Apple कंपनीनं iPhone 16 सीरीज लॉन्च केली आहे. यावेळी कंपनी 90 दशलक्ष पेक्षा अधिक युनिट्स शिप करण्याची योजना आखत आहे. iPhone 16 या सिरीजमधल्या मोबाईल्सची किंमत 79 हजार रुपयांपासून सुरू होत आहे. iPhone 16 Pro ची मेमरी 1TB आहे. iPhone 16 मध्ये अनेक अपग्रेडेड फीचर्स कंपनीनं दिल्यानं या सीरिजला लोकांचा चांगला प्रतिसाद लाभेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
मॉडेल्स – iPhone 16 सीरीजमध्ये पाच मॉडेल्सचा समावेश आहे:
– iPhone 16
– iPhone 16 Plus
– iPhone 16 Pro
– iPhone 16 Pro Max
– iPhone 16 Plus SE/iPhone SE (2024)
नवीन फिचर्स
चिपसेट– iPhone 16 सीरीजमध्ये नवीन A17 आणि A18 चिप्स आहेत. यामुळे फोनला चांगला स्पीड मिळणार आहे आणि मेमरी बॅण्डविथही वाढणार आहे.
कॅमेरा – iPhone 16 मध्ये 48 मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे तर iPhone 16 Pro Max मध्ये 48 मेगापिक्सेलचा Sony IMX903 सेंसर आणि पेरिस्कोप लेन्स आहे. iPhone 16 Pro मध्ये 48 मेगापिक्सेलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आहे. सर्व मॉडेल्समध्ये 12 मेगापिक्सेलचा TrueDepth फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे.
डायनॅमिक आयलँड – iPhone 16 मध्ये डायनॅमिक आयलँड डिस्प्ले नोटिफिकेशन्स आणि अलर्टसाठी वापरला जाईल.
iOS 18 – iPhone 16 मध्ये नवीन iOS 18 ऑपरेटिंग सिस्टम असून यामध्ये अनेक नवीन फीचर्स आणि सुधारणा असतील.
डिझाईन – iPhone 16 सीरीजमध्ये व्हर्टीकल रिअर कॅमेरा सेटअप आणि टच सेन्सिटिव्ह बटणे आहेत. नवीन ‘कॅप्चर बटण’ कॅमेरा शॉर्टकटसाठी असेल.
मेड इन इंडिया – iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max भारतात, श्रीपेरुंबदूर येथील फॉक्सकॉन प्लांटमध्ये बनवले जाऊ शकतात. यामुळे iPhone च्या किमतीत फरक पडू शकतो.
AI फीचर्स – iPhone 16 मध्ये AI फीचर्स फोटो, व्हिडिओ आणि इतर कामांमध्ये मदत करतील.
रंग – iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max हे ब्लॅक टायटॅनियम , नॅचरल टायटॅनियम, व्हाइट टायटॅनियम, डेजर्ट टायटॅनियम या चार रंगामध्ये उपलब्ध आहेत.