तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का, की मस्करा किंवा मेकअप ब्रश किती काळ वापरायचे ?
“थोडं अजून चालेल,” असं म्हणून आपण अनेकदा या गोष्टी जास्त दिवस वापरतो. पण तज्ज्ञ काय म्हणतात, हे तुम्हाला माहीत आहे का? जुने मेकअप साहित्य वापरल्याने आपल्या त्वचेला त्रास होऊ शकतो.
जुने मेकअप साहित्य आणि त्वचेवरिल परिणाम
आपल्याला आवडलेली सौंदर्य उत्पादने जास्त दिवस वापरण्याचा मोह होतो. पण लक्षात ठेवा, तारीख उलटून गेलेले मेकअप साहित्य त्वचेवर वाईट परिणाम करू शकते. त्वचेवर ऍलर्जी येणं, पुरळ येणं, डोळे चुरचुरणं असे अनेक त्रास होऊ शकतात.
“आपण चेहऱ्याला जे काही लावतो, त्या साहित्याचा वापर काळजीपूर्वक केला नाही आणि ते वेळेवर बदललं नाही, तर आपल्या त्वचेला त्रास होऊ शकतो.” असं तज्ज्ञ सांगतात.
मेकअपची साफसफाई आवश्यक
इंट्रिग कॉस्मेटिक क्लिनिकमधील फार्मासिस्ट आणि वैद्यकीय सौंदर्यशास्त्रज्ञ अमिश पटेल म्हणतात, “तुमची मेकअप बॅग स्वच्छ ठेवणं आणि जुन्या वस्तू काढून टाकणं, निरोगी त्वचा राखण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे.”
डॉ. पटेल असंही सांगतात की, “जर तुम्ही जुनी झालेली सौंदर्य प्रसाधने वापरत असाल, तर खबरदार. त्या प्रसाधनांतील रसायने निर्धारीत तारखेनंतर घातक होतात आणि त्वचेला हानी पोहचवतात. त्वचेला खाज येते आणि ऍलर्जी होऊ शकते.”
काय काळजी घ्यावी?
- मेकअप प्रोडक्टची एक्सपायरी डेट पाहून जुन्या वस्तू काढून टाका.
- मेकअप ब्रश आणि स्पंज स्वच्छ ठेवा.
- मेकअप ब्रश आणि स्पंज कोरडे ठेवा.
- ठराविक दिवसांनी स्पंज बदला.
- चांगल्या दर्जाचे मेकअप प्रोडक्ट वापरा.
- मेकअप प्रोडक्ट थंड आणि कोरड्या जागी साठवा.
प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आणि एला- जोच्या सह-संस्थापक चार्लीन फ्लॅनगन यांच्या मते. आपल्या मेकअप प्रोडक्ट्सची आणि साधनांची काळजी घेणे आपल्या त्वचेची काळजी घेण्या इतकेच महत्वाचं आहे.
10 वर्षांहून अधिक काळ प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करणाऱ्या फ्लॅनगन यांनी मेकअप प्रोडक्ट आणि ब्रश किती वेळा बदलायला हवेत, याबद्दल सांगितलं आहे.
किती काळानंतर मेकअप प्रोडक्ट बदलायचे?
1.मस्कारा
मस्कारा दर 3 महिन्यांनी बदलायला हवा. जर मस्कारा सुकायला लागला किंवा त्याचा वास बदलला तर तो लगेच बदलायला हवा.
2.मेक-अप ब्रश
मेक-अप ब्रश नैसर्गिक केसांचे आहेत की कृत्रिम, यावर त्यांची शेल्फ लाईफ अवलंबून असते. कृत्रिम ब्रश जास्त काळ टिकतात.
3.फाउंडेशन
लिक्विड फाउंडेशन 6 ते 12 महिन्यांत बदलले पाहिजे. तर पावडर फाउंडेशन 2 वर्षांपर्यंत टिकू शकते.
4.लिपस्टिक आणि लिप ग्लॉस
लिपस्टिक 12 ते 18 महिन्यांत आणि लिप ग्लॉस 6 ते 12 महिन्यांत बदलायला हवा.
5.ब्युटी ब्लेंडर
ब्युटी ब्लेंडर दर 3 महिन्यांनी बदलायला हवं किंवा त्याआधीही.
6.कन्सीलर
लिक्विड कन्सीलर 6 ते 12 महिने. आणि स्टिक कन्सीलर 18 महिन्यांपर्यंत टिकते.
7.आयलाइनर
पेन्सिल आयलाइनर 2 वर्षांपर्यंत टिकते. तर लिक्विड किंवा जेल आयलाइनर 3 ते 6 महिन्यांत बदलायला हवे.