AI च्या मदतीने पाळीव प्राण्यांशी संवाद साधणं होणार सोपं

AL NatureLM App : ‘द अर्थ स्पीसेस प्रोजेक्ट’ या एनजीओच्या नेचर एलएम ॲपमुळे प्राण्यांची भाषा ही आता ‘डीकोड’ होणार आहे. त्यामुळे माणसांचं प्राण्यांसोबत असलेले नातेसंबंध हे अधिक दृढ होणार आहेत.
[gspeech type=button]

घरातील पाळीव प्राण्यांना कुटुंबातल्याच एका लहानग्याप्रमाणे वाढवलं जातं. आपल्याला या पाळीव प्राण्यांची भाषा समजत नसते. पण हळूहळू या प्राण्यांशी आपलं नातं घट्ट होत जातं. पण भाषेचा अडसर येतोच. प्राण्यांनी आपल्या सूचनांनुसार वागावं म्हणून त्यांना विशेष प्रशिक्षण दिलं जातं. पण एआयने आता आपली ही समस्या सुद्धा दूर केली आहे. एआयच्या तंत्रज्ञानाने तयार केलेल्या नव्या ॲपमुळे माणसांना प्राण्यांशी संवाद साधणं सोपं होणार आहे. 

नेचर एलएम – प्राण्यांचं विश्व उलगडणार

‘द अर्थ स्पीसेस प्रोजेक्ट’ या एनजीओने एआय तंत्रज्ञानाचा वापर करुन नेचर एलएम हे ॲप तयार केलं आहे. या ॲपच्या मदतीने प्राण्यांची भाषा ही ‘डीकोड’ केली जाणार आहे. तसचं प्राण्यांचं वय, त्यांच्या भावना, त्यांना नक्की काय वाटतं हे ही आता समजून घेता येणार आहे. थोडक्यात प्राण्यांच्या भावनिक विश्वामध्ये माणसांना आता जोडून घेता येणार आहे. 

आपल्या घरातला पाळीव प्राणी काहीतरी आवाज करतो किंवा बोलतो तेव्हा त्याला नेमकं काय म्हणायचं आहे, त्याला खेळायचं आहे की, भूक लागलीये, त्याला कुठे दुखतंय का, तो तणावामध्ये आहे का? की त्याला कुठे जायचं आहे? अशा सगळ्या गोष्टी या ॲपच्या माध्यमातून आपल्याला समजणार आहेत. 

कनेक्ट टू नेचर्स

आजवर पाळीव प्राण्यांना विशेष प्रशिक्षण देऊन त्यांना कुटुंबामध्ये सामावून घेतलं जातं. माणसांमध्ये आणि घरातल्या या पाळीव प्राण्यांमध्ये एकतर्फी संवाद साधला जायचा. प्राण्यांच्या भावना आणि भाषा समजून घेऊन त्यानुसार वागण्यासाठी त्या प्राण्यांसोबत बराच वेळ घालवावा लागतो. ही सगळी प्रक्रिया या ॲपच्या माध्यमातून सोपी होणार आहे. यामुळे माणूस आपल्या पाळीव प्राण्यांशी भावनिकदृष्ट्या लवकर  जोडला जाईल, असं मत ‘द अर्थ स्पीसेस प्रोजेक्ट’च्या सीईओ केटी झकेरियन यांनी मांडलं आहे.

सर्वसाधारणपणे भाषांतर करण्यासाठी ‘जनेरेटीव्ह एआय’  या तंत्रज्ञानाचाच वापर करण्यात येतो. याच तंत्रज्ञानाचा वापर आता प्राण्यांच्या भाषा मानवी भाषेत अनुवाद करण्यासाठी केला जाणार आहे. प्राण्यासह पक्षी सुद्धा एकमेकांसोबत संवाद साधण्यासाठी जी भाषा वापरतात, ती भाषासुद्धा डीकोड करून समजून घेण्याचा प्रयत्न या प्रकल्पांतर्गत सुरू आहे.  कारण या संपूर्ण ॲपच्या प्रक्रियेदरम्यान प्रेयरी जातीतले कुत्रे हे शिकार करण्यासाठी विशेष असे कोड वापरत असल्याचं आढळून आलं आहे. प्राण्यांमधली आणि पक्ष्यांमधली ही भाषा समजून घेण्याचा प्रयत्न आता पुढच्या टप्प्यात केला जाणार आहे. 

परिसरातील विविध भाषा समजून घेण्याचं आव्हान

एआय तंत्रज्ञानामुळे आज आपल्याला अनेक भाषा एका सेकंदामध्ये भाषांतरित करता येतात. त्यामुळे जगभरातल्या विविध भाषेतला मजकूर आपल्याला समजून घेता येतो. आतापर्यंत प्राण्यांच्या काही हालचालींवरुन किंवा त्यांच्यासोबत जास्त काळ राहिल्यावर, त्यांच्या सवयीनुसार आपण त्यांना समजून घेत होतो. पण त्यांची भाषा समजणं जे एक आव्हान होतं. हे आव्हानही या नेचरएलएम ॲपमुळे संपणार आहे. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Cyber Guidelines for using AI in Art : सायबर सुरक्षितता, कला जोपासण्या सबंधातली नैतिकता आणि बौध्दिक मालमत्ता हक्क-अधिकार जोपासण्यासाठी महाराष्ट्र
Pet Cloning Market in china : क्लोनिंगचे एवढे प्रचंड दर असूनही चीनमध्ये आपल्या पाळीव प्राण्याचं क्लोनिंग करण्याचं प्रमाण अधिक आहे.
Kancha Gachibowli : सरकारला गरज पडली की सरकारी जमिनींचा लिलाव करायचा हा अघोषित, अलिखित कायदाच बनला. तेलंगणा सरकारनेही सरकारी तिजोरी

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ