महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा नागपूरमध्ये पार पडला. नागपूरमधील राजभवनात पार पडलेल्या या कार्यक्रमात 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. यामध्ये भाजपचे 19, शिवसेनेचे 11 आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 मंत्र्यांचा समावेश आहे. महाराष्ट्र मंत्रिमंडळाची एकूण मर्यादा 43 मंत्र्यांची असून, सध्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांसह 42 सदस्यांनी शपथ घेतली आहे.
भाजपचे मंत्री:
चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, अतुल सावे, गणेश नाईक, मंगलप्रभात लोढा, शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार रावल, पंकजा मुंडे, आशिष शेलार, अशोक उईके, जयकुमार गोरे, संजय सावकारे, नितेश राणे, आकाश फुंडकर, माधुरी मिसाळ, मेघना बोर्डीकर, पंकज भोईर
शिवसेनेचे मंत्री:
शंभुराज देसाई, उदय सामंत, दादा भुसे, गुलाबराव पाटील, संजय राठोड, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, भरत गोगावले, प्रकाश आबिटकर, आशिष जयस्वाल, योगेश कदम
राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री:
हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, बाबासाहेब पाटील, दत्तात्रय भरणे, नरहरी झिरवळ, माणिकराव कोकाटे, मकरंद जाधव-पाटील, धनंजय मुंडे, इंद्रनील नाईक
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी:
५ डिसेंबर 2025 , रोजी मुंबईत झालेल्या शपथविधी सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे वरिष्ठ नेतेही उपस्थित होते.
खातेवाटपा वरून वाद
मंत्रिमंडळ विस्तारात काहीसा उशीर झाला. यामागे खातेवाटपावरून वाद होतं असल्याचे बोलले जात होते. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाने गृहखात्यासारखी महत्त्वाची खाती मागितली होती. मात्र, भाजपने ही मागणी मान्य केली नाही. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहखाते स्वतःकडेच ठेवले आहे.