नवीन आयकर विधेयक 2025

New Income Tax Bill 2025 : सर्वसामान्य जनतेला सोप्या पद्धतीने Income Tax समजावा आणि त्यातली कार्यपद्धती सहजतेने वापरात आणली जावी या उद्देशाने नवीन आयकर विधेयक दिनांक 13 फेब्रुवारी 2025 रोजी संसदेत सादर करण्यात आलं आहे.
[gspeech type=button]

Income Tax म्हटलं की धडकी भरवणारा विषय, बऱ्याच वेळा हात वर करून लगेच CA कडे धाव घेतली जाते. याच मुख्य कारण म्हणजे क्लिष्ट वाटणारा Income Tax Act, 1961. सर्वसामान्य लोकांना प्रथम वाचनी पटकन न समजणारा विषय. वेळोवेळी या Act मध्ये वेगवेगळे बदल करण्यात आले, तरीही त्याच्या मूळ गाभ्याला सोपं करायचं काम करण्याऐवजी त्या बदलांनी त्यात अजून अवघडपणा वाढवला. गेल्या चार पिढ्यांपासून चालत आलेल्या या Act मध्ये फायनली बदल करण्याचे सरकारने मनावर घेतले आणि आज संसदेत New Income Tax Bill, 2025 सादर करण्यात आले. 

सर्वसामान्य जनतेला सोप्या पद्धतीने Income Tax समजावा आणि त्यातली कार्यपद्धती सहजतेने वापरात आणली जावी हे या नवीन Bill चे मुख्य उद्दिष्ट. या नवीन Bill द्वारे महत्त्वाचे बदल खालील प्रमाणे आहेत – 

 1. Income Tax Bill, 2025 मध्ये सोप्या भाषेचा वापर केलेला आहे. जुन्या Act मधल्या अनावश्यक Provisions काढून टाकण्यात आलेल्या आहेत. 

 2. नवीन विधेयकात कोणतेही नवीन कर लागू केलेले नाहीयेत. जुन्या Act मधील Tax Provisions एकत्र करून सोप्या पद्धतीने मांडण्यात आल्या आहेत. 

 3. Income Tax Act, 1961 मध्ये 298 sections, 23 Chapters आणि 14 Schedules चा समावेश होता. नवीन Act मध्ये 536 Sections, 23 Chapters आणि 16 Schedules चा समावेश आहे. Sections चा आकडा वाढलेला असला तरी जुन्या कायद्यातील तरतुदी सोप्या करून सांगण्यासाठी ही sections वाढवली आहेत. 

 4. जुन्या 1647 पानांचा Act जाऊन आता 622 पानांचा हा नवीन Act लागू केला जाईल. 

हे ही वाचा : संसदेत आज सादर होणार ‘डायरेक्ट टॅक्स कोड’ विधेयक

 5. 1 एप्रिल 2026 पासून नवीन Act अवलंबिला जाईल. 

 6. ‘Previous Year‘, ‘Assessment Year‘ या सारख्या क्लिष्ट संकल्पना बाजूला सारून ‘Tax Year’ ही नवीन संकल्पना सादर केली आहे. 

 7. ‘Explanations‘, ‘Provisios‘ ऐवजी Tables आणि Formulas चा जास्त वापर केला गेला आहे. 

 8. Taxpayer’s Charter मध्ये करदात्यांचे अधिकार आणि जबाबदाऱ्या यांची रूपरेषा समाविष्ट करण्यात आलेली आहे. 

9. Market Linked Debentures वरील Capital Gains बद्दल विशिष्ट तरतूद करण्यात आलेली आहे. 

10. वेगवेगळ्या प्रकारचे Salary Deductions (उदा. Standard Deduction, Gratuity, Leave Encashment) जे वेगवेगळ्या Sections मध्ये विखुरले होते. त्यांना एका section मध्ये आणण्यात आले आहे. 

हे नवीन Bill लोकसभेत मंजूर झाल्यानंतर Parliament Standing Committee कडे पुढील चर्चेसाठी सुपूर्त करण्यात येईल…

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Agriculture Insiders : ‘ओळख कृषी-निविष्ठा उद्योगांची’ या लेखमालिकेच्या तेराव्या भागात जैवतंत्रज्ञानावर आधारित बियाण्याचा वापर आणि त्यासंबंधी भारतीय कृषी क्षेत्रातील घडामोडी
Grampanchayat Womens Health : गावपातळीवर आयोजित केल्या जाणाऱ्या सांस्कृतिक वा अन्य कार्यक्रमांमध्ये महिलांचा सक्रिय सहभाग असतो. मात्र, आरोग्य शिबिरांसाठी महिला
Summer dietary care : निसर्गतःच प्रत्येक ऋतूत त्या त्या ऋतूमध्ये शरीराला आवश्यक घटक पुरवणारी फळं आणि भाज्या येतात. शरीरात पाण्याची

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ