वाघांचा रस्ता अडवणाऱ्या जीप्सी चालकांसह, पर्यटकांवर कारवाई

Tiger Sanctuary Incident : जंगल सफारी दरम्यान, वनविभागाच्या सफारी वाहनांनी वाघाच्या आणि तिच्या पिल्लांच्या मार्गात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी, मुंबई हायकोर्टाने कठोर पाऊले उचलली आहेत. याप्रकरणी नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला नोटीस बजावत घडलेल्या घटनेवर उत्तर मागितले आहे. तर वनविभागाच्या संबंधित वाहनाच्या चालकावर आणि पर्यटकांवरही कोर्टाने कारवाईचे आदेश दिले आहेत.
[gspeech type=button]

जंगल सफारी दरम्यान, वनविभागाच्या सफारी वाहनांनी वाघाच्या आणि तिच्या पिल्लांच्या मार्गात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी, मुंबई हायकोर्टाने कठोर पाऊले उचलली आहेत. याप्रकरणी नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला नोटीस बजावत घडलेल्या घटनेवर उत्तर मागितले आहे. तर वनविभागाच्या संबंधित वाहनाच्या चालकावर आणि पर्यटकांवरही कोर्टाने कारवाईचे आदेश दिले आहेत.

नेमकं घडलं काय? 

31 डिसेंबर 2024 च्या संध्याकाळी उमरेड-पौनी-कऱ्हाड अभयारण्यामध्ये जंगल सफारीसाठी गेलेल्या वनविभागाच्या वाहनाने बफर झोनमध्ये रस्ता ओलांडणाऱ्या वाघिणीचा आणि तिच्या पाच बछड्याचा रस्ता अडवला. वाहनातील पर्यटकांनी वाघिणीचे तिच्या बछड्यासोबत फोटो आणि व्हिडीओ काढण्यास सुरुवात केली. यासंदर्भातली व्हिडीओ क्लिप ही सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली.

हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने या व्हायरल व्हीडीओची दखल घेतली. या घटनेतील सत्यता तपासून कोर्टाने वाहनांचे चालक आणि पर्यटकांविरोधात सू-मोटो याचिका दाखल केली. आणि राज्य सरकारला नोटीस बजावून या घटनेवर जाब विचारला आहे.

जीप्सी चालकांचे निलंबन

याप्रकरणी वनविभागाने जीप्सी चालक आणि गाइड्सवर वन संरक्षण कायदा 1972 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सोमवार दिनांक 6 जानेवारी रोजी चार चालकांचं पुढील तीन महिन्यासाठी निलंबन केलं आहे. चारही चालकांना 25 हजार रूपयाचा दंड ठोठावला असून गाइड्सवर प्रत्येकी 1 हजार रुपयाचा दंड ठोठावला आहे.

पर्यटकांवरही कारवाई

उमरेड-पौनी-कऱ्हाड अभयारण्यामधील बफर झोनमध्ये वाघाच्या रस्ता अडवून पर्यटकांनी नियमांचं उल्लंघन केलं आहे. त्यामुळे या सर्व पर्यटकांवर कायमस्वरूपी निर्बंध घालण्यात आले असल्याची माहिती बोर व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालकांनी दिली. तसेच अशा घटना पुन्हा घडणार नाहीत यासाठी विशेष काळजी घेण्यात येईल असं आश्वासन त्यांनी दिलं.

दरम्यान, जीप्सी चालकांना वनसंरक्षण कायद्यासंदर्भात आणि नियमांची माहिती देऊन त्यांना योग्य ते प्रशिक्षण देण्यासाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन केलं आहे. तसेच यापुढे जंगल सफारी मार्गावर गस्ती वाढविण्या संदर्भात वनअधिकाऱ्यांना विशेष सूचना दिल्याची माहिती पेंच व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक प्रभू नाथ शुक्ला यांनी दिली.

वन्यजीव संरक्षण कायदा

सरकारकडून जंगल पर्यटनाला मोठ्या प्रमाणात वाव दिला जातो. मात्र, या जंगल पर्यटनाचा प्राण्यांच्या अधिवासाला त्रास होऊ नये याची विशेष काळजी ही सरकारकडून घेतली जाते. त्यासाठी वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत नियमावलीही तयार केलेली आहे. ही नियमावली सगळ्या अभयारण्याच्या स्थळांवर दर्शनी भागात लावलेली आसते. प्रत्येक पर्यटकाने या नियमांचं पालन करुन पर्यटनाचा आनंद घ्यावा, अशी अपेक्षा असते.  त्यामुळे तुम्हीही जंगल सफारीला जाण्याचा विचार करत असाल तर जरूर नियम जाणून घ्या आणि त्याचं पालन करा.

  • जंगल सफारी वेळी कोणत्याही प्रकारची हत्यारे घेऊन जाण्यास परवानगी नाही.
  • सफारीवेळी रंगीत आणि भडक कपडे घालू नयेत.
  • जंगलात प्राण्यांच्या अती जवळ जाण्यास,  त्यांना त्रास होईल किंवा ते आक्रमक होतील असं कृत्य करण्यास मनाई आहे.
  • सफारी वेळी कोणत्याही प्राण्यास आपल्या जवळ असलेले खाद्यपदार्थ देऊ नयेत.
  • या प्रवासात धुम्रपान करणे किंवा आग पेटवू नये.
  • सफारी वेळी जोरात गाडीचा हॉर्न वाजवणे, आवाज करणे आणि गाणी लावण्यावर बंदी आहे.
  • सफारी वेळी वाहनांचा वेग हा नियमानुसारचं असावा.
  • जंगलात दिलेल्या मार्गावरुन आणि भागातूनच गाडी चालवावी.
  • सफारीवेळी पर्यटकांनी गाडीतून खाली उतरू नये.
  • जंगलात सफारीवेळी कोणत्याच प्रकारचा कचरा गाडीबाहेर फेकू नये.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

भैरवनाथ यात्रा:सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील तांबवे गावच्या पश्चिमेस डोंगरावर पाठरवाडी वसली आहे. इथे श्री भैरवनाथ देवाचे मंदिर आहे. गुढीपाढव्याच्या तिसऱ्या
बगाड यात्रा : सर्वत्र रंगपंचमीचा धूम असताना बावधन मात्र गुलाबी रंगानी न्हाऊन निघते. 'बगाड' यात्रेत एका व्यक्तीचा नवस फेडण्यासाठी राज्यभरातून
Rahadi Culture : पेशव्यांच्या काळामध्ये नाशिक आणि पंचवटी परिसरामध्ये रंग खेळण्यासाठी रहाडी (हौदा सारखा परिसर) खोदल्या जायच्या. या रहाडीमध्ये रंग

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ