हिवाळ्यात सूर्यप्रकाश कमी मिळाल्यामुळे शरीरातील विटामिन डी कमी होऊ शकते. यामुळे हाडांची कमजोरी, रोगप्रतिकारशक्ती कमी होणे आणि इतर आरोग्य समस्यांचा धोका वाढू शकतो. पण काही खाद्यपदार्थ खाऊन तुम्ही या विटामिन डीची कमतरता सहज भरू शकता. चला, जाणून घेऊया हिवाळ्यात तुम्ही आपल्या आहारात समाविष्ट करू शकता असे सुपरफूड्स:
1. साल्मन, बांगडा, पेडवे आणि तारली
साल्मन, बांगडा, पेडवे आणि तारलीसारख्या चरबीयुक्त माशांमध्ये भरपूर प्रमाणात विटामिन डी आणि ओमेगा-3 फॅटी ऍसिड्स आढळतात. शिजवलेल्या साल्मनच्या एका सर्व्हिंगमध्ये वृद्धांसाठी दिवसभरात आवश्यक असलेल्या विटामिन डीच्या गरजेच्या अर्ध्याहून अधिक प्रमाण मिळते. ओमेगा-3 फॅटी ऍसिड्स हृदयाच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचं आहे.
2. कॉड लिव्हर ऑईल
कॉड लिव्हर ऑईलमध्ये विटामिन डी चे प्रचंड प्रमाण असते, एक चमचा कॉड लिव्हर ऑईलमध्ये सुमारे 1360 आययू विटामिन डी मिळते. हे सामान्यतः खाद्य म्हणून वापरले जात नाही. परंतु बहुतेकदा पूरक आहार म्हणून घेतले जाते. विटामिन डी सोबतच यात ओमेगा-3 फॅटी ऍसिड्स आणि जीवनसत्त्व A देखील भरपूर प्रमाणात असते. तुम्हाला जर याची चव आवडत नसेल तर कॅप्सूल्स किंवा गोळ्यांच्या रूपात तुम्ही याचे सेवन करू शकता.
3. दुग्धजन्य पदार्थ
दूध, दही आणि पनीर यामध्ये विटामिन डी जोडलेले असते. एक ग्लास दुधात साधारणपणे 100 IU विटामिन डी असतो. विशेषतः हिवाळ्यात जेव्हा सूर्यप्रकाश कमी मिळतो, तेव्हा दुग्धजन्य पदार्थांनी या जीवनसत्त्वाची कमतरता भरून काढता येते.
4.अंडी
अंड्यातील पिवळ्या भागात (योल्क) विटामिन डी असतो. एक अंड हे तुमच्या शरीरासाठी आवश्यक असलेले काही प्रमाणात विटामिन डी देऊ शकते. नाश्ता किंवा जेवणात अंडी समाविष्ट करून आपण विटामिन डी ची गरज पूर्ण करू शकतो
5.सूर्यप्रकाशात वाढलेली मशरूम
काही प्रकारच्या मशरूममध्ये, खास करून सूर्यप्रकाशात वाढलेल्या मशरूममध्ये विटामिन डी भरपूर असते. माईटेक मशरूम मध्ये 100 ग्रॅममध्ये 1000 IU विटामिन डी असू शकते. हे शाकाहारी लोकांसाठी एक उत्तम पर्याय आहे.
6. ब्रेकफास्ट सीरियल्स
बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक ब्रेकफास्ट सीरियल्समध्ये विटामिन डी असते. या सीरियल्समध्ये 40 ते 100 IU पर्यंत विटामिन डी मिळू शकते. जर तुम्ही त्यांना दुधासोबत खाल्लात, तर त्याचे फायदे अधिक होऊ शकतात.
7. चीज
चीजमध्ये कमी प्रमाणात विटामिन डी असले तरी ते शरीरातील विटामिन डीचे प्रमाण वाढवण्यास चीझ मदत करते. स्विस आणि चेडर चीज मध्ये 6 ते 8 IU विटामिन डी असतो.
8. संत्र्याचा रस
बाजारात विकत मिळणाऱ्या अनेक ब्रँडच्या संत्र्याच्या रसांमध्ये विटामिन डी असते. एक ग्लास संत्र्याचा रसामध्ये साधारणत: 100 IU विटामिन डी असते.
9. सोया मिल्क आणि सोया उत्पादने
सोया मिल्क आणि अन्य सोया आधारित पदार्थांमध्ये विटामिन डी असते. हे व्हिगन लोकांसाठी एक उत्तम पर्याय आहे.
हिवाळ्यात योग्य आहाराने तुम्ही शरीरातील विटामिन डीची कमतरता भरून काढू शकता. यासाठी तुम्ही वर दिलेले सुपरफूड्स आपल्या आहारात समाविष्ट करू शकता.