कोकणातल्या अज्ञात समुद्रकिनाऱ्यांची सफर!

गुहागरहून मोडका आगरमार्गे गेल्यास 20 किलोमीटर अंतरावर हा समुद्रकिनारा आहे. शांतता आणि गर्दी नसणारा हा किनारा खडकांच्या रांगा, समुद्राच्या लाटा आणि  शिंपल्यांच्या नक्षीमुळे उमटलेल्या नक्षीमुळं खूप सुंदर दिसतो. 

दापोली जवळ असलेला हा किनारा सुरुच्या बनामुळं खूपच प्रसन्न वाटतो.  इथली वाळू काळसर रंगाची आहे. इथलं पाणी स्वच्छ, लखलखीत आहे. त्यामुळं   हा समुद्र किनारा समुद्रस्नानासाठी एक उत्तम ठिकाण आहे. हिवाळ्यात तुम्हांला इथं मजा येईल. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यात असलेल्या या किनाऱ्याला कर्ली नदी व समुद्राचा संगम पाहायला मिळतो. पांढऱ्या शुभ्र वाळूची चौपाटी, माड आणि पोफळीच्या बागा यामुळे हा किनारा खूपच सुंदर दिसतो. हा किनारा ब्लू फ्लॅग प्रमाणपत्राचा मानकरी आहे. 

रत्नागिरीच्या गर्दीपासून दूर, एका छोट्याशा गावात दडलेला हा समुद्रकिनारा आहे. या किनाऱ्यावर पांढऱ्या वाळूची चादर पसरलेली आहे. आजूबाजूच्या हिरव्यागार टेकड्यांमुळे या किनाऱ्याची  सुंदरता अजूनच वाढते. शांतता आणि निसर्गाच्या सान्निध्यात काही वेळ घालवण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.

दापोली जवळ असलेला हा किनारा काळ्या आणि पांढऱ्या वाळूच्या मिश्रणामुळे खूपच वेगळा आहे. सुमारे ४ किमी लांबीचा हा किनारा शांत आणि सुरक्षित आहे. जर तुम्हाला गर्दीपासून दूर, एकांत वातावरणात वेळ घालवायचा असेल तर हे ठिकाण तुम्हाला नक्कीच आवडेल.

इतर बातम्या

Black Flowers : हिवाळ्यामध्ये बागेत तशी फुलांची संख्या कमी असते. पण काही विशेष काळ्या रंगाची फुले हिवाळ्यातच पाहायला मिळतात आणि
National birds : विविध देशांचे राष्ट्रीय पक्षी वेगवेगळे असतात आणि प्रत्येक देशाचा राष्ट्रीय पक्षी त्या देशाच्या संस्कृती, इतिहास आणि पर्यावरणाशी
Gopinath Munde : लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची आज जयंती. राजकीय आणि सामाजिक नेते म्हणून गोपीनाथराव मुंडे यांची विशेष ओळख आहे.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ