सेल्फ ग्रूमिंग

Self Grooming : सेल्फ-ग्रूमिंग हा फक्त दिसण्याचा विषय नाही, तर हा आपल्या आत्मसन्मानाचा आणि यशस्वी जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. आपल्या इमेजला, शरीराच्या आकाराला, त्वचेच्या प्रकाराला आणि नोकरीच्या प्रोफाइलला सुसंगत असे सादरीकरण करणं अत्यंत महत्त्वाचे आहे. कपडे, केस, पादत्राणे, परफ्यूम आणि मेकअप यांमध्ये केलेली प्रत्येक निवड आपल्याला आत्मविश्वासाने वावरायला मदत करते आणि आपली प्रतिमा अधिक प्रगल्भ बनवते.
[gspeech type=button]

सेल्फ-ग्रूमिंग म्हणजे फक्त चांगले दिसणे, मेकअप करणे किंवा ‘हायफाय’ रहाणे नव्हे; तर ते आपल्या आत्मविश्वासाशी संबंधित आहे. योग्य प्रतिमा निर्माण करणं, आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाला चांगल्या प्रकारे सादर करणं. जेव्हा रोजच्या schedule मध्ये किंवा व्यावसायिक जगात आपण स्वतःला योग्य रितीने सादर करतो, वावरतो तेव्हा आपण आपल्यालाच अधिक आत्मविश्वासी आणि यशस्वी जाणवतो. स्वत:ला स्वतःच्या सुंदर दिसण्याची खात्री असणं ही सेल्फ-ग्रूमिंग किंवा पर्सनल ग्रूमिंगची पहिली आणि महत्वाची पायरी आहे. यासाठी खरचं खूप काही नाही करायला ला मूगत.

स्वत:मध्ये असलेल्या गोष्टींची जाणीव करून घेणं आणि त्यांना अधिक विकसित म्हणजेच ग्रूम करायला शिकल्यास, आपली प्रतिमा बदलू शकते. हे समजून घेतलं तर तुम्हालाच तुमच्यात फरक जाणवेल.

स्वतःची प्रतिमा समजून घेण्याचे महत्त्व

आपली इमेज लोकांना आपण कसे दिसतो, कसे वाटतो याचं प्रतिबिंब असते. आपला पोशाख, बोलण्याची पद्धत, चालणं आणि आपल्या दिसण्याचा एकत्रित परिणाम म्हणजेच आपली इमेज आहे. आपली इमेज कशी असावी हे ठरवणे म्हणजे आपल्या व्यक्तिमत्त्वाशी सुसंगत अशी सादरीकरणाची पद्धत निवडणे होय. म्हणजे एका शिक्षिकेची इमेज आणि एका एअर होस्टेसची इमेज कितीही विरोधी असल्या तरी मार्दव, शांतपणा, शिस्त, प्रसन्न चेहरा दोघांकडे असणं गरजेचं आहे. कपडे, फूटवेअर आणि काम वेगळं आहे पण  basic characteristics सर्वांना कमी अधिक फरकाने सारखेच असतात.

जॉब प्रोफाइलनुसार ग्रूमिंग

आपल्या नोकरीच्या प्रकारानुसार आपले व्यक्तिमत्त्व अत्यंत महत्त्वाचं आहे. कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी एक अधिकृत व शिस्तबद्धता आवश्यक असते, तर क्रिएटिव्ह क्षेत्रात थोडी मोकळीक असू शकते. व्यावसायिक वातावरण म्हणजे सूट, ट्राउजर्स, शर्ट्स असा समज आहे ( खास करून महिलांसाठी) पण कॉटन अथवा लिनेनचे कुर्ता पालाझो, लखनवी ड्रेस, साडी हे सुद्धा उत्तम आणि सर्वमान्य ‘कॉर्पोरेट वेअर’ आहेत. केसांची साधी सोप्पी स्टाईल आणि योग्य मेकअप हे गरजेचे आहे. दुसरीकडे इनफॉर्मल किंवा अनौपचारिक वातावरणात जसे क्रिएटिव्ह आर्टिस्ट, सिनेमा, नाटक किंवा आजकाल बरीच मीडिया किंवा डिजिटल व्यवसायात इनफॉर्मल वातावरण ठेवतात. मग अशा ठिकाणी आरामदायी सुटसुटीत किंवा काहीवेळा मॉड किंवा फॅशनेबल इमेज तयार करता येऊ शकते. आपण जे काम करतो त्यानुसार आपली प्रतिमा तयार करणे आपल्या व्यावसायिक यशासाठी उपयुक्त ठरते.

बॉडी शेपनुसार पोशाख निवडणे

कपडे हे मूलभूत गरजांमधील एक. चांगले वाईट कसेही असले तरी हवेतच. आणि आपल्या इमेज बिल्डिंगमधे तर सिंहाचा वाटा उचलतात. ह्यात आपल्या शरीराच्या आकारानुसार (उदा. पिअर-शेप, अॅपल-शेप, ऑवरग्लास, इ.) कपड्यांची निवड केल्यास ते आपल्या व्यक्तिमत्त्वाला योग्य उठाव देतात. अगदीच सोप्पं उदाहरण म्हणजे जाड शरीराला बटबटीत किंवा मोठी प्रिंट अजून जाड दाखवेल. किंवा अगदी सडपातळ शरीरयष्टिला अँगल बसणारे कपडे अजून बारीक दाखवतील. त्याचबरोबर स्टाइल फॅशन ट्रेंड ह्यांच्याबरोबर हवामान, संस्कृती, सणवार अनेक गोष्टींचा विचार करून योग्य पोशाख निवडल्यास आपल्या आत्मविश्वासात नक्कीच वाढ होते आणि आपण अधिक आकर्षक दिसू शकतो.

त्वचेच्या प्रकाराची माहिती असणे

आपली त्वचा ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, जी लोकांच्या नजरेत आपल्याला पहिल्यांदा दिसते. आपली त्वचा निरोगी आणि स्वच्छ ठेवणे हा स्व-प्रसाधनाचा एक अत्यंत आवश्यक भाग आहे. आपल्या त्वचेचा प्रकार जाणून घेऊन योग्य प्रकारची उत्पादने वापरणे अत्यंत महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ, तेलकट त्वचा असल्यास तैलकटपणा नियंत्रित करणारी उत्पादने वापरणे आवश्यक असते, तर कोरडी त्वचा असलेल्यांनी अधिक आर्द्रता देणारी उत्पादने निवडणे फायदेशीर ठरते. नियमित स्वच्छता, मॉइश्चरायझिंग आणि सनस्क्रीनचा वापर हे दैनंदिन ग्रुमिंगसाठी महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर एक्ने, पिग्मेंटेशन, सुरकुत्या, यांची काळजी घेणंही तितकचं महत्वाच आहे. मी अनेकांना चेहऱ्यावरील डाग स्कार यामुळे अपसेट होताना पाहिलंय. तेव्हा त्वचेची योग्य काळजी महत्त्वाची आहे.

केसांची निगा आणि केशरचना

केस म्हणजे क्राउनिंग ग्लोरी. प्रत्येकाच्या आयुष्याचा महत्वाचा भाग म्हणा. स्किनसाठी फक्त साबण वापरतो म्हणणारे केसांसाठी काय काय नाही करत. शॅम्पू कंडीशनर हे कॉमन आहे पण आता काळ पुढे गेला आहे. मास्क, सीरम, पोशन, स्टाइलिंग प्रॉडक्ट्स जसे जेल, स्प्रे वगैरे सर्रास झालेत. पण स्वच्छ आणि व्यवस्थित केस ठेवणे हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. नियमित केसांची निगा, योग्य केशरचना आणिकेसांच्या प्रकारानुसार त्यांची देखभाल आवश्यक आहे. आपल्या चेहऱ्याच्या आकारानुसार योग्य केशरचना निवडल्यास आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य अधिक खुलून दिसते.

फुटवेअर: परिपूर्ण स्व-प्रसाधनाचे महत्त्वाचे घटक

असं म्हणतात एखाद्याच्या व्यक्तिमत्त्वाचा अंदाज लावायचा असेल तर त्याचे फुटवेअर बघावेत. स्वच्छ, नीटनेटकी आणि आरामदायक फुटवेअर घालणे हे आपले ग्रूमिंग अधिक प्रभावी करते. फाटलेली किंवा घाणेरडी फुटवेअर घातल्यास आपण कितीही नीटनेटक्या पोशाखात असलो तरी आपल्या व्यक्तिमत्त्वावर वाईट परिणाम होऊ शकतो. कामाचे ठिकाण, फिरायला जाताना, समारंभ, खेळाची जागा अशा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या फुटवेअरची गरज आहे. ती ओळखायला हवी. उंच टाचेच्या फुटवेअर असोत वा घरात वापरायच्या स्लिपऑन आरामदायीच असले पाहिजेत. नाहीतर, फुटवेअरमुळे होणाऱ्या वेदना, त्रास असा सगळा परिणाम थेट चेहऱ्यावर दिसतो. 

सुगंधाचा सूक्ष्म परिणाम

परफ्यूम हा आपल्या सेल्फ-ग्रूमिंगचा एक अत्यंत प्रभावी भाग आहे. योग्य प्रकारचा सुगंध आपल्या व्यक्तिमत्त्वाला एक वेगळेच स्थान देतो. मुळात परफ्यूम ही अशी गोष्ट आहे की जी अदृश्य रुपात आपल्या अस्तित्वाची जाणीव इतरांना करून देत असते. आणि आपण कोणालाही न दिसता इम्प्रेशन तयार करत असतो.सुगंधांचे अनेक प्रकार आहेत. म्हणजे उग्र आणि सौम्य नाही तर उपयोग, ओरिजिन किंवा प्रकृतीप्रमाणे. जसे डीओ, परफ्यूम, टॉइलेटरीज, अँटी पर्सपीअरंट आदी.. 

मेकअप: आपल्या सौंदर्याला अधोरेखित करा

महिलांसाठी मेकअप हे सेल्फ-ग्रूमिंगचे महत्त्वाचे अंग आहे. मेकअप हा हिऱ्याच्या कोंदणाप्रमाणे असायला हवा. गरजेप्रमाणे आकार आणि आधार देणारा. मेकअपचा वापर नैसर्गिक सौंदर्य अधोरेखित करण्यासाठी केला जाऊ शकतो. फाउंडेशन, लिपस्टिक, कॉम्पॅक्ट, लाइनर या सगळ्याचा उपयोग योग्य रीतीने आणि सांभाळून केल्यास प्रसन्न दिसायला मदत होते. परंतु, अत्याधिक मेकअप टाळणे आवश्यक आहे.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Agriculture Insiders : ‘ओळख कृषी-निविष्ठा उद्योगांची’ या लेखमालिकेच्या तेराव्या भागात जैवतंत्रज्ञानावर आधारित बियाण्याचा वापर आणि त्यासंबंधी भारतीय कृषी क्षेत्रातील घडामोडी
Grampanchayat Womens Health : गावपातळीवर आयोजित केल्या जाणाऱ्या सांस्कृतिक वा अन्य कार्यक्रमांमध्ये महिलांचा सक्रिय सहभाग असतो. मात्र, आरोग्य शिबिरांसाठी महिला
Summer dietary care : निसर्गतःच प्रत्येक ऋतूत त्या त्या ऋतूमध्ये शरीराला आवश्यक घटक पुरवणारी फळं आणि भाज्या येतात. शरीरात पाण्याची

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ