चांदीचे दागिने सगळ्यांनाच शोभतात का? जाणून घ्या योग्य स्टाइलिंग टिप्स!

Lifestyle: आजच्या ट्रेंडमध्ये चांदीचे दागिने मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाले आहेत. विशेषतः तरुणींमध्ये यांची क्रेझ वाढली आहे. पण फक्त फॅशन म्हणून दागिने घालणं पुरेसं नसतं. ते आपल्या व्यक्तिमत्त्वाला आणि लूकला शोभतात का, हे पाहणं महत्त्वाचं असतं.
[gspeech type=button]

आजच्या ट्रेंडमध्ये चांदीचे दागिने मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाले आहेत. विशेषतः तरुणींमध्ये यांची क्रेझ वाढली आहे. पण फक्त फॅशन म्हणून दागिने घालणं पुरेसं नसतं. ते आपल्या व्यक्तिमत्त्वाला आणि लूकला शोभतात का, हे पाहणं महत्त्वाचं असतं. तुम्हाला चांदीचे दागिने घालायचे असतील, तर काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात.

चांदीचे दागिने कोणाला चांगले दिसतात?

सर्वांनाच चांदीचे दागिने शोभतात असं नाही. काही लोकांना सोन्याचे दागिने जास्त आकर्षक वाटतात,तर काहींना चांदीचे. पण यामागे केवळ आवड नसते, तर त्वचेचा ‘अंडरटोन’, केसांचा रंग आणि संपूर्ण लुकसुद्धा महत्त्वाचा असतो.

त्वचेच्या ‘अंडरटोन’नुसार दागिने निवडा

त्वचेच्या आतल्या रंगाला ‘अंडरटोन’ म्हणतात. हा अंडरटोन ठरवण्यासाठी मनगटावरील नसा पाहा.

-हिरव्या किंवा पिवळसर नसा असतील, तर तुमचा अंडरटोन उष्ण (Warm)आहे. आणि सोन्याचे दागिने जास्त उठून दिसतील.

-निळ्या किंवा जांभळ्या नसा असतील, तर तुमचा अंडरटोन शीतल (Cool) आहे. आणि चांदीचे दागिने तुमच्यावर खास उठून दिसतील.

डोळे आणि केसांचा रंगही महत्त्वाचा

– निळे, हिरवे किंवा राखाडी डोळे, तसेच हलक्या तपकिरी रंगाचे केस असणाऱ्या लोकांना चांदीचे दागिने विशेष शोभून दिसतात.

– यामुळे चेहऱ्यावर एक वेगळाच ग्लो येतो आणि संपूर्ण लुकला एक फ्रेशनेस मिळतो.

ड्रेस आणि मेकअपनुसार दागिने निवडा

तुम्ही तुमच्या ड्रेस आणि मेकअपनुसार देखील योग्य दागिने निवडू शकता.

– निळा, जांभळा, गुलाबी, काळा रंगाचा मेकअप किंवा ड्रेस असेल, तर चांदीचे दागिने सर्वोत्तम पर्याय आहेत.

– लाल, नारंगी किंवा सोनेरी रंगाचा पोशाख असेल, तर सोन्याचे दागिने अधिक आकर्षक वाटतील.

बोल्ड आणि ग्लॅमरस लुकसाठी चांदीचे दागिने

स्टायलिस्ट भावना कुमार यांच्या मते, चांदीचे दागिने तुमच्या लुकमध्ये बोल्डनेस आणू शकतात. मात्र, हे साध्या डिझाईनपेक्षा जरा हटके आणि मोठ्या आकारात निवडले, तर अधिक इम्प्रेसिव्ह वाटतात.

– नेकलेस, कॉकटेल रिंग आणि ब्रेसलेट हे प्रकार चांदीत खूप छान दिसतात.

– काळ्या रंगाच्या कपड्यांसोबत चांदीचे दागिने खास शोभून दिसतात आणि एक स्टायलिश लुक देतात.

– बोल्ड आणि ट्रेंडी लुक हवा असेल, तर चांदीचे दागिने निवडताना खूप जाडसर डिझाईन टाळा आणि कमीत कमी पण प्रभावी स्टाइल निवडा.

योग्य दागिन्यांसोबत परिपूर्ण लुक

चांदीचे दागिने घालण्याचा ट्रेंड नक्कीच लोकप्रिय आहे, पण तो तुमच्यावर शोभतो का, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. त्वचेचा अंडरटोन, केसांचा रंग, मेकअप आणि कपडे या सर्वांचा विचार करून जर तुम्ही दागिने निवडले, तर तुमचा लुक नेहमी आकर्षक आणि परिपूर्ण दिसेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

lifestyle : शाळा असो वा जीवनातील इतर जबाबदाऱ्या यावर लक्ष केंद्रित करणं प्रत्येकासाठी महत्वाचं असतं. विशेषतः विद्यार्थ्यांनी अभ्यासात एकाग्रता वाढवणे
Makeup product : आपल्याला आवडलेली सौंदर्य उत्पादने जास्त दिवस वापरण्याचा मोह होतो. पण लक्षात ठेवा, तारीख उलटून गेलेले मेकअप साहित्य
Lifestyle : आपल्या शरीराचे आरोग्य आपण काय खातो यावर अवलंबून असते. मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी शारीरिकदृष्ट्या निरोगी असणे आवश्यक आहे.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ