पदवी शिक्षण झाल्यावर बरेच जण एमबीएचा विचार करतात. थोडे वर्ष अनुभव घ्यायचा आणि मग एमबीए करायचे हा बऱ्याचजणांचा करिअर प्लान असतो. यामागे कारणे विविध असली तरी अमेरिकेतील MBA जागतिक स्तरावर प्रसिद्ध असून, यामुळे मिळणाऱ्या संधी, आणि करियरमध्ये होणारी प्रगती आणि त्या अनुषंगाने मिळणारे चांगले पॅकेज ही कारणे जास्त महत्वाची आहेत. तुम्ही फायनान्स, मार्केटिंग, बिझनेस अनॅलिटिक्स, ऑपरेशन्स मॅनेजमेंट, इंटरनॅशनल बिझनेस, हॉस्पिटल मॅनेजमेंट, फार्मा मॅनेजमेंट, सप्लाय चेन मॅनेजमेंट अशा विविध विषयांत तुम्ही MBA स्पेशलायझेशन करू शकता.
अमेरिकेमध्ये एमबीए करण्यासाठी कोणती पात्रता लागते?
डिग्री (पदवी) : अमेरिकेत एमबीए करण्यासाठी कमीत कमी पदवी शिक्षण झालेले असले पाहिजे. अमेरिकेत मुख्यतः 12+4 इयर्स डिग्री हवी असते. म्हणजे आर्टस, कॉमर्स किंवा सायन्समध्ये पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यां नी मास्टर्स पूर्ण केले असले पाहिजे. आपल्याकडे भारतात पदवी ही 12+3 या प्रकारात मोडतात. आता बऱ्याच युनिव्हर्सिटी 12+3 शिक्षणपद्धती स्वीकारू लागल्या आहेत. पण ते options थोडे आहेत. त्यामुळे या बाबीकडे गांभीर्याने बघितले पाहिजे. अमेरिकन बिझनेस स्कूल्स प्रवेशप्रक्रियेबद्दल बरीच खुली असतात. एखादा खूप चांगले प्रोफाईल असलेला विद्यार्थी त्यांना मिळत असेल तर 12+3 शिक्षणपद्धती त्या विद्यार्थ्याच्या प्रवेशाच्या आड येत नाही. याबाबतीत युनिव्हर्सिटीला मेल करून विचारायला हरकत नाही.
GMAT आणि TOEFL
अमेरिकेतील प्रत्येक चांगले बिझनेस स्कूल ह्या दोन्ही परीक्षेचे गुण ग्राह्य धरते. GMAT ही 800 गुणांची परीक्षा असून GMAT स्कोअर 5 वर्षासाठी वैध असतो, https://www.mba.com/exams/gmat-exam ह्या अधिकृत वेबसाइटवरून आपण हवी ती डेट बुक करू शकतो. साधारणतः 650+ गुण हे उत्तम मानले जातात. पण उत्तम GMAT गुण म्हणजे सर्वोत्तम विद्यापीठात प्रवेश असे नाही. त्यासाठी स्टुडन्टची बाकी प्रोफाईल व्यवस्थित पाहिली जाते. टोफेल ही 120 गुणांची परीक्षा असून कमीत कमी 80 गुण जरी आवश्यक असले तरी 100 च्या वर स्कोर असलेला चांगला. बरीचशी विद्यापीठे 100 पेक्षा कमी गुण असतील तर काही इंग्रजीचे कोर्सेस एमबीए करताना घेण्यास सांगतात. यामुळे नाहक खर्च वाढू शकतो. त्यामुळे 100 पेक्षा जास्त गुण मिळवणे उत्तम. www.toefl.org ह्या अधिकृत संकेतस्थळावरून टोफेलची तारीख घेता येऊ शकते.
वर्क एक्स्पीरियन्स (अनुभव)
अमेरिकन बिझनेस स्कूलला प्रवेश घेताना अनुभव असणे गरजेचे आहे. साधारणतः 2-3 वर्षाचा कमीत कमी अनुभव असलेले उत्तम. अमेरिकेत MBA हा कार्यक्रम अत्यंत व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून तयार केला जातो. यामध्ये व्यवसायिक निर्णय, नेतृत्व, टीमवर्क, व्यवस्थापन, मार्केट रिसर्च यांवर विशेष भर असतो. त्यामुळे कामाचा अनुभव असलेला चांगला. आणि एमबीएसाठी बरेच विद्यार्थी अनुभव घेऊन आलेले असतात. 2-3 वर्षाचा अनुभव त्यामधे मिळालेली बढती, मिळालेल्या संधी, त्या संधींचा केलेला उत्तम उपयोग, या दरम्यान आलेली आव्हाने आणि त्याचा केलेला मुकाबला या सर्व गोष्टींचा प्रवेश देताना अतिशय बारकाईने विचार केला जातो.
Opportunity व नेटवर्किंग
अमेरिकेत अनेक multinational कंपन्यांची मुख्यालये आणि कार्यालये आहेत. त्यामुळे MBA विद्यार्थ्यांना अमेरिकेतील मोठ्या कंपन्यांमध्ये इंटर्नशिप आणि नोकरीसाठी चांगली संधी मिळते. नेटवर्किंगसाठी उत्तम प्लॅटफॉर्म मिळतो, ज्यामुळे जागतिक पातळीवर नोकरीच्या उत्तम संधी मिळतात.
व्यक्तिमत्व आणि नेतृत्वगुणांचा विकास
MBA मध्ये ग्रुप प्रोजेक्ट्स, ग्रुप डीस्कशन, केस स्टडीज आणि इंडस्ट्रीमधल्या तज्ज्ञांकडून मार्गदर्शन यांद्वारे व्यक्तिमत्व विकास आणि नेतृत्वगुणांवर विशेष भर दिला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वासाबरोबरच नेतृत्व गुणांचा पण विकास होतो. निर्णय क्षमता वाढते.
बाकीचे एमबीए करतात म्हणून मला करायचंय याला अर्थ नाही. सगळेजण मॅनेजमेंटमध्ये यशस्वी करिअर करू शकत नाहीत किंवा त्यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्वामध्ये ते बसत नाही. त्यामुळे स्वतःची आवड-निवड पारखून एमबीए करण्याचा निर्णय घेतलेला बरा. अमेरिकेत MBA केल्यावर मोठ्या पगाराची, मोठ्या हुद्द्द्याची नोकरी मिळण्याची शक्यता जास्त असते पण त्याच बरोबर जबाबदाऱ्या देखील वाढतात. त्यामुळे स्वतःची आवड-निवड पारखून एमबीए करण्याचा निर्णय घेतलेला उत्तम !
6 Comments
माहिती पूर्ण लेख👏👏👌👍
Very good information…..will help a lot
👍great one
Khup chan likhan marathitun as Vishrut Great ! age badho!
Very helpful and extremely well put!!
खूप छान माहिती!