सर्वांनाच सुंदर दिसायला आवडतं. पण बरेचदा आपण फॅशनच्या मागे धावताना आपल्या अंगकाठीला शोभणारे कपडे निवडायला चुकतो. प्रत्येकाचा शरीराचा बांधा हा वेगळा असतो. अशावेळी आपण आपल्या शरीराच्या रचनेप्रमाणे कपडे निवडणे गरजेचं असतं.
ट्रेंडच्या मागे धावू नका
काहीजण नवीन ट्रेंड आला की लगेच तो फॉलो करायला जातात. पण नवीन काही ट्राय करण्याआधी तुमच्यावर ते कपडे चांगले दिसतील का हे पाहणं देखील आवश्यक आहे. म्हणूनच आज आपण आपल्या शरीर बांध्याचा प्रकार कसा ओळखायचा आणि कोणत्या कपड्यांची निवड करायची हे पाहणार आहोत.
1. पिअर शेप (Pear Shape)
पेर या फळाच्या आकारावरुन या बांध्याला नाव ‘पिअर शेप’ असे ठेवण्यात आले आहे. पेर फळाचा आकार हा वरुन लहान आणि खालून मोठा असतो. तसाच काही लोकांच्या शरीराचा खालचा भाग वरच्या भागापेक्षा मोठा असतो.
कपडे
-फ्लेअर्ड ड्रेसेस उत्तम.
-लांब कपडे घालता येतात.
-गडद रंगाच्या पँट घाला, त्यामुळे बारीक दिसाल.
-ऑफ शोल्डर किंवा ट्यूब ड्रेसेस.
-गळ्यालगत असलेली ज्वेलरी निवडा.
2. हावर ग्लास शेप (Hourglass Shap)
‘हावर ग्लास’ म्हणजे वाळूचे घड्याळ. वाळूच्या घड्याळाचा आकार जसा वरून आणि खालून मोठा आणि मध्यभागी लहान असतो, तसाच काही लोकांच्या शरीराचा आकार असतो. छाती आणि नितंबाचा आकार मोठा आणि कंबर लहान, असा हा शरीराचा आकार असतो. काहींना हा शरीराचा आकार जन्मत:च मिळतो. तर काही जण त्यासाठी जीमला जातात.
कपडे
-बॉडीकॉन ड्रेसेस.
-बेल्टेड ड्रेसेस.
-क्रॉप टॉप्स आणि वी-नेक स्वेटर.
-बॉटम पँट्स आणि टाईट पँट्स.
3. अपर हवरग्लास शेप (Upper Hourglass)
अपर हवरग्लास शेप मध्ये थोडा बदल असतो. यात छाती आणि खांद्याकडील भाग मोठा असतो, तर नितंबाकडील भाग निमुळता असतो. त्यामुळे या बॉडीशेप च्या व्यक्तींना कपडे निवडताना थोडी जास्त काळजी घ्यावी लागते.
कपडे
-थ्री फोर्थ किंवा फुल स्लीव्हज असलेले कपडे घाला.
-फ्लेअर्ड किंवा स्ट्रेट फिट पँट्स उत्तम.
-बंद गळ्याचे किंवा लांब हाताचे कपडे घाला.
4 उलटा त्रिकोण (Inverted Triangle)
उलटा त्रिकोण या प्रकारात छातीचा भाग मोठा असतो, खांदे आणि हात जाड असतात, तर नितंबाकडील भाग तुलनेने लहान असतो.
कपडे
-पेपलम, स्कूप नेक किंवा व्ही-नेक टॉप्स घाला.
-ए-लाइन आणि मिडी ड्रेसेस ट्राय करा.
-क्रॉप वाइड लेग, बॉयफ्रेंड जीन्स किंवा स्ट्रेट लेग जीन्स घाला.
5. राऊंड किंवा गोलाकार (Round or Oval Shape)
काही लोकांचे शरीर गोलसर असते. याला अॅपल शेप फिगर म्हणतात. म्हणजे खांद्यापासून नितंबांपर्यंत त्याचा आकार गोलसर दिसतो. यामध्ये पोट, नितंब आणि खांदे सगळेच गोलसर असतात. अनेकजण अशा प्रकारच्या शरीरयष्टीचे असतात.
कपडे
-पंजाबी ड्रेससाठी थोडा लूज टॉप निवडा.
-बॉडीकॉन कपडे टाळा.
-वनपीस घालायचा असल्यास स्लीव्हलेस कपडे टाळा.
-खूप मोठ्या प्रिंटचे कपडे टाळा.
-अनारकली किंवा फ्लेअर्ड टॉप चांगले दिसतील
-ज्वेलरीसाठी गळ्यालगतची ज्वेलरी टाळा, लूज ज्वेलरी निवडा.