गडचिरोलीला नक्षली विळख्यातून बाहेर काढणारे सी 60 कंमाडो

बदलतं गडचिरोली : 17 जुलै 2024 रोजी एका मोठ्या एन्काउंटरनंतर संपूर्ण उत्तर गडचिरोली शून्य नक्षल विभाग करण्यात गडचिरोली पोलिसांना यश आल्याची माहिती गडचिरोली पोलीस अधिक्षक नीलोत्पल यांनी ‘श्रेष्ठ महाराष्ट्र’ला दिली.
[gspeech type=button]

दुपारी साधारण दीड वाजता फायरींग सुरू झालं. संध्याकाळचे 4 वाजायला आले. समोरुन फायर येत होतं. माझी पहिली मॅगझीन संपली. दुसरी मॅगझीन मी लोड करायला गेलो. वेपन त्याच्या पोझिशनलाच होती. त्याची डायरेक्शन चेंज नव्हती झाली. मी मॅगझीन लोड करत असतानाच बुलेट माझ्या उजव्या हाताला लागली. माझ्या पंजाचं हाड मोडलं आणि मी मॅगझीन लोड करू शकलो नाही. उजव्या दंडाच्या आरपार बुलेट गेली, छातीत उजवीकडेही बुलेट लागली. मोठ्या तीन बुलेटस् आणि चार स्प्लीन्टर्स घुसले. पंजाच्याच वेदना इतक्या होत्या की छातीला लागलेलं कळलंच नाही. समोरून अटॅक वाढला, माझा उजवा हात कामच करेना. थोडा वेळ तसाच थांबलो पण माझ्यावर चार्ज येत होते. मग वेपनचा खांदा बदलून मी डाव्या हाताने फायर करायला सुरूवात केली. मिलिंद तेलतुंबडे ज्या चकमकीत मारला गेला त्या चकमकीचा थरार सी 60  कमांडो टीकाराम काटेंगे सांगत होते.

एवढं लागल्यावर भीती वाटली नाही का? असं विचारल्यावर टीकाराम काटेंगे यांनी सांगितलं की, मनात अजिबात भीती नाही. 40-42 एन्काउंटर केलेत. बुलेट लागली मी मरेन असं काही वाटलं नाही. माझ्या हातालाच बुलेट लागली आहे. मला काही होणार नाही, या गोष्टीवर मी ठाम होतो. त्यामुळेच मी मागं सरकलो नाही. माझ्यासोबत पार्टी होती ती ही मागं हटली नाही. त्यामुळंच हा सक्सेस मिळाला.

नक्षलविरोधी खास टास्क फोर्स

गडचिरोलीमध्ये सी-60 हे स्पेशलायझ्ड अँटी नक्षल फोर्स आहे. 1990 मध्ये गडचिरोलीचे तत्कालीन पोलीस अधिक्षक के. पी. रघुवंशी यांनी सी-60 दलाची स्थापना केली. नक्षलविरोधी अभियान राबवणारी सी-60 ही कमांडोजची छोटी तुकडी होती. पोलीस दलातील विशेष अधिकारी आणि जवानांना चाळणी लावून नक्षलविरोधी अभियानाकरता खास निवडण्यात आलं होतं. 30 वर्षांपूर्वी 60 कमांडोजसोबत सुरू झालेल्या या दलातील कमांडोची संख्या हळूहळू वाढवण्यात आली. सध्या सी-60 मध्ये एक हजार कमांडो कार्यरत आहेत.  

महिन्यातील 20 दिवस घनदाट जंगलात आणि 4050 किमीचा पायी प्रवास

सी-60 कमांडोजना कायदा-सुव्यवस्थेच्या इतर कामांमध्ये किंवा गुन्हेगारी नियंत्रणाकरता वापरलं जात नाही. त्यांचा वापर फक्त गडचिरोलीमध्ये नक्षलविरोधी अभियानासाठीच करण्यात येतो. गडचिरोलीतील नक्षल प्रभाव आणि वावर कमी करण्यासाठी सी-60 कमांडो सतत कार्यरत असतात. महिन्यातील जवळपास 20 दिवस ते जंगलात राहतात. प्रत्येक अभियानाकरता 4050 किमीचा पायी प्रवास करतात. 2018 पासून साधारण 5 हजाराहून जास्त अभियान सी-60 कमांडोंनी केलेलं आहे. जवळपास 2 लाख तास जंगलात घालवले आहेत.

336 माओवाद्यांना कंठस्नान

सी-60 कमांडोंजच्या या अभियानाचा चांगलाच फायदा गडचिरोलीला झालेला आहे. आतापर्यंत गडचिरोलीमध्ये 336 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यास पोलिसांना यश आलं आहे. यातील 309 माओवादी सी-60 कमांडोंनी मारले आहेत. इतर 27 नक्षलींना पोस्ट पार्टी आणि इतर फोर्सने मारलेत. या अभियानादरम्यान बऱ्याचशा जवानांना वीरगतीही प्राप्त झाली आहे. 212 जवानांना वीरगती प्राप्त झाली आहे. यात 54 सी-60 कमांडो आहेत. सी-60 हे खूप धाडसी कंमाडो आहेत. 

भारतात पहिल्या क्रमांकाचे अँटी नक्षल कमांडो

सी-60 कमांडोजना 2024 मध्ये 24 माओवाद्यांना कंठस्नान घातलं तर 20 माओवाद्यांना अटक केली. विशेष म्हणजे 2024 मध्ये 31 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. 1 जानेवारी 2024 ला गडचिरोलीमध्ये 98 आर्म्ड माओवादी कॅडर कार्यक्षम होते. पण 31 डिसेंबर 2024 ला यातील 49 च आर्म्ड माओवादी कॅडर कार्यक्षम आहेत. म्हणजेच 50 टक्के माओवाद्यांना या भागातून कमी करण्यात सी-60 कमांडोजना यश आलं आहे.

उत्तर गडचिरोली शून्य नक्षल करण्यात यश

17 जुलै 2024 रोजी एका मोठ्या एन्काउंटरनंतर संपूर्ण उत्तर गडचिरोली शून्य नक्षल विभाग करण्यात गडचिरोली पोलिसांना यश आल्याची माहिती गडचिरोली पोलीस अधिक्षक नीलोत्पल यांनी ‘श्रेष्ठ महाराष्ट्र’ला दिली. सध्या या भागात एकही एक्टिव्ह माओइस्ट कॅडर नाहीये. दक्षिण गडचिरोलीमध्ये एटापल्ली आणि छत्तीसगडच्या सीमेला लागून असलेले भामरागड तालुक्यातील भागांमध्ये काही माओवादी अजून दिसून येतात. त्यांना आटोक्यात आणण्यासाठी गडचिरोली पोलीस पुढची नीती आणि नक्षल विरोधी अभियान राबवत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

बदलतं गडचिरोली : गडचिरोली नक्षलवादी भाग ते उद्योगधंदे अशी ओळख बदलत आहे. मात्र, यात गडचिरोलीची कायम राहिलेली ओळख आहे ती
बदलतं गडचिरोली : गडचिरोलीमध्ये सध्या सुरक्षेबरोबरच विकासावरही जोर दिला जातोय. ज्यामध्ये रस्ते, पाणी, लाईट यासारख्या सुविधा देण्याच्या कामाबरोबरच या जिल्ह्यात
बदलतं गडचिरोली : नक्षलवादी हे सर्वसाधारणपणे आदिवासी भागातले किंवा स्थानिकच असतात आपला असा समज असतो. पण आपल्याला आश्चर्य वाटेल केवळ

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ