मुंबईतील पश्चिम रेल्वेवरील वांद्रे स्थानकावर आज पहाटे चेंगराचेंगरीची घटना घडली. या चेंगराचेंगरी एकून 9 प्रवास जखमी झाले आहेत. यापैकी दोन प्रवासी गंभीर जखमी आहेत. सर्व गंभीर प्रवाशांवर वांद्रयातील के.बी.भाभा हा रूग्णालयात उपचार सुरु आहेत.
Maharashtra | Due to rush on platform number 1 of Bandra Terminus, 9 people have been injured in a stampede. Injured passengers have been shifted to a hospital: BMC
— ANI (@ANI) October 27, 2024
नेमकं काय घडलं?
पश्चिम रेल्वेवरील वांद्रे स्थानकावर पहाटे पाचच्या सुमारास ही घटना घडली. छट पुजेनिमित्ते गावी जाणाऱ्या अनेक प्रवाशांची स्थानकावर खूप गर्दी झाली होती. वांद्रे-गोरखपूर अंत्योदय एक्स्प्रेस गाडी स्थानकामध्ये येताच सर्व प्रवाशांनी चढण्यासाठी खूप गर्दी केली आणि चेंगराचेंगरीची घटना घडली.. या दरम्यान, काही प्रवास प्लॅटफॉर्मवर पडल्यांने जखमी झाले.
या सर्व प्रवाशांना रेल्वे प्रशासनाने तात्काळ के.बी. भाभा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. त्यापैकी 2 प्रवाशांची प्रकृती ही गंभीर आहे.
पश्चिम रेल्वेची माहिती
पश्चिम रेल्वेचे पीआरओ विनीत अभिषेक यांनी या घटनेची माहिती दिली आहे. वांद्रे-गोरखपूर अंत्योदय एक्स्प्रेस ही गाडी कारशेडमधून स्थानकांवर येत असतानाच काही प्रवाशांनी चालत्या गाडीमध्ये चढण्याचा प्रयत्न करताना दोन प्रवासी जखमी झाले. सणासुदीच्या काळात लांब पल्ल्यांच्या गाड्या या जवळपास 2-3 तास आधी रेल्वे स्थानकावर आणल्या जातात. आजही गोरखपूर एक्स्प्रेस वेळेच्या आधी स्थानकावर आली होती.
दरम्यान, पश्चिम आणि मध्य रेल्वेकडून सणासुदीच्या काळात सुटणाऱ्या गाड्यांचे वेळोवेळी प्रवाशांना माहिती दिली जाते. या काळात विशेष गाड्या सोडल्या जातात. तसेच तिकीटांसाठी वाढीव काऊंटर्स सुरु केले जातात. गाडी सुटायच्या वेळी अशा अनुचित घटना घडू नयेत याची दक्षता घेण्यासाठी रेल्वे आणि सुरक्षा पोलिसही स्थानकावर उपस्थित असतात, अशी माहिती पीआरओ अभिषेक यांनी दिली आहे.
#WATCH | On stampede at Bandra Terminus, CPRO Western Railway Vineet Abhishek says, "Today morning, at Bandra Terminus, Bandra-Gorakhpur Antyoday Express, whose scheduled departure time is 5.15 am, was taken to the platform from the yard at, some passengers tried to board the… pic.twitter.com/eELPToRUen
— ANI (@ANI) October 27, 2024
रेल्वे प्रशासनाचे आवाहन
या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना गर्दी न करण्याचं आणि रेल्वेत चढत असताना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
सध्या वांद्रे स्थानकातील प्लॅटफॉर्म परिस्थिती व्यवस्थित असून प्लॅटफॉर्मवर पोलीस उपस्थित असल्याची माहिती देण्यात येत आहे.