कोण आहेत CIA चे संभाव्य प्रमुख ‘कॅश’ पटेल ?

Who is Kash Patel : कश्यप 'कॅश' पटेल हे ट्रम्पचे निष्ठावान समर्थक म्हणून ओळखले जातात. ट्रम्प प्रशासनात ते महत्त्वाच्या पदांवर कार्यरत होते. त्यांनी ट्रम्प सरकारच्या काळात सुरक्षा आणि गुप्तचर एजन्सीशी संबंधित महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या होत्या.
[gspeech type=button]

कश्यप ‘कॅश’ पटेल हे ट्रम्पचे निष्ठावान समर्थक म्हणून ओळखले जातात. ट्रम्प प्रशासनात ते महत्त्वाच्या पदांवर कार्यरत होते. त्यांनी ट्रम्प सरकारच्या काळात सुरक्षा आणि गुप्तचर एजन्सीशी संबंधित महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या होत्या. ट्रम्प यांच्याशी असलेली निष्ठा आणि गुप्तचर क्षेत्रातील अनुभवामुळे, ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात पटेल यांची मोठ्या पदावर म्हणजेच सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी ( CIA ) म्हणून नियुक्ती होऊ शकते.

यूएस मिडिया ने ट्रम्प यांना निवडणूक विजेता म्हणून घोषित करण्यापूर्वीच, ट्रम्प यांनी त्याच्या नवीन प्रशासनात कोण कोण असू शकतात, याची संभाव्य नावांची यादी आधीच तयार केली होती.

कॅश पटेल हे एक भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक आहेत. त्यांचं बालपण न्यूयॉर्क मधील गार्डन सिटीमध्ये गेलं. तिथेच त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केलं. पटेल यांचे आई- वडील इदी अमिनच्या हुकूमशाहीमुळे 1970 साली युगांडा सोडून अमेरिकेतील लॉन्ग आयलंड इथं स्थायिक झाले.

पटेल यांचे कुटुंब त्यांच्या वडिलांच्या आठ भावंडांसोबत एकाच घरात राहत होते त्यांच्या आई- वडीलांनी त्यांना हिंदू धर्मानुसार वाढवले आहे.

पटेल यांनी आपले अंडरग्रॅज्युएट शिक्षण युनिव्हर्सिटी ऑफ रिचमंडमध्ये पूर्ण केलं. त्यानंतर न्यूयॉर्कमधील काही श्रीमंत व्यक्तींसाठी कॅडी म्हणून काम करत असताना, त्यांनी वकिली क्षेत्रात करिअर करण्याचा विचार केला. त्यानंतर पटेल यांनी पेस युनिव्हर्सिटीमधून कायद्याची पदवी मिळवली. तसेच त्यांनी युनायटेड किंगडममधील युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन फॅकल्टी ऑफ लॉ मधून इंटरनॅशनल लॉचे सर्टिफिकेट मिळवले. पटेल यांनी आपल्या पुस्तकात लिहिलं आहे की, ‘प्रतिष्ठीत लॉ फर्म्समध्ये काम करून जास्त पगार मिळवण्याचे त्यांच स्वप्न कधीच पूर्ण झाले नाही, कोणीही मला नोकरी दिली नाही’

पटेल यांनी फ्लोरिडामध्ये पब्लिक डिफेंडर म्हणून करिअरची सुरुवात केली. तिथे त्यांनी खून, अंमली पदार्थांची तस्करी आणि आर्थिक गुन्ह्यांच्या केसेसची सुनावणी केली. न्याय विभागात जॉईन होण्यापूर्वी त्यांनी आधी जवळपास नऊ वर्ष पब्लिक डिफेंडर म्हणून काम केलं.

2014 मध्ये पटेल फ्लोरिडा सोडून वॉशिंग्टन डीसीला गेले. तिथं, त्यांना न्याय विभागात राष्ट्रीय सुरक्षा विभागाच्या काऊंटरटेरोरिझममध्ये नोकरी मिळाली. इथं त्यांनी दहशतवादविरोधी कार्यात महत्त्वाची भूमिका निभावाली. 2017 पर्यंत तिथे त्यांनी काम केलं. पण नंतर डीसीमधील नोकरशाहीमुळे निराश होऊन त्यांनी ते काम सोडले. पुढे रिपब्लिकन डेविन नूनस यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या हाऊस परमनेंट सिलेक्ट कमिटी ऑन इंटेलिजन्समध्ये ( House Permanent Select Committee on Intelligence) त्यांनी काम केलं. डेविन नूनस हे डोनाल्ड ट्रम्पचे कट्टर समर्थक होते.
2018 पर्यंत, पटेल यांचा बॉस नुनेस नोकरीपासून दूर होता. ट्रम्प अध्यक्षपदाच्या विरोधात झालेल्या तीव्र प्रतिक्रियांमुळे निवडणुकीच्या मधल्या काळातच रिपब्लिकन सत्तेतून बाहेर पडले.

त्यानंतर, न्युन्सने पटेल यांच्या नोकरीसाठी व्हाईट हाऊसशी संपर्क साधला. आणि नॅशनल सिक्युरिटी कौन्सिलमधील लहान पदावर ट्रम्प यांच्या आग्रहाखातर पटेल यांची नियुक्ती करण्यात आली.

नोव्हेंबर 2020 मध्ये, पटेल यांना संरक्षण सचिव क्रिस्टोफर मिलर यांच्याकडे चीफ ऑफ स्टाफ म्हणून नियुक्त केले गेले. त्यांच्या कार्यालयातील शेवटच्या महिन्यांत, ट्रम्प यांनी पटेलांना FBI किंवा CIA च्या उपसंचालक म्हणून नियुक्त करण्याचा विचार केला, या मागचा उद्देश गुप्तचर समुदायावर राष्ट्राध्यक्षांच्या नियंत्रणाला अधिक मजबूत करणे होता.

जानेवारी 2021 मध्ये ट्रम्प यांनी व्हाईट हाऊस सोडल्यानंतर पटेल त्यांच्या कामात व्यस्त झाले. त्यांनी फाईट विथ काश ( Fight with Kash ) ही संस्था सुरू केली, जी मानहानीच्या खटल्यांसाठी निधी पुरवते.

पटेल यांनी लिहलेली काही पुस्तके देखील प्रकाशित केली आहेत. “Government Gangsters: The Deep State, the Truth, and the Battle for Our Democracy” . तसेच त्यांनी “The Plot Against the King” या कादंबरीत दोन मुलांचा संदर्भ घेत एक ट्रम्प याचं कौतुक केलं आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Air travel: प्रवाशांना यापुढे विमानतळावर चेक-इन करण्याची किंवा बोर्डिंग पास बाळगण्याची गरज भासणार नाही.आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेने यासाठी पुढाकार
Luna Recycles Mission : अंतराळात मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होत आहे. या कचऱ्यामध्ये मानवी विष्ठा, मूल विसर्जन आणि उलट्या यासारख्या
Dire wolves : सुमारे साडेबारा हजार वर्षांपूर्वी पृथ्वीवरून नामशेष झालेला अतिशय हिंस्र शिकारी प्राणी – डायरे वुल्फ (Dire Wolf) आता

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ