अमूल्य रत्न हरपले!

भारतीय उद्योग जगताचे पितामह आणि टाटा सन्सचे चेअरमन रतन टाटा यांचं वृद्धापकाळानं 9 ऑक्टोबरला रात्री उशिरा निधन झालं. ते 86 वर्षांचे होते.

टाटा ग्रुपचे संस्थापक जमशेदजी टाटा यांचे पणतु रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 ला मुंबईत झाला. त्यांच्या आजीनं त्यांचा सांभाळ केला.

रतन टाटा यांच्या करिअरची सुरूवात टाटा स्टीलमधून 1961 मध्ये शॉप फ्लोअरपासून झाली. करिअरच्या सुरुवातीलाच अगदी ग्राउंड लेवलपासून काम केल्यामुळं त्यांच्यातले नेतृत्वगुणाला आकार आला.

भारतीय अर्थव्यवस्था कात टाकत असताना रतन टाटा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

टाटा मोटर्सने 1998 मध्ये टाटा इंडिका लॉन्च केली होती आणि ती डिझेल इंजिन असलेली पहिली भारतीय हॅचबॅक होती.

रतन टाटा यांच्या मार्गदर्शनाखाली 2004 मध्ये टाटा टी ने टेटली, टाटा मोटर्सने जाग्वार लँड रोव्हर आणि टाटा स्टीलने कोरस या कंपन्या घेऊन बिझनेस एक्सपांड केला.

2009 मध्ये आपलं स्वप्न पूर्ण करत रतन टाटा यांनी टाटा नॅनो ही मध्यमवर्गीयांना परवडणारी गाडी मार्केटमध्ये आणली. यामुळं ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीचे आडाखे बदलले.

रतन टाटा हे अविवाहित होते. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी सांगितलं होतं की लॉस एंजलिसला असताना त्यांचं एका मुलीवर प्रेम होतं. पण 1962 च्या भारत-चीन युद्धामुळं तिच्या पालकांनी लग्नानंतर भारतात स्थायिक होण्याच्या विचारांमुळं या लग्नाला नकार दिला.

सन 2011 साली रतन टाटा यांनी बँगलोरच्या एअर शो मध्ये बोइंग के F - 18 सुपर हर्नोट जेटचं उड्डान केलं होतं. हा क्षण त्यांच्या आयुष्यातला अविस्मरणीय क्षण असल्याचं सांगत त्याचा फोटो त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. रतन टाटा हे परवानाधारक पायलट असून या आधिही त्यांनी अमेरिके लढाऊ विमान F - 16 मध्ये उड्डाण केलं होतं.

रतन टाटा यांना भारत सरकारकडून पद्म भूषण, पद्म विभूषण या पुरस्काराने गौरविलं गेलं आहे. यासोबतच सिंगापूर सरकारकडून ओनररी सिटीझन अॅवॉर्ड, फ्रान्स सरकारकडून कमांडर ऑफ द लीजन ऑफ द ऑनर तर किंग चार्ल्स 3 यांनी त्यांना ऑनररी ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया यासह अन्य अनेक पुरस्काराने रतन टाटा यांना त्यांच्या कार्य कर्तृत्वासाठी सन्मानित करण्यात आलं आहे.

इतर बातम्या

Black Flowers : हिवाळ्यामध्ये बागेत तशी फुलांची संख्या कमी असते. पण काही विशेष काळ्या रंगाची फुले हिवाळ्यातच पाहायला मिळतात आणि
National birds : विविध देशांचे राष्ट्रीय पक्षी वेगवेगळे असतात आणि प्रत्येक देशाचा राष्ट्रीय पक्षी त्या देशाच्या संस्कृती, इतिहास आणि पर्यावरणाशी
Gopinath Munde : लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची आज जयंती. राजकीय आणि सामाजिक नेते म्हणून गोपीनाथराव मुंडे यांची विशेष ओळख आहे.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ