GFF | मुंबईत भरलंय सर्वात मोठं ग्लोबल फिनटेक फेस्ट

फायनान्स आणि टेक्नॉलॉजी या क्षेत्रांशी संबंधित सर्वच मुद्द्यांवर एकाच व्यासपीठावर  सांगोपांग चर्चा आणि विचारविनिमय करण्याकरता जगभरातील धोरणकर्ते, राष्ट्रप्रमुख, अर्थमंत्री, केंद्रीय बँकांचे प्रमुख प्रतिनिधी, औद्योगिक साम्राज्यांचे प्रमुख, अर्थतज्ज्ञ, विचारवंत गेली चार वर्षे एकत्र येत आहेत. यंदाच्या फेस्टमध्ये पुढच्या आर्थिक दशकाकरता ‘जबाबदार आर्टिफिशियल इन्टिलिजन्स, सर्वसमावेशकता आणि पुनर्वसन’ यावर भर देण्यात येत आहे.
[gspeech type=button]

आर्थिक, उद्योग आणि तंत्रज्ञान या सर्वच क्षेत्रात दररोज काही ना काही नवीन घडतच असतं. या तिन्ही क्षेत्रांचा परस्पर संबंध आहे. आज आपण जागतिक पातळीपासून गावखेड्यापर्यंत लहान मोठ्या आर्थिक व्यवहारांसाठी, देवाणघेवाणीसाठी तंत्रज्ञानाचा वापर करतो. या क्षेत्रांतील परस्पर सहकार्य, नवीन संधी, आव्हानं आणि सुरक्षितता यावर एकत्रित विचारविनिमय करण्यासाठी 2020 पासून ग्लोबल फिनटेक फेस्टचं आयोजन करण्यात येतं. यंदा मुंबईतल्या बीकेसीमध्यल्या जियो वर्ल्डमध्ये दिनांक  28 ते 30 ऑगस्ट दरम्यान हा फेस्ट होत आहे.

फायनान्स आणि टेक्नॉलॉजी या क्षेत्रांशी संबंधित सर्वच मुद्द्यांवर एकाच व्यासपीठावर  सखोल चर्चा आणि विचारविनिमय करण्याकरता जगभरातील धोरणकर्ते, राष्ट्रप्रमुख, अर्थमंत्री, केंद्रीय बँकांचे प्रमुख प्रतिनिधी, औद्योगिक साम्राज्यांचे प्रमुख, अर्थतज्ज्ञ, विचारवंत गेली चार वर्षे एकत्र येत आहेत. यंदाच्या फेस्टमध्ये पुढच्या आर्थिक दशकाकरता ‘जबाबदार आर्टिफिशियल इन्टिलिजन्स, सर्वसमावेशकता आणि पुनर्वसन’ यावर भर देण्यात येत आहे.

ग्लोबल फिनटेक फेस्ट 2024

यंदा भारतात होणाऱ्या या ग्लोबल फिनटेक फेस्टचे आयोजन पेमेंट्स कौन्सिल ऑफ इंडिया, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि फिनटेक कन्वर्जन्स कौन्सिल यांनी संयुक्तपणे केलं आहे. फायनान्स आणि टेक्नोलॉजी या दोन शब्दांचा मेळ घालून ‘फिनटेक’ हा शब्द तयार करण्यात आला आहे. नावावरूनच आपल्या लक्षात येतं की, अर्थ आणि तंत्रज्ञान यांची सांगड घालून जे उद्योग उभे केले जातात, त्यांचा समावेश फिनटेकमध्ये होतो. उदा. पेटीएम, फोन पे, ऑनलाईन व्यवसाय करण्याऱ्या विविध साईट्स.

यंदाच्या फेस्टमध्ये 800 हून अधिक वक्ते विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण, केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव, आरबीआय गर्व्हनर शक्तिकांत दास, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रत्येक देशाच्या अर्थ खात्याशी संबंधित उच्च अधिकारी, जागतिक पातळीवरील महत्त्वांच्या आर्थिक संस्थेचे प्रमुख हे या फेस्टमध्ये मार्गदर्शन करत आहेत.

अॅग्री हेकेथॉन

त्याचप्रमाणे या फेस्टच्या माध्यमातून कृषी क्षेत्राच्या आधुनिकतेवरही भर दिला जातो. यंदा कृषी क्षेत्राच्या वृद्धीसाठी डिजीटल सोल्यूशन यावर भर देण्यात येत आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या मालाच्या विक्रीसाठी तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल, डिजीटल शिक्षण कसं देता येईल, आव्हानं आणि उपाययोजना या सर्व विषयांवर चर्चा केली जात आहे.

स्टार्टअप्ससाठी ‘द कॅपिटल अक्सेस वर्कशॉप’

या तीन दिवसांत टॉप 10 स्टार्टअप्सनां त्यांच्या स्टार्ट अप्सची माहिती उपस्थितांना देता येणार आहे. यातून त्यांच्या व्यवसायामध्ये त्यांना गुंतवणूक सुद्धा मिळवता येईल. या नवीन स्टार्ट अप्सनां मार्गदर्शन करण्यासाठी ‘द कॅपिटल अक्सेस वर्कशॉप’ कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. यात स्टार्ट अप सुरू करताना येणाऱ्या अडचणी, त्यावरच्या उपाययोजना, नवीन कल्पना अशा सगळ्या विषयांवर मार्गदर्शन केलं जाणार आहे.

या फेस्टमध्ये कसं सहभागी होता येईल?

फेस्टमध्ये भाग घेण्यासाठी ग्लोबल फिनटेक फेस्टच्या globalfintechfest.com वेबसाईटवर नाव नोंदवायचं आहे. ही नाव नोंदणी केल्यावर सहभागीतांना पास दिला जातो. त्यामध्ये तीन प्रकारचे पास आहे. प्लॅटिनम पासेस हे फक्त निमंत्रितांसाठी आहेत. या संमेलनातील किती सत्रं ऐकायची आहेत, त्यानुसार गोल्ड आणि सिल्वर पास घेता येतील.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

cybercriminals : महाराष्ट्र सायबर विभागाने नुकतीच मोठी कारवाई करत म्यानमारमध्ये सायबर गुलामगिरीत अडकलेल्या 60 हून अधिक भारतीयांची सुखरूप सुटका केली
MMRDA : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) महत्त्वाचा निर्णय घेत सर्वसमावेशक आर्थिक ऐच्छिक भरपाई धोरण लागू करण्यास मान्यता दिली
Kerala High Court : केरळ उच्च न्यायालयाने नुकताच एक महत्त्वपूर्ण निकाल दिला. या निर्णयामुळे वैवाहिक कायद्यात एका नवीन महत्वाच्या मुद्द्याची

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ