तुमचा डिजिटल किल्लाः पासवर्डची काळजी कशी घ्यावी

Password: डिजिटल युगात आपली खाजगी माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी पासवर्ड ही पहिली आणि महत्वाची सुरक्षारेषा आहे. मात्र, अनेक वेळा पासवर्ड तयार करताना किंवा वापरताना आपण काही साध्या चुका करतो, ज्यामुळे आपली खाती हॅक होण्याचा धोका निर्माण होतो.
[gspeech type=button]

आजच्या काळात आपण सगळेच इंटरनेटवर असतो. बैंकिंग, शॉपिंग, सोशल मीडिया, ईमेल या सगळ्यासाठी आपल्याला पासवर्डची गरज असते. पण हा पासवर्ड फक्त एक शब्द नाही, तो आपल्या डिजिटल जगातला किल्ला आहे. तो किती मजबूत असेल, त्यावर आपल्या माहितीची सुरक्षा अवलंबून असते.

डिजिटल युगात आपली खाजगी माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी पासवर्ड ही पहिली आणि महत्वाची सुरक्षारेषा आहे. मात्र, अनेक वेळा पासवर्ड तयार करताना किंवा वापरताना आपण काही साध्या चुका करतो, ज्यामुळे आपली खाती हॅक होण्याचा धोका निर्माण होतो. या लेखात, आपण सुरक्षित पासवर्ड कसा ठेवावा, तो सुरक्षित आहे का हे तपासण्याचे मार्ग, आणि पासवर्ड हॅक झाल्यास काय करावे, याब‌द्दल सविस्तर माहिती पाहू.

पासवर्ड कसा ठेवायचा?

• लांब आणि गुंतागुंतीचा असावाः तुमचा पासवर्ड किमान 12-16 अक्षरांचा असावा. तो मोठ्या आणि लहान अक्षरांचा (uppercase आणि lowercase), अंक, आणि विशेष चिन्हांचा (@. #, $, इ.) योग्य समतोल असलेला असावा.

• सोप्या ओळखण्याजोग्या गोष्टी टाळाः तुमचे नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर, किंवा सरळसोट शब्द (जसे की “password123”) टाळा. असे पासवर्ड हॅकर्ससाठी सहज ओळखण्याजोगे असतात.

• विविधताः प्रत्येक वेबसाइटसाठी वेगवेगळा पासवर्ड वापरा. एकच पासवर्ड सर्व ठिकाणी वापरल्यास, एखा‌द्या ठिकाणी पासवर्ड हॅक झाला तर सर्वत्र तुमची माहिती धोक्यात येऊ शकते.

• अर्थपूर्ण पण गुंतागुंतीचाः तुमच्यासाठी अर्थपूर्ण असणारा पासवर्ड ठेवा, पण इतरांना सहज ओळखता येता कामा नये. जसे की, तुमच्या आवडत्या पुस्तकातील वाक्य किंवा गाण्याचे बोल यांमधून एक वाक्य शोधण्यास सोपे जाते.

• पासवर्ड मॅनेजरचा वापर कराः आपले सर्व पासवर्ड लक्षात ठेवण्यासाठी पासवर्ड मॅनेजर (जसे की LastPass, Dashlane, किंवा 1Password) वापरा. हे टूल्स सुरक्षित पद्धतीने पासवर्ड साठवतात आणि तयारही करतात.

आपला पासवर्ड सुरक्षित आहे का?

आपला पासवर्ड किती सुरक्षित आहे हे तपासण्यासाठी काही वेबसाईट्स उपलब्ध आहेत. उदाहरणार्थः

1. Have I Been Pwned

(https://haveibeenpwned.com): या साइटवर तुम्ही तुमचा ईमेल किंवा पासवर्ड एंटर करून तो कुठल्या डेटा ब्रिचमध्ये समाविष्ट झाला आहे का हे तपासू शकता.

2. Google Password Checkup:

जर तुम्ही Google Chrome वापरत असाल, तर पासवर्ड सुरक्षित आहे का हे तपासण्यासाठी Google चा “Password Checkup” फीचर वापरू शकता.

(महत्वाची सूचनाः फक्त विश्वासार्ह आणि अधिकृत साइट्सवरच तुमचा पासवर्ड एंटर करा. इतर कोणत्याही अज्ञात साइट्सवर पासवर्ड टाकणे टाळा.)

पासवर्ड कधी बदलावा?

• डेटा ब्रिच झाल्यासः तुम्हाला एखा‌द्या वेबसाईट किंवा सेवेसंदर्भात डेटा लीकची बातमी समजली, तर लगेच पासवर्ड बदला.

• अनवॉटेड लॉगिनची चिन्हे दिसल्यासः एखा‌द्या सेवेत अनोळखी डिव्हाइसवरून लॉगिन झाल्याची सूचना मिळाल्यास, तत्काळ पासवर्ड बदला.

• नियमित अंतराने बदलः पासवर्ड नियमित बदलला पाहिजे. जरी कोणताही धोका नसला तरीही दोन चार

• महिन्यांतून एकदा पासवर्ड बदलला पाहिजे. अनेक बँका विशिष्ट काळानंतर पासवर्ड बदलायला सांगतात. तेव्हा तो बदलणे आवश्यक आहे.

• बैंक अकाउंटमध्ये अनधिकृत व्यवहारः जर तुमच्या बैंक अकाउंटमध्ये तुम्ही केलेले नसलेले व्यवहार दिसत असतील, तर लगेच तुमची बँक आणि संबंधित वेबसाइटला कळवा.

पासवर्ड हॅक झाला आहे हे कसे ओळखावे?

• तुमच्या खात्यावर अनोळखी लॉगिन सूचना आली तर..

• खात्यावरुन अनधिकृत व्यवहार झाले तर..

• तुमचा पासवर्ड काम करेनासा झाला किंवा बदललेला दिसला तर…

• एखाद्या कंपनीकडून तुम्हाला डेटा ब्रिचसंदर्भात ईमेल आली तर पासवर्ड हॅक झाला आहे असं मानायला जागा आहे.

पासवर्ड हॅक झाल्यास काय करावे?

• तत्काळ पासवर्ड बदलाः शक्यतो सुरक्षित डिव्हाइसवरून नवीन आणि मजबूत पासवर्ड तयार करा.

• दोन-स्तरीय प्रमाणीकरण (Two-Factor Authentication) सुरु कराः हा एक अतिरिक्त सुरक्षेचा स्तर आहे. लॉगिन करताना तुम्हाला पासवर्ड व्यतिरिक्त एक कोड किंवा बायोमेट्रिक

• पडताळणी करावी लागते. त्यामुळे पासवर्ड हॅक होणे टळू शकते.

• इतर खाती तपासाः ज्या इतर खात्यांमध्ये तोच पासवर्ड वापरलाय, तीही खाती त्वरित अपडेट करा.

• बँक किंवा क्रेडिट कार्ड प्रदात्याला कळवाः जर आर्थिक व्यवहार झाले असतील, तर बँकेशी संपर्क साधून त्वरित व्यवहार थांबवा.

• अन्य अकाउंट्स चेक कराः जर तुमचा एक अकाउंट हॅक झाला असेल, तर इतर अकाउंट्सही धोक्यात असू शकतात. सर्व अकाउंट्स चेक करून त्यांची सुरक्षा सुनिश्चित करा.

• पोलीसात तक्रार द्याः जर तुम्हाला मोठा आर्थिक नुकसान झाले असेल, तर पोलीसात तक्रार दाखल करा.

पासवर्डशी संबंधित काही महत्वाचे सल्लेः

• तुमचा पासवर्ड कधीही कोणाबरोबरही शेअर करू नका.

• सार्वजनिक ठिकाणी (जसे की सायबर कॅफे) पासवर्ड टाईप करताना सावधगिरी बाळगा.

• तुमच्या डिव्हाइसला नेहमी अँटीव्हायरस आणि फायरवॉलने सुरक्षित ठेवा.

• नसेल, तर सावध व्हा.

पासवर्ड आपली डिजिटल संपत्तीची चावी आहे. त्याची योग्य काळजी घेतली नाही तर आपली सर्व माहिती धोक्यात येऊ शकते. पासवर्ड कधीही जीमेलच्या draft मध्ये ठेऊ नयेत. समजा पासवर्ड आठवला नाही तर फर्गेट पासवर्ड करुन नवा पासवर्ड बनवता येऊ शकलो. नवीन पासवर्ड तयार करणे ही आज अगदीच सोपी गोष्ट आहे. त्यामुळे पासवर्ड लक्षात ठेवण्यापेक्षाही तो उत्तम बनवणं गरजेचं आहे. प्रत्येकवेळी पासवर्ड बदलला तरी चालू शकतो. त्यामुळे तो लक्षात राहावा यासाठी कुठेतरी लिहून ठेवण्यापेक्षा विसरून जाणं अधिक सोयीचं आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Agriculture Insiders : ‘ओळख कृषी-निविष्ठा उद्योगांची’ या लेखमालिकेच्या तेराव्या भागात जैवतंत्रज्ञानावर आधारित बियाण्याचा वापर आणि त्यासंबंधी भारतीय कृषी क्षेत्रातील घडामोडी
Grampanchayat Womens Health : गावपातळीवर आयोजित केल्या जाणाऱ्या सांस्कृतिक वा अन्य कार्यक्रमांमध्ये महिलांचा सक्रिय सहभाग असतो. मात्र, आरोग्य शिबिरांसाठी महिला
Summer dietary care : निसर्गतःच प्रत्येक ऋतूत त्या त्या ऋतूमध्ये शरीराला आवश्यक घटक पुरवणारी फळं आणि भाज्या येतात. शरीरात पाण्याची

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ