गुंतवणूक तर केली.. पण त्याचा उपभोग कसा घ्यायचा ?

Investment : Goal ठरवून केलेली गुंतवणूक ही नेहमी तुम्हाला तुमच्या प्रगतीकडे घेऊन जाते. तुमच्या मोठ्या-मोठ्या स्वप्नांची पूर्तता सहज शक्य होते. याउलट Goal शिवाय केलेली गुंतवणूक बऱ्याचदा वायफळ खर्चात परावर्तित होते असच दिसून येते. 
[gspeech type=button]

“गुंतवणूक करा” ही गोष्ट अगदी लहानपणापासूनच आपल्यावर बिंबवली जाते. नोकरी, धंद्याला लागल्यावर “कल किसने देखा है ?” असं म्हणून वाटेल तसा पैसा उडवणारे सुद्धा पुढच्या काही वर्षातच लाईन वर येतात आणि परिस्थितीची जाणीव होऊन गुंतवणुकीला सुरुवात करतातच. आणि अर्थातच गुंतवणूक करा, कोणत्या पर्यायमध्ये करा हे सांगायला सल्लागार आणि गूगलबाबा तयार आहेतच. पण यातला यक्षप्रश्न असतो की “केलेल्या गुंतवणुकीचा उपभोग कसा घ्यायचा..?” ज्याचं उत्तर बऱ्याचदा भविष्यावर सोडून दिलं जातं. आजच्या या लेखात या प्रश्नाचं अचूक उत्तर तुम्हाला मिळेल.

Goal शिवाय गुंतवणूक नाही

कोणतीही गुंतवणूक सुरू करताना ती कोणत्या Goal साठी करण्यात येते आहे ते नक्की माहित असणं सगळ्यात गरजेचं आहे. उदाहरणार्थ – ३ वर्षांनी मला गाडी घ्यायची आहे, त्यासाठी मी ही गुंतवणूक करत आहे किंवा 5 वर्षांनी मला घर घ्यायचे आहे त्यासाठी हे पैसे मी वेगळे काढत आहे. Goal ठरवून केलेली गुंतवणूक ही नेहमी तुम्हाला तुमच्या प्रगतीकडे घेऊन जाते. तुमच्या मोठ्या-मोठ्या स्वप्नांची पूर्तता सहज शक्य होते. याउलट Goal शिवाय केलेली गुंतवणूक बऱ्याचदा वायफळ खर्चात परावर्तित होते असच दिसून येते.

“नेहमी लक्षात ठेवा – तुम्ही जर Goals ठरवून गुंतवणूक केली नाहीत, तर तुमची गुंतवणूक तुमचे Goals ठरवते.”

वरचे वाक्य परत वाचा, कारण अशी परिस्थिती तुमचं कोणतंच स्वप्न पूर्ण करू शकत नाही. Goals साठी केलेल्या गुंतवणुकीचा वापर ठरलेल्या वेळी त्या स्वप्नपूर्तीसाठी नक्की करा.

Goals – गुंतवणूक – रिटर्न्स यांची सरमिसळ करू नका

मी जर घरासाठी गुंतवणूक करत होतो तर त्याचा वापर मी घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी करणार. त्यावेळी मी त्या गुंतवणुकीतून रिटर्न्स किती मिळतायत ? या प्रश्नावर माझे Goal-Post बदलणार नाही. कारण एक Goal पूर्ण केला की माझी वाटचाल पुढच्या Goal कडे सुरू होणार आहे. आपले बहुतांश Goals हे भविष्यात एकदम लागणाऱ्या मोठ्या खर्चाशी निगडित असतात. उदाहरणार्थ – घर, गाडी, मुलांचे उच्च शिक्षण, फॉरेन ट्रीप इत्यादी. हातात असणारा वेळ, योग्य गुंतवणूक पर्यायाचा वापर आणि गुंतवणुकीबाबत असलेली शिस्तबद्धता ही त्रिसूत्री पद्धत आपली सगळी स्वप्नं सहज साध्य करून देऊ शकतात. गुंतवणुकीचा उपभोग घेताना Goals – गुंतवणूक – रिटर्न्स यांची सरमिसळ करू नका. गुंतवणूक करताना 12% रिटर्न्स अपेक्षित होते पण प्रत्यक्षात 16-17% मिळतायत म्हणून तुमचा goal-post बदलू नका किंवा 10% च मिळाले तरी तुमच्या ध्येपूर्तीवर त्यामुळे काही फारसा फरक पडणार नाही.

मोठ्या गुंतवणुकीला मोठ्या वाटा फुटतात

लवकर रिटायरमेंटच्या दृष्टीने गुंतवणूक सुरू केली, 10-12 वर्षात चांगला १ करोडचा पोर्टफोलिओ तयार झाला. तो पूर्णपणे काढून वीकेंड होम विकत घेतले. वीकेंड होम घ्यायचे होते तर त्यासाठी वेगळे पैसे का नाही साठवले ? आता लवकर रिटायरमेंटसाठी काय करणार ? वीकेंड होम मधून महिना 25,000 उत्पन्न आहे पण त्याची आता गरज आहे का ? जर महिना वेगळ्या उत्पन्नाची गरज होती तर याच पोर्टफोलिओ मधून रेंट पेक्षा जास्त उत्पन्न मिळू शकले असते त्याचा विचार केला का ? या प्रश्नांची उत्तरे नसतात किंवा अशा प्रकारे निर्णय घेताना गोष्टींचा विचारच केला जात नाही. त्यामुळे गुंतवणुकीचा उपभोग कसा घ्यायचा हा प्रश्न तुम्ही तुमच्या आर्थिक सल्लागाराला नक्की विचारायला हवा..

आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा – Goals ठरवले, गुंतवणूक चालू केली पण Goals बदलले तर काय ?

बदललेल्या Goals प्रमाणे गुंतवणुकीत फेरबदल करावा आणि अगदी शेवटच्या क्षणी देखील Goal बदलला तरी शेवटी तुमच्या सोबतीला तुम्ही केलेली गुंतवणूक असणार आहेच जी तुम्हाला नेहमीच उपयोगी पडणार आहे.

स्वप्न – Goals – गुंतवणूक या चक्रावर जेवढे लवकरात लवकर तुम्ही स्वार व्हाल, तेवढी तुमची प्रगतीच्या वाटेवर लवकर घोडदौड सुरू होईल…

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Agriculture Insiders : ‘ओळख कृषी-निविष्ठा उद्योगांची’ या लेखमालिकेच्या तेराव्या भागात जैवतंत्रज्ञानावर आधारित बियाण्याचा वापर आणि त्यासंबंधी भारतीय कृषी क्षेत्रातील घडामोडी
Grampanchayat Womens Health : गावपातळीवर आयोजित केल्या जाणाऱ्या सांस्कृतिक वा अन्य कार्यक्रमांमध्ये महिलांचा सक्रिय सहभाग असतो. मात्र, आरोग्य शिबिरांसाठी महिला
Summer dietary care : निसर्गतःच प्रत्येक ऋतूत त्या त्या ऋतूमध्ये शरीराला आवश्यक घटक पुरवणारी फळं आणि भाज्या येतात. शरीरात पाण्याची

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ