्ये अधिकाधिक पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी दार्जिलिंग हिमालय रेल्वेकडून घुम स्थानकावर घुम फेस्टिवलचे आयोजन करण्यात येते. सन 2021 सालापासून या फेस्टिवलला सुरुवात झाली. दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीपासून हा तीन आठवड्यांचा फेस्टिवल सुरू असतो. 

या फेस्टिवलमध्ये पर्यटकांना टॉय ट्रेन्समधून जवळपास दोन तासाची जॉय राईड करता येते. या प्रवासा दरम्यान तेथील लोकनृत्य आणि लोकगितांनी प्रवाशांचं मनोरंजन केलं जातं. यासोबतच स्टँड-अप कॉमेडी, छोटी नाटकं आणि टॅलेंट शोचं आयोजन केलं जातं. 

या फेस्टिवलमधूनच हेरिटेज वॉक्स, माउंटंन बाईकिंग, ट्रॅकेथॉन्स आणि चहाच्या मळ्यामध्येही फिरायला घेऊन जातात. तसचं स्थानिक हस्तकला, संग्राहलयानाही भेटी दिल्या जातात. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Stubble Burning : ऑक्टोबर - नोव्हेंबर महिन्यामध्ये पंजाब, हरियाणा, मध्यप्रदेश राजस्थान या राज्यात मोठ्या प्रमाणावर शेतकचरा पेंढा जाळला जातो. यामुळे
Sunday holiday: ब्रिटिश सरकारने मागण्या नाकारल्यावर लोखंडे यांनी देशभरात मोठं आंदोलन केलं. त्यांनी विविध ठिकाणी सभा घेतल्या, मोर्चे काढले आणि
Passport rules: भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पासपोर्टच्या नियमांमध्ये एक महत्त्वपूर्ण बदल केला आहे. या बदलामुळे आता पती-पत्नीला त्यांच्या पासपोर्टमध्ये एकमेकांचं नाव

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ