खिशाला परवडतील असे अनेक प्रसिद्ध मार्केट पुण्यात आहेत. शहरातील तरुणांपासून ते पर्यटकांपर्यंत सर्वांनाच या बाजारपेठांमध्ये काहीतरी नवीन आणि मनोरंजक पाहायला मिळतं.
हाँगकाँग लेन: ट्रेंडी वेस्टर्न वेअर्सचा खजिना
डेक्कन परिसरातील गरवारे पुलाजवळ असलेली हाँगकाँग लेन ही तरुणांची आवडती खरेदीची जागा आहे. या छोट्याशा गल्लीत तुम्हाला ट्रेंडी डेनिम, टॉप्स, ज्वेलरी, परफ्यूम आणि बरेच काही स्वस्त दरात मिळेल. पुण्यातील सर्वात लोकप्रिय खरेदी ठिकाणांपैकी हे एक आहे.
फैशन स्ट्रीट:पारंपरिक ते आधुनिक
पारंपरिक ते आधुनिक, सर्व काही एका छताखाली. फैशन स्ट्रीट ही पुण्यातील सर्वात लोकप्रिय खरेदीची जागा आहे. इथे तुम्हाला तुमच्या गरजेनुसार विविध गोष्टी अत्यंत परवडणाऱ्या दरात खरेदी करता येतात.
एबीसी पुस्तक मार्केट: पुस्तक प्रेमींसाठी खजिना
अप्पा बळवंत चौकात असलेले एबीसी पुस्तक मार्केट पुण्याचे एकमेव स्ट्रीट बुक मार्केट आहे. कादंबऱ्या, महाविद्यालयीन पाठ्यपुस्तके, स्टेशनरी आणि बरेच काही इथे तुम्हाला स्वस्त दरात मिळेल.
जुना बाजार: विंटेज वस्तूंचा खजिना
जवळजवळ 220 वर्षांपासून अस्तित्वात असणारा जुना बाजार इथे विंटेज वस्तूंचा खजिना आहे. इथे तुम्हाला पुरातन हस्तकला, विंटेज कलाकृती, स्थानिक कलाकारांची चित्रे, जुनी नाणी, विनाइल रेकॉर्ड, पोट्रेट, हस्तनिर्मित संगीत वाद्ये आणि अगदी जुने कार्यरत टाइपरायटर यांसारख्या वस्तू इथे नक्कीच मिळतील
बाजीराव रोड: फर्निचर प्रेमींचे स्वर्ग
बाजीराव रोड हा हाय क्लास फर्निचरसाठी प्रसिद्ध आहे. तसेच घरातील फर्निचर खरेदीसाठी इथे तुम्हाला हस्तकला फर्निचर, डिझाइनर फर्निचर असे बरेच प्रकार पाहायला मिळतील.