माऊंट एव्हरेस्टला गवसणी घालणारी सर्वात लहान महिला, कृष्णा पाटील

Krushnaa Patil : पुण्यातल्या कृष्णा पाटीलने वयाच्या 19 व्या वर्षी माऊंट एव्हरेस्ट सर केला. माईंट एव्हरेस्ट सर करणारी सर्वात लहान महिला गिर्यारोहक म्हणून तिच्या नावाने नोंद आहे. गिर्यारोहक क्षेत्रात  यासारखे अनेक विक्रम कृष्णाच्या नावावर नोंदवले आहेत. 
[gspeech type=button]

साहसवीरांच्या अनुभव, कथा आपल्याला नेहमीच प्रेरणा देत असतात. इतिहासात अशा असंख्य महिलांच्या साहसी कर्तृत्वाच्या नोंदी आहेत. कर्तबगार आणि साहसी महिला, ज्यांनी वास्तविक आणि वैचारिक अशा दोन्ही प्रकारच्या संघर्ष आणि अडथळ्यांना न जुमानता साहसी क्षेत्रात यश मिळवले आहे.

उंच शिखरं पादाक्रांत करण्याची ओढ 

पुण्यातल्या कृष्णा पाटीलने वयाच्या 19 व्या वर्षी माऊंट एव्हरेस्ट सर केला. माऊट एव्हरेस्ट सर करणारी सर्वात लहान महिला गिर्यारोहक म्हणून तिच्या नावाने नोंद आहे. गिर्यारोहक क्षेत्रात यासारखे अनेक विक्रम कृष्णाच्या नावावर नोंदवले आहेत.

कृष्णा सांगते की, माऊंट एव्हरेस्ट सर केल्यावर मी स्वत:ला म्हणाले की, “आत्ता मी जगाच्या सगळ्यात वरच्या जागी आहे!” हे उद्गार आहेत आधुनिक शेर्पा, गिर्यारोहक कृष्णा पाटीलचे. आणि त्याचवेळी तिनं उद्गारलेलं दुसरं वाक्य होतं ते म्हणजे, “आत्ता कुठे माझा अर्धा प्रवास संपला आहे. माझं पुढचं ध्येय आहे सेव्हन समिट्स, म्हणजे प्रत्येक खंडातली सर्वात उंच शिखरं पादाक्रांत करणं!”

अर्थात कृष्णाने तिचं हे स्वप्न केवळ बोलून दाखवलं नाही, तर तिने ते प्रत्यक्षात पूर्ण करूनही दाखवलं. 21 मे 2009 रोजी तिने अंटार्क्टिका खंडातलं ‘माऊंट व्हिन्सन मॅसिफ’ हे शिखर सर करत सेव्हन समिट्स पूर्ण केली. सेव्हन समिट्स पूर्ण करत ती भारतातली सर्वात तरुण गिर्यारोहक ठरली.

अर्थात तिचा हा प्रवास सोपा आणि सरळ नक्कीच नव्हता. त्यासाठी तिने घेतलेले परिश्रम व जिद्द अतुलनीय आहे. प्रतिकूल नैसर्गिक परिस्थिती हा तिथला मुख्य शत्रू. त्यावर मात करायची असेल तर निसर्गाचा मान ठेवायला हवाच. प्रसंगी त्यासमोर झुकायलाही हवं. अशा वेळी आवश्यक असतं ते आपलं ध्येय निश्चित करणं आणि मग त्यावर चित्त एकाग्र करणं. एकदम मोठ्या अपेक्षा किंवा ध्येय न ठेवता छोटे-छोटे टप्पे केल्यास ते गाठणं सोपं जातं असंही ती सांगते.

सहनशक्तीची परीक्षा

अंटार्क्टिकामधल्या तिच्या अनुभवांनी आपल्याला तेथल्या प्रतिकूल परिस्थितीची केवळ कल्पनाच करता येते. तिकडची भयानक थंडी आणि गार वारे जणू माणसांच्या सहनशक्तीची परीक्षा पाहतात. पण या सगळ्यावर कृष्णाने मात केली आणि शिखर सर केलं. अंटार्क्टिकामधल्या या शिखरावर तीन मिनीटापेक्षा अधिक काळ थांबणं जरा धोकादायक असतं. तरीसुद्धा कृष्णा त्या शिखरावर थोडा जास्त वेळ थांबली आणि तिने तो आनंदाचा क्षण मनापासून अनुभवला.

हे सगळं ॲडव्हेंचर तिने कोणाच्याही मदतीशिवाय, स्व बळावर केलं आहे. तिने तिची ही कामगिरी देशातल्या सर्व तरुणांना समर्पित केली आहे.

आत्मविश्वास आणि एखादं काम करायची मनापासून आवड असेल, त्या गोष्टीचा ध्यास असेल तर आपण सगळ्या प्रतिकूल गोष्टींवर मात करून ती गोष्ट करू शकतो, त्यासाठी आपल्याला मदत मिळतेच, याचा प्रत्यय आजपर्यंतचा तिचा प्रवास पाहिला की येतो.

गिर्यारोहक आणि कॅफेचालक 

जगाच्या नकाशावर स्वतःची ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरलेली कृष्णा आता वेगवेगळ्या गिर्यारोहण मोहिमांसह Motivational Speaker म्हणून ठिकठिकाणी व्याख्यान द्यायला जाते. याशिवाय काश्मीरमधील श्रीनगर येथे तिने स्वतः सुरू केलेल्या, तिच्या मालकीच्या Bricks and Books या कॅफेमध्ये ती शेफ म्हणूनही काम करते.

साहस आणि यशाचा जिवंत दाखला 

जिद्द आणि इच्छा असेल तर आपण कोणतीही गोष्ट करू शकतो याचं समर्पक उदाहरण तिने आजच्या तरुणांपुढे ठेवलं आहे.

तिने शिखरं सर केली म्हणजे आपणही लगेच तेच करायला हवं किंवा तत्सम काही धाडसी काम करायला हवं असं नाही. तर आपण ज्या क्षेत्रात काम करतो किंवा करणार आहोत, तिथे आपण सर्जनशीलतेच्या व अधिक चांगलं काम करण्याच्या शिखरावर जाण्याचा तरी प्रयत्न करायला हवा. म्हणूनच कृष्णाचं उदाहरण हे तरुण गिर्यारोहकांबरोबरच इतरांसाठीही प्रेरणादायी आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Womenhood : दुर्दैवाने व्हीलचेअरशी खिळलेले आयुष्य वाट्याला आलेली;पण उमेद न हारता अपंगांसाठी सुलभता वाढवण्याची मोहीम हाती घेतलेली, फॅशनच्या जगातली चाकांच्या
Womenhood : बारामतीमधल्या लता भगवान करे या अशाच एक साहसी महिला आहेत. त्यांच्या साहसाची कसोटी लागली ती वयाच्या 62 व्या
Indian naval officers : अलीकडेच भारतीय नौदलाच्या दोन महिला अधिकारी, लेफ्टनंट कमांडर दिलना के. आणि लेफ्टनंट कमांडर रूपा ए. यांनी

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ