रशिया – युक्रेन युद्धाचे हजार दिवस

1,000 days of Russia-Ukraine War:रशिया - युक्रेन युद्धाला तब्बल हजार दिवस पूर्ण झाले. फेब्रुवारी 2022 मध्ये रशियाने युक्रेनची राजधानी कीव शहरावर आक्रमण केलं. युक्रेनचे राजधानी शहर पूर्ण उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न रशियाने केला. पण कोव हे आजही उभं आहे. रशियासारख्या बलाढ्य देशासमोर युक्रेनने अजुन हार मानली नाहीये.
[gspeech type=button]

रशिया – युक्रेन युद्धाला तब्बल हजार दिवस पूर्ण झाले. फेब्रुवारी 2022 मध्ये रशियाने युक्रेनची राजधानी कीव शहरावर आक्रमण केलं. युक्रेनचे राजधानी शहर पूर्ण उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न रशियाने केला. पण कीव हे शहर आजही उभं आहे. रशियासारख्या बलाढ्य देशासमोर युक्रेनने अजुन हार मानली नाहीये. 

या दोन्ही देशांमध्ये हजार दिवसानंतर ही अधुन-मधुन हल्ले होतातच. युक्रेन मागे सरत नाही तर रशिया धिम्या गतीने का असेना युक्रेनवर ताबा मिळवण्यासाठी आगेकुच करतच आहे. त्यामुळे हे युद्ध थांबेल का आणि कधी थांबणार हा आजचा महत्त्वाचा प्रश्न आहे. 

हिंमतवान युक्रेन सैन्य 

नाटो सदस्य गटामध्ये युक्रेन सहभागी होऊ नये आणि युक्रेनच्या उत्तरेकडचा भाग पुन्हा ताब्यात घेण्यासाठी रशियाने युक्रेनच्या विरोधात युद्ध पुकारलं. संपूर्ण युक्रेनला नेस्तानाबूत करण्यासाठी युक्रेनची राजधानी कीव शहरावर हल्ला केला. राजधानी शहर उद्धवस्त केलं तर युक्रेन हार मानिल असा रशियाचा विचार होता. मात्र, तसं घडलं नाही. तब्बल अडीच वर्षाहून अधिक काळ उलटला. कीव शहरासह संपूर्ण युक्रेन अजूनही तग धरून आहे.  रशियाला सहजासहजी युद्ध जिंकू न देण्यासाठी आणि अन्य मित्र देशांच्या मदतीने युक्रेनियन सैन्य हे युद्ध हिंमतीने लढत आहे. 

आज जवळपास तीन वर्षानंतर, रशिया हा युक्रेनच्या भौगोलिक क्षेत्राचा एक-पंचमांश भाग मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे आणि मानवी जीवांची किंमत मोजत आहे. दरम्यान, या युद्धकाळात  युक्रेन हा युद्धामुळे होत असलेल्या नुकसानीतून उभं राहण्याचा प्रयत्न करत आहे. नागरिकांचं मनोधैर्य टिकवण्याचं आणि मित्रपक्षांकडून अधिकाधिक लष्करी मदत मिळवून युद्ध लढण्याचा प्रयत्न करत आहे. अधुनमधून युक्रेन ही रशियावर हल्ले करुन युक्रेनला पाश्चिमात्य देशांकडून मिळणारी मदत आणि रशियाने पुन्हा आक्रमण करण्याचं धाडस करू नये, असा संदेश देण्याचा एक प्रयत्न करत असतो.

डोनाल्ड ट्रम्प हे युद्ध थांबवू शकतात का?

अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणुकीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्या संदर्भातलं वक्तव्य केलं होतं. रशिया आणि अमेरिका हे विरोधी विचारसरणीचे देश आहेत. त्यामुळे हे  युद्ध थांबवणं अमेरिकेला शक्य आहे का? तर होय. जर अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनचा शस्त्रपुरवठा थांबवला तर या युद्धाला पूर्णविराम मिळेल, असं मत स्कॉटलंड येथल्या सेंट अॅण्ड्र्युज विद्यापीठातील स्ट्रॅटेजिक स्टडीचे प्राध्यापक फिलीप ओ’ब्रियन यांनी मांडलं आहे. 

युद्धाची तीन वर्ष

साधारणत: दोन वर्ष आणि नऊ महिन्यापासून हे युद्ध सुरु आहे. 

फेब्रुवारी 2022 मध्ये युद्धाला सुरुवात झाली. या पहिल्या वर्षात युक्रेनने बराचसा भौगोलिक प्रदेश गमावला. पण त्याबदल्यात युक्रेनने स्वतंत्र देश असल्याचं सिद्ध करुन दाखवलं. युक्रेनने तातडीने शरण न येता रशियाशी युद्ध करण्याचं धाडस दाखवत आत्मविश्वास मिळवला. जागतिक पटलावर स्वत:ची बाजू मांडण्याची संधी मिळवली. रशियाचं आक्रमण धुडकावून लावत त्यांच्यावर प्रतिहल्ला करत गमावलेला काही भूभाग ही परत मिळवला. 

रशिया विरूद्ध लढण्यासाठी युक्रेनला अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणावर रसद पुरवली जाते. मात्र, युद्धाच्या दुसऱ्या वर्षात म्हणजे फेब्रुवारी 2023 ते फेब्रुवारी 2024 दरम्यान युक्रेनला अमेरिकेकडून ही रसद (61 अब्ज डॉलरची मदत) मिळायला उशीर झाला त्यामुळे युक्रेनचं नुकसान झालं. या दुसऱ्या वर्षात युक्रेनने पूर्वेकडचं बखमूत शहर ही या युद्धात गमावलं.  

युद्धाच्या तिसऱ्या वर्षात रशियाने नेव्हिगेशन तंत्र असलेल्या बॉम्बचा वापर करत युक्रेनचं अवडिव्हका शहर जमिनदोस्त केलं.  या शहरावरील हल्ल्यामुळे युक्रेनच्या संरक्षण क्षेत्राचं खूप नुकसान झालं. त्यानंतर रशियाने खार्किव्ह शहरावर आक्रमण केल्याने युक्रेनियन सैन्यावर मोठा ताण पडला. 

ऑगस्ट 2024 मध्ये युक्रेनने रशियावर हल्ला करत कुर्से येथला भूभाग ताब्यात घेतला. हा युक्रेनसाठी विजयाचा क्षण होता. पण त्यानंतरही युद्ध थांबवण्याच्या दिशेने काही वाटचाल झाली नाही. उलट रशिया युक्रेनच्या पूर्वेकडील भागात आणखीन कारवाया करुन भूभाग ताब्यात घेऊ लागला. 

प्रादेशिक वर्चस्वाच्या लढाईत लाखो सैन्यांचा बळी

युद्धामध्ये होणारी हानी ही न भरून निघणारी असते. जिवीतहानी, वित्तहानी आणि मानसिक हानी ही खूप मोठी असते. काही एक भूभाग मिळवण्यासाठी आणि प्रादेशिक वर्चस्व राखण्यासाठी दोन देशामधल्या या युद्धात दोन्ही देशाची अपरिमित हानी झाली आहे आणि अजुनही होत आहे. 

संयुक्त राष्ट्राच्या मते या युद्धात दोन्ही देशाच्या लाखो सैनिक मृत्यूमुखी पडले आहेत. तर 11,700 युक्रेनियन नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. 

जागतिक शांती ऐवजी शस्त्र पुरवठा

या संपूर्ण युद्धामध्ये जागतिक पातळीवर शांती करार स्थापित करण्यासाठी कोणताच देश वा नेता पुढाकार घेत नाही. त्याउलट या दोन्ही देशांशी आपले संबंध आणि व्यवसायीक नातं दृढ करण्याचा प्रयत्न केला जात आहे.  या देशांना शस्त्रास्त्रे व आवश्यक ती साधनसामुग्री पुरवठा करुन व्यवसायिक गणितं सांभाळण्याचा प्रयत्न अन्य राष्ट्राकडून केला जात आहे. 

इराणने रशियाला ड्रोन्स, मिसाईल्स पुरवले. तर उत्तर कोरियाने दारूगोळा आणि सैन्य पुरवलं. 

अमेरिका तर सुरूवातीपासुनच युक्रेनला सैन्य, दारूगोळा, युद्ध सामुग्री आणि अन्य मदत पुरवत आहे. आत्तापर्यंत अमेरिकेने युक्रेनला 64 अब्ज डॉलरची मदत पुरवली आहे. 

हे युद्ध थांबणार की तिसरे महायुद्ध घडणार

दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपची भूमी ही या युद्धात होरपळत आहे.  वारंवार दोन्ही देशांकडून एकमेकांवर बॉम्बहल्ले केले जात आहेत. त्यात अन्य देशांकडून मिळणारी मदत ही आगीत तेल ओतण्यासारखी आहे. युक्रेनला अमेरिकेकडून मदत मिळाली नसती तर हे युद्ध इतक्या दिवसापर्यत सुरू राहणं शक्य नव्हतं. असा सूर आता आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू आहे.

अमेरिकेच्या पाठिंब्यामुळे हे युद्ध रशिया – युक्रेन युद्ध राहिलं नसून; अप्रत्यक्षरित्या रशिया आणि अमेरिकेमधल्या सामर्थ्याचं युद्ध म्हणून आकार घेत आहे. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Air travel: प्रवाशांना यापुढे विमानतळावर चेक-इन करण्याची किंवा बोर्डिंग पास बाळगण्याची गरज भासणार नाही.आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेने यासाठी पुढाकार
Luna Recycles Mission : अंतराळात मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होत आहे. या कचऱ्यामध्ये मानवी विष्ठा, मूल विसर्जन आणि उलट्या यासारख्या
Dire wolves : सुमारे साडेबारा हजार वर्षांपूर्वी पृथ्वीवरून नामशेष झालेला अतिशय हिंस्र शिकारी प्राणी – डायरे वुल्फ (Dire Wolf) आता

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ