हिवाळ्यात थंडीमुळे त्वचा कोरडी आणि रूक्ष होऊन चेहऱ्यावर सुरकुत्या आणि काळवंडण्याची शक्यता असते. त्यामुळे हिवाळ्यात त्वचेची विशेष काळजी घेणं, अत्यंत महत्त्वाचं आहे. त्वचेची योग्य काळजी घेतली तर, काही सोप्या टिप्स वापरून आपली त्वचा निरोगी, मऊ आणि चमकदार राहू शकते.
1. मॉइश्चरायझिंग लोशन वापरा
अंघोळ झाल्यानंतर त्वचा थोडी ओलसर असतानाच मॉइश्चरायझिंग लोशन लावा. सेरामाइड आणि आवश्यक तेल असलेली क्रीम वापरल्याने त्वचा हायड्रेड राहते.
2. पपईचा वापर
पपईमध्ये अनेक पोषक घटक असतात. पिकलेली पपई मॅश करून चेहऱ्यावर लावल्याने त्वचेला पोषण मिळते. कच्च्या दुधात पपई मिक्स करूनही तुम्ही ते चेहऱ्याला लावू शकता.
3. गुलाबपाणी आणि एलोवेरा
गुलाबपाणी किंवा एलोवेरा जेलचे मिश्रण चेहऱ्यावर लावल्याने त्वचेला पोषण मिळून ती मऊ होते.
4. सनस्क्रीन
हिवाळ्यात देखील सूर्याच्या किरणांमुळे त्वचा कोरडी पडते. त्यामुळे बाहेर जातांना सनस्क्रीन लावणे अत्यंत आवश्यक आहे.
5.ओठांची काळजी
हिवाळ्यात ओठांचा कोरडेपण टाळण्यासाठी लिप बाम वापरावा किंवा कोरफड, साखर, नारळ तेल, हळद, दूध, बदाम तेल आणि लिंबू यांचा वापर करून ओठांसाठी खास स्क्रब तयार करा. यामुळे ओठ मऊ आणि कोमल राहतील.
6 हातापायांची काळजी
हातापायांची त्वचा हिवाळ्यात कोरडी होऊ शकते यासाठी मॉइश्चरायझिंग क्रीम लावून ग्लोव्हज आणि सॉक्स घालावे.
7.स्क्रबचा वापर
त्वचेवरील डेड स्किन काढण्यासाठी आठवड्यातून दोन वेळा तरी स्क्रब वापरावे.
8 Essential oils चा वापर
लव्हेंडर, खोबरेल तेल आणि प्राईमरोज ऑईल त्वचेला हायड्रेट आणि मॉइश्चराइज ठेवण्यासाठी मदत करतात.
9. आहार
त्वचा कोरडी होण्यापासून रोखण्यासाठी व्हिटॅमिन-ई, व्हिटॅमिन-सी आणि अँटी-ऑक्सिडंट्स युक्त पदार्थांचे सेवन करा. यासाठी सुका मेवा, हिरव्या भाज्या आणि या मौसमातली ताजी फळं खा.
10.भरपूर पाणी प्या
त्वचेची बाह्य काळजी घेत असताना अंतर्गत काळजी घेणं देखील महत्त्वाचं आहे त्यामुळे भरपूर पाणी प्या.
हिवाळ्यात त्वचेला नाजूक आणि हायड्रेट ठेवण्यासाठी वरील टिप्स उपयुक्त ठरतील. योग्य काळजी घेतल्यास तुमची त्वचा निरोगी, मऊ आणि चमकदार राहील.