देहबोली

Body language : आपण शब्दांशिवाय देखील संवाद साधत असतो आणि याच संवादाचा एक महत्त्वाचा भाग आहे ‘देहबोली’ ( Body language)  म्हणजेच आपल्या शरीराची भाषा, चेहऱ्यावरील हावभाव, डोळ्यांचा संपर्क आणि हातवारे. प्रत्येक क्रियेतून आपण आपल्या भावना समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवतो आणि हे आपल्याला इतरांशी चांगले संबंध प्रस्थापित करण्यात मदत करते.
[gspeech type=button]

आपण शब्दांशिवाय देखील संवाद साधत असतो आणि याच संवादाचा एक महत्त्वाचा भाग आहे ‘देहबोली’ ( Body language)  म्हणजेच आपल्या शरीराची भाषा, चेहऱ्यावरील हावभाव, डोळ्यांचा संपर्क आणि हातवारे. प्रत्येक क्रियेतून आपण आपल्या भावना समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवतो आणि हे आपल्याला इतरांशी चांगले संबंध प्रस्थापित करण्यात मदत करते.

आपली देहबोली खूप काही सांगते. जेव्हा आपले शरीर आणि चेहरा समोरच्या व्यक्तीशी जुळतात तेव्हा तो संवाद अधिक प्रभावी बनतो. याचा उपयोग आपण विविध ठिकाणी जसे जॉब इंटरव्यू, सामाजिक कार्यक्रम आणि आपल्या दैनंदिन जीवनात करू शकतो. योग्य देहबोलीने आपण समोरच्या व्यक्तीवर चांगली छाप पाडू शकतो.

देहबोलीचे काही प्रकार

डोळ्यांनी संवाद

लक्ष, सहानुभूती, राग किंवा आकर्षण यांसारख्या अनेक भावना आपण एखाद्याकडे पाहून व्यक्त करू शकतो.

चेहऱ्यावरील हावभाव आणि हसू

आपला चेहरा आपल्या मूड कसा आहे हे दर्शवतो. हसणं, चेहऱ्यावर हलके हावभाव ठेवणं, यामुळे समोरच्या व्यक्तीला आपल्याबद्दल सकारात्मक भावना येतात. खालचा ओठ चावणे, चिंताग्रस्त, चेहऱ्यावरील काळजीचे हावभाव हे हावभाव ती व्यक्ती असुरक्षित असल्याचे संकेत देतात.

हातवारे

हातवारे देहबोलीचा एक महत्त्वाचा भाग आहे. ‘थम्स अप’ आणि ‘थम्स डाउन’ हे हावभाव सकारात्मक किंवा नकारात्मक भावना दर्शवतात. मधल्या बोटाने बनवलेले ‘V’ चिन्ह शांतता किंवा विजय दर्शवते.

मुद्रा (Posture)

उठण्या बसण्याची तुमची पद्धत इतरांना तुमच्याबद्दलची माहिती देत असते.एखादी व्यक्ती उठून उभी असताना किंवा बसताना शरीराची स्थिती समोरच्याला आपल्या आत्मविश्वासाबद्दल सांगते. उभे असताना पाठीचा कणा ताठ ठेवणे आणि चेहरा सरळ ठेवणे, यामुळे आत्मविश्वास दिसून येतो.

शारीरिक अंतर

संवाद करताना शारीरिक अंतर देखील महत्त्वाचे आहे. संवादाच्या ठिकाणी योग्य अंतर राखल्यास देहबोली चांगली दिसते

कोणत्याही गोष्टीत यशस्वी होण्यासाठी आपली देहबोली महत्वाची असते. आपण कसे उभे राहतो, कसे बसतो, आपले हात पाय कसे हलवतो, या सगळ्या गोष्टींवरून आपण आपल्याबद्दल बरेच काही सांगतो. एक प्रभावी देहबोली म्हणजे आपण जे बोलतो तेव्हा आपली शारीरिक भाषा त्याला अनुकूल असावी. उदाहरणार्थ, जर आपण एखाद्या महत्वाच्या भाषणासाठी उभे असाल तर आपला पाठीचा कणा ताठ असला पाहिजे, चेहरा सरळ असला पाहिजे आणि आपले हातवारे शांत असले पाहिजे. यामुळे आपण अधिक आत्मविश्वासपूर्ण दिसू आणि लोक आपल्या बोलण्याकडे अधिक लक्ष देतील. तसेच, प्रत्येक संवादाला एका हास्याने सुरुवात करणे ही एक चांगली सवय आहे .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

lifestyle : शाळा असो वा जीवनातील इतर जबाबदाऱ्या यावर लक्ष केंद्रित करणं प्रत्येकासाठी महत्वाचं असतं. विशेषतः विद्यार्थ्यांनी अभ्यासात एकाग्रता वाढवणे
Lifestyle: आजच्या ट्रेंडमध्ये चांदीचे दागिने मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाले आहेत. विशेषतः तरुणींमध्ये यांची क्रेझ वाढली आहे. पण फक्त फॅशन म्हणून
Makeup product : आपल्याला आवडलेली सौंदर्य उत्पादने जास्त दिवस वापरण्याचा मोह होतो. पण लक्षात ठेवा, तारीख उलटून गेलेले मेकअप साहित्य

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ