जगातील सर्वात महाग कॉफी

कोपी लुवाक कॉफी इंडोनेशियात उदमांजराच्या विष्ठेपासून तयार केली जाते. उदमांजर कॉफीची फळं खातात आणि त्याच्या बिया पचवून विष्ठेतून बाहेर टाकतात. या बियांपासून कॉफी ही बनवली जाते. त्यांच्या पचनक्रियेमुळे कॉफी बियांचा स्वाद बदलतो आणि तो अधिक चविष्ट बनतो. या प्रक्रियेमुळे आणि मर्यादित उत्पादनामुळे, ही कॉफी अत्यंत महाग आहे. या कॉफीची किंमत $100 ते $600 प्रति पाउंड (₹8,380) आहे. तसच भारतातील कुर्गमध्येही सिव्हेट पूपपासून कॉफी तयार केली जाते

ही कॉफी उत्तर थायलंडमध्ये हत्तीच्या विष्ठेपासून तयार केली जाते. हत्तीला कॉफीची फळं खायला दिली जातात आणि त्याच्या विष्ठेतून बिया काढून कॉफी बनवली जाते. हत्तीच्या पचनक्रियेमुळे कॉफीचा स्वाद बदलतो आणि तो अधिक मऊ आणि सुगंधित बनतो. या प्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणात कॉफीची फळे आणि हत्तींची आवश्यकता असते, कॉफीची किंमत $500 प्रति पाउंड (₹41,903) आहे.

हेसिंडा ल एस्मेराल्डा कॉफी पश्चिम पनामाच्या पर्वतीय प्रदेशात उगवते. या कॉफीच्या दाण्यांना हाताने काढून थंड हवेत बऱ्याच दिवसांसाठी वाळवल्या जातात. तिथल्या नैसर्गिक ही कॉफी उच्च दर्जाची बनते. या कॉफीची किंमत $350 प्रति पाउंड (₹29,333) इतकी आहे.

ग्वाटेमालाच्या हुएहुएतेनांगो प्रदेशात एका विशिष्ट प्रकारच्या फळापासून एल इंजेरतो कॉफी बनवली जाते. या कॉफीला फळांसारखा, म्हणजेच फ्रुटी स्वाद येतो. ही कॉफी थोडीशी गोड असते, यामुळे ती वेगळी आहे. या कॉफीची किंमत सुमारे $50 प्रति पाउंड (₹5,585.73) आहे.

दक्षिण अटलांटिक महासागरातील बेटावर उगवली जाणारी ही कॉफी ग्रीन टिप्ड बॉर्बन अरेबिका बीनपासून बनवली जाते. फक्त याच ठिकाणी उगवली जात असल्यामुळे ही कॉफी खास आहे. तिच्या वाहतूक खर्चामुळे, ही कॉफी महाग आहे आणि याची किंमत $150 प्रति पाउंड (₹12,517) आहे.

इतर बातम्या

Black Flowers : हिवाळ्यामध्ये बागेत तशी फुलांची संख्या कमी असते. पण काही विशेष काळ्या रंगाची फुले हिवाळ्यातच पाहायला मिळतात आणि
National birds : विविध देशांचे राष्ट्रीय पक्षी वेगवेगळे असतात आणि प्रत्येक देशाचा राष्ट्रीय पक्षी त्या देशाच्या संस्कृती, इतिहास आणि पर्यावरणाशी
Gopinath Munde : लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांची आज जयंती. राजकीय आणि सामाजिक नेते म्हणून गोपीनाथराव मुंडे यांची विशेष ओळख आहे.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ