भारतामध्ये मंकी पॉक्स क्लेड 1 बी व्हेरिएंटचा शिरकाव, केरळमध्ये सापडला पहिला रूग्ण

Source : KEPR
Mpox in India : भारतातमध्ये क्लेड 1 बी (Clade 1b strain) व्हेरिएंट असलेला मंकी पॉक्सचा पहिला रूग्ण सापडला आहे. दुबई येथून भारतात परतलेल्या 38 वर्षाच्या व्यक्तिला मंकी पॉक्सची लागण झाली आहे. या रूग्णावर केरळच्या शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. एमपॉक्स क्लेड 1 बी चा रूग्ण आढळल्यावर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनकडून (WHO) पुन्हा एकदा आणिबाणी जाहीर करण्यात आली आहे.
[gspeech type=button]

भारतातमध्ये क्लेड 1 बी व्हेरिएंट असलेला मंकी पॉक्सचा पहिला रूग्ण सापडला आहे. दुबई येथून भारतात परतलेल्या 38 वर्षाच्या व्यक्तिला मंकी पॉक्सची लागण झाली आहे. या रूग्णावर केरळच्या शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. एमपॉक्स क्लेड 1 बी चा रूग्ण आढळल्यावर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनकडून पुन्हा एकदा आणिबाणी जाहीर करण्यात आली आहे.

यापूर्वी भारतामध्ये 14 जुलै 2022 ते मार्च 2023 दरम्यान मंकी पॉक्स क्लेड 1 आणि क्लेड 2 व्हेरिएंट असलेले 30 रूग्ण सापडले होते. यापैकी फक्त एकाच रूग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. बाकी सगळे रूग्ण यातून बरे झाले आहेत. त्यामुळे मंकी पॉक्स संबंधित कोणतेही लक्षणे आढळल्यास घाबरून न जाता वेळेत योग्य ते उपचार आणि काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

मंकी पॉक्सचे व्हेरिएंट्स, लक्षणे आणि प्रसार कसा होतो?

मंकी पॉक्सचे आत्तापर्यंत तीन व्हेरिएंट्स सापडले आहेत. क्लेड 1, क्लेड 2 आणि क्लेड 1 बी. त्यापैकी क्लेड 1 आणि क्लेड 1 बी या दोन व्हेरिएंट्सचा प्रसार काँगो देशामधुन होत आहे.
या आजाराचा प्रसार हा अती जवळीक झाली तरच होतो. किंवा शरिरावर आलेल्या फोडीतून लस लागली तर याचा प्रसार होतो. मात्र, कोरोना सारखा हवेतून या एमपॉक्सचा प्रसार होत असल्याचं अजून निदर्शनास आलेलं नाहीये. यामध्ये साधारण: तापासारखीच लक्षणे दिसून येतात.

 

हे ही वाचा :  काय काळजी घ्यावी?

Mpox – लंबी रेस का घोडा

केरळमधील आरोग्य प्रशासन वॉर फुटवर

केरळमधील आरोग्य प्रशासनाने पहिला रूग्ण आढळल्यावर या आजाराच्या प्रसाराला प्रतिबंध करण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यायला सुरूवात केली आहे. आरोग्य प्रशासनाकडून सर्व विमानतळावर तपासणी केंद्र सुरू केले आहेत. परदेशातून येणाऱ्या ज्या-ज्या प्रवाशांना लक्षणे जाणवतात त्यांना विमानतळावरच तपासणी करून घेण्याचं आवाहन केलं जात आहे.

ज्या – ज्या रूग्णालयामध्ये एमपॉक्स रूग्णांवर उपचार केले जातात, त्या रूग्णालयांची व आयसोलॅशन केंद्रांची तसेच वर्ल्ड हेस्थ ऑर्गनायझेशनकडून तयार करण्यात आलेल्या एसओपीची माहिती लोकांपर्यंत सोशल मीडियाच्या साहाय्याने पोहोचवली जात आहे.
तसंच या रूग्णांवर उपचार करणाऱ्या आरोग्य सेविकांनाही विशेष कीट्स दिले आहेत. त्यांनाही योग्य ती काळजी घेऊन रूग्णांवर उपचार करण्याचं आवाहन आरोग्य प्रशासनाकडून केलं आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

cybercriminals : महाराष्ट्र सायबर विभागाने नुकतीच मोठी कारवाई करत म्यानमारमध्ये सायबर गुलामगिरीत अडकलेल्या 60 हून अधिक भारतीयांची सुखरूप सुटका केली
MMRDA : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) महत्त्वाचा निर्णय घेत सर्वसमावेशक आर्थिक ऐच्छिक भरपाई धोरण लागू करण्यास मान्यता दिली
Kerala High Court : केरळ उच्च न्यायालयाने नुकताच एक महत्त्वपूर्ण निकाल दिला. या निर्णयामुळे वैवाहिक कायद्यात एका नवीन महत्वाच्या मुद्द्याची

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ