डिसेंबर महिना म्हंटल की ख्रिसमस फेस्टिव्हल आलाच. यावेळी आपल्या घराची सजावट करण्यासाठी आपण बाजारात विविध प्रकारच्या सजावटीच्या वस्तू शोधू लागतो. यासाठीच मुंबईमध्ये असलेली काही ठिकाणं आज आपण पाहणार आहोत जिथे तुम्हाला ख्रिसमस सजावटीची खरेदी करता येईल.
1. समथिंग स्पेशल स्टोअर, बांद्रा
बांद्र्यातील हे छोटेसे स्टोअर ख्रिसमसची सजावट खरेदी करण्यासाठी परफेक्ट आहे. इथे तुम्हाला ट्री डेकोर, होम डेकोर, पार्टी प्रॉप्स अशा अनेक प्रकारच्या सजावटीच्या वस्तू आरामात मिळतील.
पत्ता: 63, हिल रोड सेंट जोसेफ कॉन्व्हेंट हायस्कूल समोर, बांद्रा पश्चिम, मुंबई
वेळ: सकाळी 10 ते रात्री 9, रविवारी बंद
2. चीप जॅक स्टोअर, बांद्रा
समथिंग स्पेशलच्या जवळच असलेल्या चीप जॅक स्टोअरमध्ये तुम्हाला स्टॉकिंग स्टफर्स, स्ट्रीमर्स, बलुन्स, ट्री डेकोरेशन, स्टेशनरी, होम डेकोर इत्यादी वस्तू खरेदी करता येतील.
पत्ता: चीप जॅक स्टोअर, सेंट जोसेफ कॉन्व्हेंट हायस्कूल समोर, हिल रोड, बांद्रा पश्चिम, मुंबई
वेळ: सकाळी 10 ते रात्री 9, रविवारी बंद
3. सांताक्रूझ वेस्ट मार्केट
जर तुम्हाला क्यूट आणि क्वर्की ख्रिसमस डेकोर हवे असेल तर सांताक्रूझ वेस्ट मार्केटला भेट द्या. इथे तुम्हाला अनेक स्टॉल्स आणि स्टोर्समध्ये फंकी ऑर्नामेंट्स, रंगीबेरंगी गार्लंड्स, हॉलिडे गिफ्ट्स आणि फेअरी लाइट्स मिळतील.
पत्ता:हसनाबाद लेन, स्टेशन रोड, सांताक्रूझ पश्चिम, मुंबई
वेळ: सकाळी 10 ते रात्री 9.30, गुरुवारी बंद
4. पार्टी शॉप, मांडवी
क्रॉफर्ड मार्केट खरेदीसाठी एक उत्तम ठिकाण आहे, इथलं पार्टी शॉप हे एक उत्तम पर्याय आहे. इथे तुम्ही ख्रिसमस ट्री डेकोरेशन, होम डेकोर अशा अनेक वस्तू खरेदी करू शकता.
पत्ता : शॉप नंबर 327, अब्दुल रहमान स्ट्रीट, मांडवी, मुंबई
वेळ: सकाळी 11 ते रात्री 9, रविवारी बंद
5. कार्नेशन्स, मालाड
ओर्लेम मार्केट हे दरवर्षी ख्रिसमस डेकोरेशनला लागणाऱ्या वस्तूंनी गजबजलेले असते. कार्नेशन्स स्टोअरमध्ये तुम्हाला ख्रिसमस क्रिबसाठी आवश्यक असलेल्या सर्व वस्तू मिळतील.
पत्ता : शॉप नंबर 5, मार्वल अपार्टमेंट, सेंट जोसेफ शाळेच्या पुढे, ओर्लेम, मालाड पश्चिम, मुंबई
वेळ: सकाळी 10 ते रात्री 8, रविवारी बंद
6. मिलान कलेक्शन, विले पार्ले
हनुमान रोडवरील हा गिफ्ट शॉप तुम्हाला वेगवेगळ्या साइजच्या फेक ख्रिसमस ट्रीज, मिस्टलेटोज, लाइटिंग डेकोर आणि सांता हॅट्स मिळतील. तसचं ख्रिसमस गिफ्ट्ससाठीही काही क्यूट आयटम्स उपलब्ध आहेत.
पत्ता : मिलन कलेक्शन, 6 डनहिल कॅसल, हनुमान रोड, विलेपार्ले पूर्व, समोर. आयसीआयसीआय बँक, मुंबई
वेळ: सकाळी 9.30 ते रात्री 9, सोमवार बंद
7. विले पार्ले मार्केट, विले पार्ले
जर तुम्हाला बजेट फ्रेंडली ख्रिसमस डेकोरेशन हवे असेल तर विले पार्ले मार्केटला भेट द्या. या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ख्रिसमस डेकोरेशनच्या वस्तु आणि गिफ्ट्स खरेदी करता येतील
पत्ता : प्रार्थनासमाज आणि पार्क रोडच्या बाहेर, विलेपार्ले पूर्व, मुंबई
वेळ: सकाळी 10 ते रात्री 9