आझाद मैदानावर महायुती सरकारचा शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी; लाडक्या बहिणींसाठी उभारला स्वतंत्र कक्ष

Mahayuti Oath Ceremony: आज महायुती सरकारचा शपथविधी सोहळा मुंबईतील आझाद मैदानावर पार पडणार आहे. या भव्य सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहेत. तसेच या सोहळ्यासाठी लाडक्या बहिणींसाठी विशेष आसनव्यवस्था करण्यात आली आहे.
[gspeech type=button]

आज महायुतीकडून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीमंत्री पदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे. दुपारी तीन वाजता मुंबईतील आझाद मैदानावर हा सोहळा पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरीसह राज्यातले केंद्रिय मंत्री आणि इतर विविध राज्यांचे मुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्याचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन हे तिन्ही नेत्यांना शपथ देणार आहेत. याशिवाय राज्यातील विविध पक्षांच्या नेत्यांसोबत धर्मगुरू, साधूसंतही या सोहळ्यात सहभागी होणार आहेत.

‘महाविजयाचा महाशपथविधी सोहळा’

शपथविधी सोहळ्यासाठी आझाद मैदानावर एकूण तीन व्यासपीठं उभारण्यात आली आहेत. मुख्य व्यासपीठ 100 फुटीचं असणार असून या व्यासपीठावर हा सोहळा साजरा होणार आहे. या व्यासपीठावर पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांसाठी आसन व्यवस्था करण्यात आली आहे. तर, मागील बाजूस मंत्री आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी आसन व्यवस्था आहे.  दुसरा मंच हा 10 फुटांचा असणार असून त्यावर अन्य राज्यातील मुख्यमंत्री व अन्य अतिमहत्त्वाच्या व्यक्तिची आसनव्यवस्था केली आहे. तर तिसरा मंच हा संगीत संयोजनासाठी राखीव ठेवलेला आहे.

‘लाडक्या बहिणींसाठी स्वतंत्र कक्ष’

या शपशविधी सोहळ्यामध्ये महायुतीच्या विजयाचं सर्व श्रेय मिळवलेल्या लाडक्या बहिणींसाठी विशेष कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. जवळपास 10 हजार लाडक्या बहिणींना प्रातिनिधीक स्वरूपात निमंत्रण देण्यात आलं आहे. तसंच 2 हजार व्हीव्हीआयपी पासेस देण्यात आली आहेत.

‘एक है तो सेफ है’ कार्यकर्त्यांसाठी विशेष आसन व्यवस्था

यावेळी महायुतीच्या कार्यकर्त्यांसाठी ‘एक है तो सेफ है’ अशा घोषणा लिहिलेले खास कक्ष तयार करण्यात आले असून, त्याठिकाणी कार्यकर्ते ‘एक है तो सेफ है’ अशा मजकुराचे टी-शर्ट परिधान करून उपस्थित राहतील. महायुतीतल्या सर्व घटकपक्षातील जवळपास 40 हजार कार्यकर्त्यांसाठी व्यवस्था उभी करण्यात आली आहे.

शपथविधी सोहळ्याचे लाईव्ह प्रक्षेपण

या संपूर्ण शपथविधी सोहळ्याचे सर्व सरकारी स्थळावरील एलईडीवरुन थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. यामुळे सर्व जनतेला हा सोहळा लाईव्ह बघता येणार आहे.

शपथविधी सोहळ्यातील सुरक्षा व्यवस्था

शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. आझाद मैदान परिसरात सुमारे 5,000 पोलीस अधिकारी तैनात असतील. यात 4,500 पोलीस अंमलदारांचा समावेश असेल. दंगल नियंत्रण पथक, बॉम्बशोधक व नाशक पथकेही तैनात केली जातील. सर्व मान्यवरांच्या व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी मार्गांवर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

वाहतूक व्यवस्थेतील बदल

शपथविधी सोहळ्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरावी, कारण आझाद मैदान परिसरात पार्किंगची व्यवस्था उपलब्ध नाही. रेल्वे आणि लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी हा सोयीचा पर्याय असणार आहे.

शपथविधीच्या दिवशी मुंबईतील काही मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुढील बदल केले जाणार आहेत.

– महानगरपालिका मार्ग : छत्रपती शिवाजी महाराज जंक्शन (सी.एस.एम.टी.) ते वासुदेव बळवंत फडके चौक (मेट्रो जंक्शन) पर्यंत वाहतूक बंद ठेवली जाईल.

पर्यायी मार्ग : एल.टी. मार्ग चकाला जंक्शन, उजवे वळण-डी.एन. रोडमार्गे.

– महात्मा गांधी रोड : चाफेकर बंधू चौक ते वासुदेव बळवंत फडके चौक पर्यंत वाहतूक बंद राहील.

पर्यायी मार्ग : एल.टी. मार्ग, वकाला जंक्शन उजवे वळण-डी.एन. रोडमार्गे.

-हजारीमल सोमानी मार्ग : वाहतूक प्रतिबंधित राहील.

पर्यायी मार्ग : चाफेकर बंधू चौक, हुतात्मा चौक, काळा घोडा मार्ग याप्रमाणे.

– आझाद मैदान आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस परिसरात मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते व नागरिक उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी आपल्या प्रवासाची योजना त्या अनुषंगाने नियोजित करावी.

– तसेच, कार्यक्रमाच्या सुरुवातीस व समारोपावेळी वाहतूक व्यवस्थेत आणखी बदल होऊ शकतात, त्यामुळे नागरिकांना सोयीसाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

cybercriminals : महाराष्ट्र सायबर विभागाने नुकतीच मोठी कारवाई करत म्यानमारमध्ये सायबर गुलामगिरीत अडकलेल्या 60 हून अधिक भारतीयांची सुखरूप सुटका केली
MMRDA : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) महत्त्वाचा निर्णय घेत सर्वसमावेशक आर्थिक ऐच्छिक भरपाई धोरण लागू करण्यास मान्यता दिली
Kerala High Court : केरळ उच्च न्यायालयाने नुकताच एक महत्त्वपूर्ण निकाल दिला. या निर्णयामुळे वैवाहिक कायद्यात एका नवीन महत्वाच्या मुद्द्याची

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ