क्लाएंट कन्सल्टेशन – सलोन सर्व्हिसची महत्त्वाची पायरी

नव्याने एखाद्या  सलोनमध्ये आपण जातो तेव्हा अनेक भावना असतात मनात. सर्व्हिस, किंमत, value for money, प्रोडक्ट्स, कम्फर्ट, हायजीन आणि बरंच काही. अशावेळी जर का आपली अंटेन्डंट आपल्याशी अगत्याने बोलत असेल तर आपला अर्धा संकोच गळतो. अनेकदा consultation सुरू झालं की, आपल्या  ब्युटिशियनशबरोबर गप्पांचं एक सुंदर सेशनही सुरू  होतं.
[gspeech type=button]

मला असं नेहमी वाटतं की सलोनमध्ये येणारी प्रत्येक व्यक्ती एक  Intention घेऊन येते. कधी लग्नासाठी मेकअपची चौकशी तर कधी नव्याने ऑफिस जॉइन करण्यासाठी नवा लुक तर कधी स्वतःलाच छान वाटण्यासाठी … एक ना दोन. जेव्हा नव्याने एखाद्या  सलोनमध्ये आपण जातो तेव्हा अनेक भावना असतात मनात. सर्व्हिस, किंमत, value for money, प्रोडक्ट्स, कम्फर्ट, हायजीन आणि बरंच काही. अशावेळी जर का आपली अंटेन्डंट आपल्याशी अगत्याने बोलत असेल तर आपला अर्धा संकोच गळतो. अनेकदा consultation सुरू झालं की, आपल्या  ब्युटिशियनशबरोबर गप्पांचं एक सुंदर सेशनही सुरू होतं. consultation मध्ये आपली उत्तरच आपली सर्व्हिस ट्रीटमेंट ठरवत असतात. So जसं डॉक्टर, CA आणि आपला वकील ह्यांच्याशी कधी खोटं बोलू नये. तसंच आपल्या हेअर ड्रेसर आणि ब्युटिशियनशी सुद्धा. कारण तेच आपल्या स्किन आणि केसांच्या समस्यांवर उपाय करणार असतात. 

आता जेव्हा आपण ही उत्तर देत असतो, तेव्हा त्या अंटेन्डंटच्या डोक्यामध्ये jigsaw puzzleचा खेळ सुरू झालेला असतो. तुमच्या उत्तरांचे तुकडे योग्य पद्धतीने बसवत ट्रीटमेंट ठरवायची असते. त्याचबरोबर त्याची उपयुक्तता, लागणारा वेळ आणि तुमचा उपलब्ध वेळ, एकूण किती सिटींग्ज, price किंवा पॅकेज, value सगळ्याचा मेळ घालायचा असतो. वाचताना खूप मोठं वाटतंय ना पण प्रत्यक्षात हे सर्व १ ते दीड मिनिटात आटपायचं असतं. अर्थात डोक्यामध्ये. मग ते तुमच्यापर्यंत आणलं जातं. 

आधी बघू या  Consultation का  करायचं?

  • त्वचेशी संबंधित समस्यांचे अचूक निदान मिळणे अत्यंत गरजेचे आहे. हे निदानच योग्य उपचारांची निवड करण्यास मदत करते, ज्यामुळे त्वचेच्या केसांच्या समस्यांवर किंवा त्यांना खुलवण्यात अधिक चांगले परिणाम मिळतात.
  • ट्रीटमेंट्समध्ये काहीवेळा reverse action किंवा reaction येऊ शकतात. Consultation च्या वेळी क्लायंट्सनी जर संबंधित sensitivity, allergies, आणि अन्य वैद्यकीय इतिहास सांगितला तर हा त्रास टळू शकतो. 
  • योग्य कन्सल्टेशनने दीर्घकालीन किंवा कायमस्वरूपी परिणाम मिळतात. योग्य सेवा किंवा ट्रिटमेंट आणि प्रॉडक्टस् निवडल्यामुळे चांगले आणि स्टेबल परिणाम दिसतात.

थोडक्यात काय तर an effective consultation will always give best results. शेवट हा नेहमीच आनंददायी असतो. कारण तुम्ही सलूनमधून बाहेर पडताना तुमच्या चेहऱ्यावरचं हसू सांगतं की, तुमचं समाधान झालंय. जसं

“ अगं, किती सुंदर दिसतेस तू आज!”

“भाई आज कुछ अलग बाल बनाए क्या… मस्त दिख रहा है!” अशी एक छोटी compliment तुम्हाला तुमचा वेळ … पैसा …. सार्थकी लागल्याचं समाधान देतात. 

खरंय ना! आपण mostly सलोनला आपल्यातलं काहीतरी बदलायला … सुधारायला जातो. आपलं म्हणणं ऐकून जेव्हा समोरच्याच्या चेहऱ्यावरचं समर्पित हसू आणि त्यानंतर मिळणारं “चिंता करू नकोस, आता मी आहे ना?” हे उत्तर तुम्हाला शाश्वती देतं. हा संवाद हेच कन्सल्टेशनचं खरं सिक्रेट आहे. कारण यामुळे आम्हाला तुमच्या सौंदर्याच्या वास्तविक गरजा समजतात आणि त्यावर योग्य उपाय करता येतात.

माझे केस खूप निस्तेज दिसतायंत” किंवा “ केस खूप रफ झालेत, काय करू?” असा प्रश्न विचारल्यावर, “आपल्याला डीप कन्डीशन प्रोटीन ट्रीटमेंट करूया” असं उत्तर मिळतं. आणि मग तुमच्या डोक्यात विचार येतो, “हे डीप कन्डीशन प्रोटीन ट्रीटमेंट म्हणजे काय बुवा?” आमच्या उत्तरातले तांत्रिक शब्द तुम्हाला पटकन समजत नाहीत.

म्हणूनच, या गप्पांमध्ये जादू आहे, ज्यामुळे तुम्ही तुमच्या समस्येच निदान आणि उपाय  अगदी सोप्या भाषेत मिळवता. “हे बघ, तुझ्या केसांना थोडा पोषण देऊया ज्याने त्यांची चमक, मऊपणा परत येईल., नियमित होमकेअर कर आणि बघ तुझे केस कसे चमकायला लागेल.” हे शब्द ऐकल्यावर तुम्हाला ती चमक फक्त केसांवरच नाही तर मनातही जाणवते. 

आता क्लायंट कन्सल्टेशन करताना एक मेथड वापरली जाते. क्लायंटचे स्किन किंवा हेयर किंवा इतर सर्विस चे प्रश्न किंवा समस्या किंवा गरज समजणे

क्लाइंट हिस्ट्री जाणून घेणे:

स्किनवर किंवा केसांवर आधी  काही  ट्रीटमेंट  केली  होती का, असल्यास कोणती प्रॉडक्ट्स वापरली आहेत, याची माहिती मिळवणे आवश्यक आहे. तसेच, कोणत्याही प्रकारच्या  sensitivity किंवा allergies तसेच इतर आरोग्याशी संबंधित माहिती विचारावी.

जीवनशैली आणि आहार:

त्यांच्या लाइफस्टाइल आणि डाएटचे निरीक्षण करणे महत्त्वाचे असते. त्यांचे आहाराचे वेळापत्रक, व्यायाम आणि झोपेच्या सवयी त्वचेशी संबंधित असतात. 

अपेक्षा जाणून घेणे:

कन्सल्टेशन वेळी, अपेक्षा आणि गोल्स विचारावीत. ते कशाप्रकारे त्वचेची/ केसांची देखभाल करू इच्छितात अथवा किती वेळ देऊ शकतात, कोणत्या विशेष सर्व्हिसेसमधे  इंटरेस्ट आहे आणि त्यांचं बजेट काय आहे, हे समजून घेणे आवश्यक आहे.

Personalised Advice 

कन्सल्टेशनच्या शेवटी, Personalised Advice द्यावे. योग्य उपचार, उत्पादने, आणि रूटीन यांची शिफारस करावी. 

प्रोडक्ट नॉलेज

कोणत्या उत्पादनांचा वापर करावा, कसे वापरावेत आणि किती वेळा वापरावे  हे व्यवस्थित समजावून  सांगावे.

असा  संवाद प्रत्येकाच्या मनात आनंद निर्माण करतो. कन्सल्टेशनचं महत्व हेच की, ते तुम्हाला तुमच्या सौंदर्याबद्दल एक नवा दृष्टिकोन देऊन जातो. कारण तुम्ही फक्त सलोनमध्ये जात नाहीत, तर तिथून एक नवा आत्मविश्वास घेऊन बाहेर पडता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Agriculture Insiders : ‘ओळख कृषी-निविष्ठा उद्योगांची’ या लेखमालिकेच्या तेराव्या भागात जैवतंत्रज्ञानावर आधारित बियाण्याचा वापर आणि त्यासंबंधी भारतीय कृषी क्षेत्रातील घडामोडी
Grampanchayat Womens Health : गावपातळीवर आयोजित केल्या जाणाऱ्या सांस्कृतिक वा अन्य कार्यक्रमांमध्ये महिलांचा सक्रिय सहभाग असतो. मात्र, आरोग्य शिबिरांसाठी महिला
Summer dietary care : निसर्गतःच प्रत्येक ऋतूत त्या त्या ऋतूमध्ये शरीराला आवश्यक घटक पुरवणारी फळं आणि भाज्या येतात. शरीरात पाण्याची

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ